युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाटो सदस्यांना आवाहन

रशिया आणि युक्रेनदरम्यान वीकेंडला चर्चा होण्याची शक्यता आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ सापडलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. ब्रेकिंग, अमेरिकेनं न्यूक्लिअर रिस्पॉन्स टीम केली कार्यन्वित

    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी युक्रेनच्या ऊर्जामंत्र्यांशी झोपोरिजझिया प्रकल्पातील आगीबाबत चर्चा केली आणि अमेरिकेच्या न्यूक्लिअर इन्सिडन्ट रिस्पॉन्स टीमला कार्यन्वित केलं जाणार असल्याची माहिती दिली.

    “अणूऊर्जा प्रकल्पाशी लष्करी कारवाई म्हणजे हलगर्जीपणा असून, हे थांबवलं पाहिजे,” असं ग्रॅनहोम म्हणाल्या.

    “प्रकल्पाच्या अणूभट्ट्या कंटेन्मेंट स्ट्रक्चर्सच्या मार्फत संरक्षित आहेत आणि अणूभट्ट्या सुरक्षितपणे बंद केल्या जात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

  2. व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय? युक्रेनमध्ये व्हॅक्यूम बॉम्बचा वापर होतोय का?

  3. मराठी मुलं MBBS साठी युक्रेन आणि रशियाला जातात, कारण...

    युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

    रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर शेकडो विद्यार्थी युक्रनेच्या विविध राज्यांमध्ये संकटात आले.

    एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जातात हे समोर आल्यानंतर यानिमित्तानं अनेक मुद्यांवर सध्या चर्चा सुरू आहे.

    भारतात एमबीबीएस शिक्षणासाठी खरंच कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो का? महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयांची फी किती आहे? आणि शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  4. VIDEO : युरोपातील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पात आग

    झेलेन्स्कींनी फेसबुकवर शेअर केलेला अणूऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचा व्हीडिओ :

    युरोपमधील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पातील सहा रिअॅक्टर्सजवळ आग लागल्याची घटना घडलीय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी फेसबुकवर या घटनेचा व्हीडिओ शेअर केला आहे.

    हा अणूऊर्जा प्रकल्प दक्षिण-पूर्व युक्रेनमध्ये आहे. रशियाकडून होणाऱ्या गोळीबारामुळे आग विझवण्यात अडथळे येत असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतोय.

    झेलेन्स्कींनी फेसबुकवर शेअर केलेला अणूऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचा व्हीडिओ :

  5. युरोपवासियांनो, कृपया...जागे व्हा - वोलोदिमीर झेलेन्स्की

    युरोपमधील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पावर रशियानं केलेल्या हल्ल्याबाबत जगानं ‘तातडीनं कारवाई’ करावी, असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केलंय.

    “युरोपातील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे,” अशी माहिती देणारा व्हीडिओ झेलेन्स्कींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

    रशियन सैन्य सातत्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पातील सहा रिअॅक्टर्सवर गोळीबार करत असल्याचा आरोप झेलेन्स्कींनी केलाय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    “युरोपवासियांना, कृपया, जागे व्हा. युक्रेनमधील अणूऊर्जा प्रकल्पावर रशिया हल्ले करत असल्याचं तुमच्या राजकीय नेतृत्वांना सांगा,” अशी कळकळीची विनंती झेलेन्स्कींनी केलीय.

    अमेरिका, ब्रिटन, युरोपियन कमिशन, जर्मनी आणि पोलंडसह अणूऊर्जा यंत्रणेशी आपण संपर्कात असल्याचंही झेलेन्स्कींनी सांगितलं.

  6. आतापर्यंत 10 लाख लोकांनी युक्रेन सोडलं...

    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या आठ दिवसात 10 लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिलीय.

    युक्रेनमधून बाहेर पडलेले शराणार्थी पोलंड, हंगेरी, रोमानिया आणि मोल्दोवासारख्या शेजारील देशांच्या दिशेनं जात आहेत.

