कोरोना पुणे लॉकडाऊन: 83 वर्षांच्या आजीने प्रेमापोटी केवळ 4 मुलांसाठी मेस चालू ठेवली
पुण्यातल्या गोखलेनगर येथे राहणाऱ्या उषा नमाडे आजी आणि त्यांचं कुटुंब विद्यार्थ्यांसाठी मेस चालवतात. त्या 83 वर्षांच्या आहेत.
त्या गेल्या 10 वर्षांपासून मेस चालवतात. पण यंदा लॉकडाऊनमुळे पहिल्यांदा हे काम थांबलं आहे. त्यांचं 7 जणांचं कुटुंब यावर अवलंबून आहे.
लॉकडाऊननंतर पुण्यातल्या अशा अनेक मेस बंद पडल्या आहेत. पुण्यात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागातून येतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही इथे मोठी आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अनेक कुटुंबांचा रोजगार अवलंबून असल्याचं दिसतं.
सध्या विद्यार्थी गावी गेल्याने पुण्यातील मेस, घरमालक, खाजगी लायब्ररी, स्टेशनरी दुकाने यांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या भीतीने अनेकांनी मेस पूर्णपणे बंद ठेवल्या. पण या आजींनी केवळ 4 मुलांसाठी मेस चालू ठेवली आहे.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ आणि नितीन नगरकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)