नमस्कार! मी अमृता दुर्वे
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा 9वा दिवस आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स - घडामोडी, फोटो, नकाशे आणि व्हीडिओज या लाईव्ह पेजवरून मी आणि माझे सहकारी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.
आतापर्यंत काय-काय घडलंय? या आहेत महत्त्वाच्या घडामोडी
- रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.
- युक्रेनस्थित झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्यानं आग लागली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात युक्रेनच्या अग्निशमन दलाला यश आलं.
- युक्रेनच्या समुद्रकिनारी एका स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडलं. एस्टोनियास्थित व्हिस्टा शिपिंग एजन्सी या जहाजाची मालक आहे. एस्टोनिया बाल्टिक देश असून, नेटाचा सदस्य सुद्धा आहे. या देशाची सीमा रशियाला लागून आहे.
- रशियातील कम्युनिकेशन ऑथोरिटीनं बीबीसीच्या रशियन सर्व्हिसवर वार्तांकनास निर्बंध आणले आहेत. रशियन सरकारच्या RIA या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली. बीबीसीसोबत Meduza आणि रेडिओ लिबर्टी या दोन सेवांनाही रशियात ब्लॉक करण्यात आलंय.
- काँग्रेसचे सरचिटणसी रणदीप सिंग सुरजेवालांनी मोदी सरकारवर टीका केलीय. 'हे देशाचे मंत्री आहेत की, ट्रॅव्हल एजंट?' असं सुरजेवालांनी म्हटलंय.