    युद्धामुळे देश सोडणाऱ्या युक्रेनच्या शरणार्थींना तीन वर्षांपर्यंत अस्थायी रहिवासी परमिट देण्याचं युरोपियन कमिशननं ठरवलंय. तसंच, या शरणार्थींना शिक्षण आणि आरोग्य सुविधाही पुरवल्या जातील.

    ब्रझेल्समध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत युरोपियन कमिशनमधील गृहमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली. युरोपियन कमिशनमध्ये याआधी अशा प्रकारची सुविधा देण्यात आली नव्हती.

  7. अणूऊर्जा प्रकल्प ‘सुरक्षित’ – अधिकारी

    झोपोरिजझिया प्रदेश प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्प ‘सुरक्षित’ आहे.

    अलेक्झांडर स्टारुख यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, झोपोरिजझिया प्रकल्पाच्या संचालकांशी आताच बोलणं झालं. त्यांनी प्रकल्पाच्या सुरक्षेची खात्री दिली.

    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, Twitter

    दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा यंत्रणेनं (IAEA)याबाबत युक्रेनच्या नेतृत्वाशी चर्चा केली. प्रकल्पातील ‘महत्वाची’ साधनं अजूनही कार्यरत आहेत, असं युक्रेनकडून IAEA ला सांगण्यात आलं.

  8. मायभूमी सोडून जाताना...

    संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 10 लाख लोक युक्रेन सोडून शेजारील देशांमध्ये स्थलांतरित झाली आहेत.

    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, DAN KITWOOD

    फोटो कॅप्शन, युक्रेन सोडून पोलंडमध्ये जाणाऱ्या आपल्या चिमुकल्याला निरोप देताना वडील...
    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, WOJTEK RADWANSKI

    फोटो कॅप्शन, युक्रेन-पोलंड सीमेवर निरोपादरम्यान जीवलगाची गळाभेट घेताना...
    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, WOJTEK RADWANSKI

    फोटो कॅप्शन, पोलांड सीमेवर टेंटमध्ये दोन घटका विश्रांती घेताना युक्रेनमधील दोन वृद्ध...
    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, WOJTEK RADWANSKI

    फोटो कॅप्शन, युक्रेनमधील महिला श्वानालाही सोबत घेऊन जाताना...
    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, WOJTEK RADWANSKI

    फोटो कॅप्शन, हे कुटुंब युक्रेनमधून पोलंडकडे पायी जाताना...
    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, SOPA IMAGES

    फोटो कॅप्शन, मायदेश सोडून जातोय, याची कदाचित या चिमुकल्या जीवांना कल्पनाही नसेल. त्यांना आता त्यांचं भविष्य नव्या भूमीवर बनवायचंय...
  9. आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा यंत्रणेनं साधला झापोरिजझिया प्रकल्पाशी संपर्क

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याकडून झालेल्या गोळीबाराच्या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली वाढल्या आहेत.

    आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा यंत्रणेनं (IAEA) झोपोरिजझिया प्रकल्पाशी संपर्क साधला आहे.

    या प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियाद्वारे रशियन सैन्याला आवाहन केलंय की, "तीव्र शस्त्रांचा मारा थांबवा."

    "रशियाच्या गोळीबारानंतर ज्या रिअॅक्टरला आग लागली, त्याची दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे तो चालू नव्हता. मात्र, त्या अणू इंधन होतं," असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

  10. एकीकडे युद्ध, दुसरीकडे निवडणूक

    cartoon
  11. रशियाच्या या 8 भीषण हवाई हल्ल्यांमुळे युक्रेनचं मोठं नुकसान

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  12. मराठी डॉक्टरने युद्धात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी चीन गाठलं तेव्हा...

  13. ब्रेकिंग, युरोपातील सर्वात मोठ्या अणू ऊर्जा प्रकल्पाला आग

    युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    युक्रेनमधील इनरडोहार शहरातील अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागल्याची माहिती मिळत आहे.

    सध्या युक्रेनमध्ये चार अणू प्रकल्प सुरू आहेत. त्यात इनरडोहार शहरातील झापोरिज़झिया प्रकल्पाचा समावेश आहे.

