कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्याचं मांस खावं की नाही?
कुत्र्याचं मांस खाण्याची कल्पना भारतात आपल्याला फारशी पटणार नाही. पण, पूर्व आशियाई देशांमध्ये हे मांस सर्रास खाल्लं जातं.
दक्षिण कोरियात तर उन्हाळ्यात या मांसाला विशेष मागणी असते. पण, कुत्र्याचं मांस खाण्यामध्ये एक भावनिक गुंता असाही आहे की, कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. त्याचा लळा लागतो. आणि इतर देशांप्रमाणेच दक्षिण कोरियातही अनेक घरांमध्ये कुत्रे पाळले जातात. त्यामुळेच तिथे आता कुत्र्याचं मांस खाण्यावरून काहीसा वाद निर्माण झाला आहे. सरकारवरही कुत्र्याच्या मांसाच्या व्यापारावर बंदी घालण्यासाठी दबाव येत आहे. अशावेळी बीबीसीने दोन्ही विचारधारेच्या लोकांना समोरासमोर आणून कुत्र्याचं मांस खावं की नाही, यावर त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेतलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)