You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाटो सदस्यांना आवाहन

रशिया आणि युक्रेनदरम्यान वीकेंडला चर्चा होण्याची शक्यता आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ सापडलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. युक्रेनच्या 'या' डॉक्टरांनी महाराष्ट्रात येऊन लाखो भारतीयांचे प्राण वाचवले

  2. हे आहेत पुतीन यांच्या सर्वात जवळचे 8 नेते आणि युद्ध चालवणारी माणसं

  3. , रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा 9वा दिवस, आज काय-काय घडलं?

    नमस्कार,

    युक्रेनकडून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे वारंवार मदतीचं आवाहन केलं जातंय. अणुऊर्जा प्रकल्पावरचा हल्ला 6 चेर्नोबिल इतका भीषण ठरू शकला असता असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

    युक्रेनवरच्या हल्ल्याच्या नवव्या दिवसातल्या या आहेत महत्त्वाच्या घडामोडी

    • रशिया आणि युक्रेनदरम्यान वीकेंडला चर्चा होण्याची शक्यता आहे.
    • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ सापडलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय. हे झेलेन्स्कींचं सेकंड होम आहे. सर्गेई नायकीफोरोव्ह यांनी दक्षिण कीव्हमधल्या घराजवळ सापडलेल्या अवशेषांचे दोन फोटो पोस्ट केलेत.
    • रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला विरोध करणाऱ्या देशांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिलाय. रशियावर आणखी निर्बंध लादत परिस्थिती चिघळवू नका, असा इशारा पुतिन यांनी दिलाय.
    • युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, असं म्हणत युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नाटो सदस्यांना मदतीचं आवाहन केलंय.
    • रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मोठं समर्थन मिळालं. कथित युद्ध अपराध (War Crimes) आणि मानवतेच्या विरोधातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय.
    • रशियाने झपोरिझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे चेर्नोबिल दुर्घटनेच्या सहापट मोठे परिणाम होऊ शकले असते, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
    • सशस्त्र सैन्याबद्दल 'खोटी' माहिती परसवल्यास तुरुंगवासाची तरतूद असणारा नवा कायदा रशियाच्या संसदेत - डूमामध्ये मंजूर करण्यात आलाय.
    • रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.
    • रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पातल्या इमारतीला आग लागली होती. यामध्ये काहीजण मारले गेल्याचं आणि जखमी झाल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.
    • सुदैवाने या आगीमध्ये रिअॅक्टरचं नुकसान झालं नसून गळती वा उत्सर्जन झालं नसल्याचं IAEA ने स्पष्ट केलंय.
    • रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करत असल्याचे पुरावे असल्याचं नाटोचे जनरल सेक्रेटरी जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय.
  4. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत घराजवळ सापडलेले अवशेष क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता, प्रवक्यांची माहिती

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ सापडलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय. हे झेलेन्स्कींचं सेकंड होम आहे.

    सर्गेई नायकीफोरोव्ह यांनी दक्षिण कीव्हमधल्या घराजवळ सापडलेल्या अवशेषांचे दोन फोटो पोस्ट केलेत.

    'पण त्यांचा नेम चुकला,' असं म्हणत राष्ट्राध्यक्षांनी प्रतिक्रिया दिल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय.

  5. भारताच्या भूमिकेमुळे युक्रेनमध्ये विद्यार्थी संकटात सापडले का?| सोपी गोष्ट 548

  6. रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करतोय - नाटो

    रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करत असल्याचे पुरावे असल्याचं नाटोचे जनरल सेक्रेटरी जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय.

    काय असतो हा क्लस्टर बॉम्ब?

  7. युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाटो सदस्यांना आवाहन

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत शुक्रवारी नाटेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबादेखील या बैठकीत सहभागी झाले होते.

    एक व्हिडिओ शेअर करत कुलेबा यांनी नाटोच्या सदस्यांकडे युक्रेनसाठी मदत मागितली.

