कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे फ्रान्समध्ये संचारबंदी
Published
कोरोनानंतर पॅरीसमधलं जीवन संथगतीने सुरू होतं. पण इथल्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीत कोणताच बदल दिसला नाही. त्यामुळे पॅरीस, लिओन, मार्सेलीस शहरांत कोरोनाची परत एकदा लाट आली आहे.
आता याठिकाणी कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आलीय. पॅरीस आणि इतर 8 शहरांत कोरोना झपाट्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर ही बंधनं घातली आहेत. पण त्याचे देशभर परिणाम होत आहेत. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचं पाऊल उचलण्याचं फ्रान्स सरकार टाळत आहे. पण आरोग्य तज्ज्ञांनी राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)