ब्रेकिंग, अमेरिकेनं न्यूक्लिअर रिस्पॉन्स टीम केली कार्यन्वित
अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी युक्रेनच्या ऊर्जामंत्र्यांशी झोपोरिजझिया प्रकल्पातील आगीबाबत चर्चा केली आणि अमेरिकेच्या न्यूक्लिअर इन्सिडन्ट रिस्पॉन्स टीमला कार्यन्वित केलं जाणार असल्याची माहिती दिली.
“अणूऊर्जा प्रकल्पाशी लष्करी कारवाई म्हणजे हलगर्जीपणा असून, हे थांबवलं पाहिजे,” असं ग्रॅनहोम म्हणाल्या.
“प्रकल्पाच्या अणूभट्ट्या कंटेन्मेंट स्ट्रक्चर्सच्या मार्फत संरक्षित आहेत आणि अणूभट्ट्या सुरक्षितपणे बंद केल्या जात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.