कोरोनाच्या काळात कला प्रदर्शन जिवंत ठेवण्यासाठी संग्रहालयाची युक्ती

Published

मोठ्या संकटाच्या वेळी लोक कलेच्या आणखी जवळ जातात असं मानसशास्त्र सांगतं. कलेतून लोक मनोधैर्य टिकवतात आणि प्रेरणा मिळवतात.

कोव्हिड-19 पूर्वी विन्सेंट वॅन गॉ यांच्या चित्रांचं 'इमर्सिव्ह वॅन गॉ' नावाचं एक फिरतं प्रदर्शन जगभर सुरू होतं. फ्रान्समध्ये या प्रदर्शनाला वीस लाख लोकांनी भेट दिली. पण, हळू हळू कोव्हिडच्या साथीने हे प्रदर्शनही ठप्प पडलं.

कॅनडातील टोरंटो शहरातल्या एका आर्ट गॅलरीने त्यावर एक नामी शक्कल काढली. भव्य डिजिटल प्रदर्शन त्यांनी सुरू केलं ते ड्राईव्ह इनच्या स्वरुपात. म्हणजे स्वत:च्या गाडीत बसून सुरक्षितपणे तुम्ही वॅन गॉ यांच्या चित्रांचा आनंद लुटू शकता. टोरंटोमध्येही आता या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आपणही सफर करूया पहिल्या वहिल्या ड्राईव्ह इन 'इमर्सिव्ह वॅन गॉ' प्रदर्शनाची....

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)