रफाल विमानांचा भारतात उतरेपर्यंतचा प्रवास कसा होता?

Published

हरियाणातल्या अंबाला हवाई तळावर बुधवारी म्हणजे 29 जुलै रोजी रफाल विमानांची पहिली तुकडी पोहोचली, तेव्हा अंबाला हवाई तळाभोवती संचारबंदी लागू केली होती.

सप्टेंबर 2016 मध्ये भारताने फ्रान्सकडून 36 राफेल जेट विमानं विकत घेण्याचा करार केला. पण या कराराची प्रक्रिया खूप आधी म्हणजे डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरू झाली होती.

मधल्या काळात रफालच्या किंमतीवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. पण आता या सगळ्या अडचणींवर मात करत रफाल भारतात पोहोचलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)