भारत-चीन सीमावाद : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून भारताची समस्या सुटेल? #सोपीगोष्ट 96

व्हीडिओ कॅप्शन, भारत vs चीन : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून भारताची समस्या सुटेल? #सोपीगोष्ट 96
Published

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी अधेमधे होत असते, चीनविरोधात थोडी फार आंदोलनंही होतात पण काही काळानं हे सगळं शांतही होतं.

सध्याही असंच काहीसं घडतंय. लडाखमध्ये चीननं घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या आणि भारत चीन सीमेवर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेलेत. आणि म्हणूनच भारतामध्ये सध्या चीनविरोधी वातावरण निर्माण झालंय.

आज सोपी गोष्टमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होतेय पण असा सरसकट बहिष्कार टाकणं शक्य आहे का? याचा भारत आणि चीनच्या व्यापारी संबंधांवर नेमका काय परिणाम होईल? आणि सगळ्यात बेसिक म्हणजे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने भारत आणि चीन दरम्यानची मूळ समस्या सुटणार आहे का?

संशोधन- झुबेर अहमद

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)