You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप अमेरिका धगधगत असताना पुन्हा निवडून येतील का? - पाहा व्हीडिओ
रिपब्लिकन पक्षानं दिलेलं पुनर्नांमाकन ट्रंप यांनी गुरुवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये स्वीकारलं आहे.
गुरूवारी रिपब्लिकन पक्षाचं अधिवेशन संपलं. त्यावेळी दिलेल्या भाषणात ट्रंप म्हणाले की, देशाच्या इतिहासातली ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. त्यानंतर त्यांनी भाषणाचा मोर्चा कायदा आणि सुव्यवस्थेकडे वळवला. वर्णद्वेष आणि पोलिसांच्या क्रूरतेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या नावाखाली सगळीकडे दंगे माजले आहेत, ते थांबले पाहिजेत, असं त्याचं म्हणणं आहे.
1968मध्ये शहरी श्वेतवर्णीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून रिचर्ड निक्सन यांनीही हीच रणनिती आखली होती. सुरक्षा धोक्यात आहे असा दावा करत त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात पोलिसांची बाजू घेतली. आताही ट्रंप यांचा प्रचार त्याच दिशेने असल्याचं दिसतंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)