युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाटो सदस्यांना आवाहन

रशिया आणि युक्रेनदरम्यान वीकेंडला चर्चा होण्याची शक्यता आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ सापडलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. नमस्कार! मी अमृता दुर्वे

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा 9वा दिवस आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स - घडामोडी, फोटो, नकाशे आणि व्हीडिओज या लाईव्ह पेजवरून मी आणि माझे सहकारी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.

    आतापर्यंत काय-काय घडलंय? या आहेत महत्त्वाच्या घडामोडी

    • रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.
    • युक्रेनस्थित झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्यानं आग लागली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात युक्रेनच्या अग्निशमन दलाला यश आलं.
    • युक्रेनच्या समुद्रकिनारी एका स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडलं. एस्टोनियास्थित व्हिस्टा शिपिंग एजन्सी या जहाजाची मालक आहे. एस्टोनिया बाल्टिक देश असून, नेटाचा सदस्य सुद्धा आहे. या देशाची सीमा रशियाला लागून आहे.
    • रशियातील कम्युनिकेशन ऑथोरिटीनं बीबीसीच्या रशियन सर्व्हिसवर वार्तांकनास निर्बंध आणले आहेत. रशियन सरकारच्या RIA या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली. बीबीसीसोबत Meduza आणि रेडिओ लिबर्टी या दोन सेवांनाही रशियात ब्लॉक करण्यात आलंय.
    • काँग्रेसचे सरचिटणसी रणदीप सिंग सुरजेवालांनी मोदी सरकारवर टीका केलीय. 'हे देशाचे मंत्री आहेत की, ट्रॅव्हल एजंट?' असं सुरजेवालांनी म्हटलंय.
  2. रशियाने ताब्यात घेतलेलं चेर्नोबिल पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा

  3. हे मंत्री आहेत की ट्रॅव्हल एजंट? काँग्रेसची टीका

    काँग्रेसचे सरचिटणसी रणदीप सिंग सुरजेवालांनी मोदी सरकारवर टीका केलीय. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ ट्वीट करत सुरजेवालांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

    या व्हीडिओत व्ही. के. सिंग युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सीमेपर्यंत येण्यासाठी का सांगितलं गेलं होतं, याची माहिती देत आहेत.

    यावरून सुरजेवालांनी टीका केलीय. ते म्हणतात की, हे देशाचे मंत्री आहेत की, ट्रॅव्हल एजंट?

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. युक्रेनमध्ये कार्यरत असलेली बीबीसीची टीम

    बीबीसी

    फोटो स्रोत, @lyse.doucet

    युक्रेनमधली कॅमेऱ्यामागची ही बीबीसी न्यूजची टीम आहे. तुमच्यासाठी रशिया-युक्रेन संघार्षाचे क्षणोक्षणीचे अपडेट पाठवत आहेत.

  5. ब्रेकिंग, रशियाचा झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा – युक्रेन

    रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.

    युक्रेनस्थित झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्यानं आगीची घटना घडली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात युक्रेनच्या अग्निशमन दलाला यश आलं.

    मात्र, आता या अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाच्या सैन्यानं ताबा मिळवल्याची माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिली.

    या प्रकल्पातील पॉवर यूनिट्सच्या स्थितीवर संबंधित अधिकारी लक्ष ठेवून असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. रॉयटर्स वृत्तसेवा संस्थेनं ही माहिती दिली.

  6. युक्रेन युद्धात रशियाचं किती मोठं लष्करी नुकसान झालंय?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  7. भर युद्धाच्या काळात युक्रेनच्या नव्या नागरिकांचा जन्म

  8. रोमानियाच्या सीमेवर ज्योदिरात्य शिंदे विद्यार्थ्यांचं स्वागत करताना...

    भारत सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊन, तिथून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्याचं नियोजन करत आहेत.

    केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियात आहेत. त्यांनी काल (3 मार्च) 219 जणांना रोमानियाच्या सीमेवरील सुसिव्हा इथून भारतात पाठवण्याची सोय केली. या नागरिकांना बुखारेस्टपर्यंत आणण्याऐवजी कमी अंतरावरील सुसिव्हा इथूनच मायदेशी पाठवण्यात आलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    या विमानातली बरेचसे नागरिक ओडिसामधील होते. ज्योतिरादित्य शिंदेंनी यातील काही विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

  9. एअरबीएनबीने रशिया आणि बेलारुसमधील सर्व काम थांबवले

    बेलारुस आणि रशियामध्ये आपण कामकाज थांबवत आहोत असं अमेरिकन कंपनी एअरबीएनबीने जाहीर केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    याची माहिती या कंपनीच्या प्रमुखांनी ट्वीट करुन दिली आहे. एअरबीएनबीसारख्या अनेक कंपन्यांनी असा निर्णय घेतला आहे. युरोपातील अनेक देश, अमेरिका यांनी रशियावर अनेक आर्थिक, वाहतूक निर्बंध लादले आहेत.