    झापोरिज़झिया हा युरोपातला सर्वात मोठा अणू ऊर्जा प्रकल्प आहे.

    ‘प्रकल्पाच्या इमारती आणि संयंत्रांना शत्रूच्या सततच्या बाँबहल्ल्यांमुळे’ आग लागली असा शहराचे महापौर दिमित्रो ओर्लोव यांचा कयास आहे.

    ओर्लोव यांनी रशियाच्या शहरावरील चढाईची माहिती दिली.

    यामध्ये रशियन रणगाड्यांनी शहरात घुसून प्रकल्पावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु स्थानिकांनी व प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रस्ता अडवून तिकडे जाण्याची वाट रोखली.

    या प्रकल्पात चेर्नोबिलचा अणूकचराही आणला जातो. चेर्नोबिल प्रकल्पावर आता रशियाचं नियंत्रण आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. युक्रेनला कोण मदत करतंय?

    ukraine

    फोटो स्रोत, Getty Images

    शनिवारी (26 फेब्रुवारी) युक्रेन सरकारने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक संदेश पोस्ट केला."युक्रेनच्या नागरिकांना साथ द्या. आता आम्ही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातूनही देणगी स्वीकारत आहोत. बिटकॉईन, इथीरियम आणि अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून दान द्या."

    सरकारने क्रिप्टो वॉलेटचा पत्ता पोस्ट केल्यानंतर 54 लाख डॉलर एवढी देणगी जमा झाली आहे.8 तासांच्या आतच बिटकॉईन, इथिरियम आणि इतर क्रिप्टो करन्सीद्वारे युक्रेनला देणगी जमा झाली.

    युक्रेनला युद्धात मदत करण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल, असं युक्रेनच्या डिजिटल मंत्रालयाने सांगितलं. परंतु हे पैसे कसे वापरले जाणार हे मात्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

    इलिप्टिकचे संस्थापक टॉम रॉबिन्सन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "काही समूहदान माध्यमं आणि पेमेंट कंपन्यांनी युक्रेनचं समर्थन करणाऱ्या काही गटांसाठी पैसे जमा करण्याची प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून पैसे जमवले जात आहेत."

    सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा-युक्रेनला युद्धासाठी अशी मिळत आहेत कोट्यवधींची मदत

  15. ‘रशियाला त्यांच्या सुरक्षेची वाटणारी चिंता रास्त’

  16. रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा आज नववा दिवस, बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी नामदेव काटकर आणि ओंकार करंबेळकर या Live Pageच्या माध्यमातून देत आहेत.

    युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आज नववा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ले वाढल्यानंतर लाखो लोक युक्रेन सोडून पलायन करत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या लाइव्ह पेजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तत्पूर्वी काय घडले हे आपण पाहू.

    रशियाने युक्रेन केलेल्या हल्ल्याच्या कालच्या आठव्या दिवशी काय काय घडलं?

    • पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच हे युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय.
    • युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची दुसरी फेरी बेलारूसमध्ये सुरू झालीय. युद्ध ताबडतोब थांबवण्यात यावं, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरांतून आणि गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडोर उपलब्ध करून द्यावा यासारख्या मुदद्यांवर चर्चा होणार आहे.
    • युक्रेनमधल्या सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने एक गुगल फॉर्म भरावा अशी सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिलीय.
    • युक्रेनमधून आतापर्यंत 6,200 भारतीयांना परत आणण्यात आल्याचं भारत सरकारने म्हटलंय. भारतात आज 10 फ्लाईट्सद्वारे दाखल होणाऱ्या 2,185 नागरिकांचाही यात समावेश आहे.
    • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 5.75 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युक्रेनमधून पलायन करत शेजारच्या पोलंडमध्ये आसरा घेतलाय. हा हल्ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय.

    कालचे अपडेट्स जाणून घेण्यासाठीबीबीसी मराठीच्या या पेजलाभेट द्या.