  10. युक्रेनच्या समुद्रकिनारी स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडालं

    युक्रेनच्या समुद्रकिनारी एका स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडलीय.

    एस्टोनियास्थित व्हिस्टा शिपिंग एजन्सी या जहाजाची मालक आहे. एस्टोनिया बाल्टिक देश असून, नेटाचा सदस्य सुद्धा आहे. या देशाची सीमा रशियाला लागून आहे.

    किनाऱ्यावर स्फोट झाल्यानंतर जहाज समुद्रात बुडालं. मात्र, हा स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीय.

    या जहाजावरील चालक पथकातील दोन सदस्य आणि इतर चार जणांना युक्रेनस्थित बचाव पथकानं वाचवलं.

    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, Henk Jungerius

  11. रशियाने खारकीव्हच्या या भागात क्लस्टर बाँब टाकला असं सांगण्यात येत आहे.

    क्लस्टर
  12. रशियाने युक्रेनमध्ये क्लस्टर बाँबचा वापर केला, असा आरोप केला जात आहे.

    cluster bomb
  13. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक सुरू

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत रशिया-युक्रेन संघर्षाबाबत बैठक सुरू आहे.

    युक्रेनमधील स्थितीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

    बैठक सुरू झाल्याचा व्हीडिओ एएनआय वृत्तसेवा संस्थेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. रशियात वार्तांकनास बीबीसीवर निर्बंध

    रशियातील कम्युनिकेशन ऑथोरिटीनं बीबीसीच्या रशियन सर्व्हिसवर वार्तांकनास निर्बंध आणले आहेत. रशियन सरकारच्या RIA या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली.

    बीबीसीसोबत Meduza आणि रेडिओ लिबर्टी या दोन सेवांनाही रशियात ब्लॉक करण्यात आलंय.

  15. वसईचं मराठी-युक्रेनी कुटुंब युद्‌धभूमीतून कसं बाहेर पडलं?

  16. अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश – आपत्कालीन सेवा

    युक्रेनमधील आपत्कालीन सेवेनं अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश मिळवलंय.

    झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश आलं असून, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती युक्रेनकडून देण्यात आलीय.

  17. युक्रेनमधून हे लोक कुत्रे-मांजरं का घेऊन येतायत?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  18. रशियाकडे किती अण्वस्त्रं आहेत?

    रशियाकडे किती अण्वस्त्रं आहेत?
  19. आज सकाळपासूनचे 5 महत्त्वाचे अपडेट, नमस्कार, रशिया-युक्रेन संघर्षाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

    रशिया युक्रेन

    फोटो स्रोत, AFP/ Zaporizhzhia nuclear authority

    आज रशिया-युक्रेन संघर्षाचा 9 वा दिवस आहे. झोपोरिजझियासह महत्त्वाच्या घडामोडी या संघर्षात आज सकाळपासून घडल्या.

    या घडामोडींवर एक नजर टाकू आणि मग पुढील अपडेट्सकडे वळू.

    • युक्रेनमधील झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागल्याची घटना घडली.
    • युरोपातील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागली असून, जगानं तातडीनं कारवाई करावी, असं झेलेन्स्की म्हणाले.
    • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अणूऊर्जा प्रकल्पावरील गोळीबाराबाबत रशियाचा निषेध नोंदवला.
    • आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा यंत्रणेनं (IAEA) झोपोरिजझिया प्रकल्पाशी संपर्क साधला आणि प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली.
    • अमेरिकेनं न्यूक्लिअर इन्सिडन्ट रिस्पॉन्स टीमला कार्यन्वित केल्याची माहिती अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी दिली.
  20. पापणीच्या पंखांत झोपू दे डोळ्यांची पाखरे

    रशियानं आक्रमण केल्यावर युक्रेन संकटात सापडलाय खरा. पण अशा स्थितीमध्येही काही घरांमध्ये आनंदाचे आणि पाठोपाठ काळजीचे संमिश्र वातावरणही पाहायला मिळतंय.

    युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, एकीकडे आपला देश संकटात सापडला आहे. दुसरीकडे आपल्या घरात बाळ जन्मलं आहे. बाळाच्या आणि देशाच्या भविष्याबद्दल या बाबांच्या मनात नक्की काय बरं चाललं असेल?