    रशियाला युक्रेनचा सीरिया करायचा असल्याचं कुलेबांनी म्हटलं.

    ते म्हणाले, "रशियाला युक्रेनचा सीरिया करायचा आहे. ज्या प्रकारचं धोरण सीरियात अवलंबण्यात आलं त्याच्यात खूप साधर्म्य आहे. पण आपण त्यांना युरोपात सीरिया करू देता कामा नये. आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, युद्ध सुरू ठेवू. पण आता आम्हाला ठोस, ठाम आणि तातडीची मदत करणाऱ्या भागीदारांची गरज आहे."

    पश्चिमेतल्या देशांनी युक्रेनला मदत केली नाही तर ते नागरिकांच्या मृत्यूंसाठी जबाबदार असतील असं कुलेबांनी म्हटलंय.

  8. #तीनगोष्टी #पॉडकास्ट LIVE: युक्रेनमधली सध्याची परिस्थिती काय?

  9. युक्रेनमध्ये कुठेकुठे अणुऊर्जा प्रकल्प आहेत?

  10. अणुऊर्जा प्रकल्पाला लागलेल्या आगीत काहींचा मृत्यू, युक्रेनची माहिती

    रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पातल्या इमारतीला आग लागली होती. यामध्ये काहीजण मारले गेल्याचं आणि जखमी झाल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

    झापोरिझझिया प्रकल्प सुरळीतपणे सुरू रहावा आणि रेडिएशन पातळी नॉर्मल राहील याकडे कर्मचारी लक्ष ठेवून असल्याचं मंत्र्यांनी फेसबुकवरून सांगितलंय.

    "सततचं शेलिंग आणि युद्धामुळे सामान्य नागरिकांसह या भागातल्या हजारो लोकांना प्रकल्पाजवळच्या भागांतून बाहेर पडणं कठीण झालंय," असं फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय.

    आधीच्या चेर्नोबिल आणि फुकुशिमापेक्षा ही दुर्घटना आणखीन भयानक ठरू शकली असती असं या पोस्टमध्येही म्हटलंय.

    "रशियाने अणुप्रकल्पावर जाणीवपूर्वक हल्ला केला. हे पाऊल IAEA सोबतच्या कराराचं उल्लंघन करणारं आहे," असं या निवदनात म्हटलंय.

    रशियन फौजांना या भागातून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्याला मदत करावी असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

  11. य़ुक्रेनमध्ये बॉम्ब हल्ल्यातून बचावली ही मराठी मुलगी

  12. युक्रेन : युद्धापूर्वी आणि युद्धानंतर, पहा फोटो गॅलरी

  13. ब्रेकिंग, निर्बंध लावून परिस्थिती चिघळवू नका, व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला विरोध करणाऱ्या देशांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिलाय.

    रशियावर आणखी निर्बंध लादत परिस्थिती चिघळवू नका, असा इशारा पुतिन यांनी दिलाय.

    पुतिन एका सरकारी बैठकीत बोलत होते. रशियातल्या रोसिया 24 या सरकारी वाहिनीवर ही बैठक दाखवण्यात आली.

    या बैठकीत पुतिन म्हणाले, "आमच्या शेजाऱ्यांबाबत आमचा कोणताही वाईट हेतू नाही."

    'नातं बिघडवेल' असं कोणतंही पाऊल शेजारी देशांनी उचलू नये असं रशियन सरकारला वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    पुतिन पुढे म्हणाले, "मला वाटतं की संबंध पूर्ववत कसे होतील, एकमेकाला मदत करून संबंध कसे सुधारता येतील याबद्दल सगळ्यांनी विचार करावा, असं मला वाटतं."

    रशियाच्या विरोधात करण्यात आलेल्या काही कारवायांना उत्तर म्हणून रशियन सैन्याची ही कारवाई असल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार पुतिन यांनी केलाय.

  14. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत रशियाच्या निषेधाचा ठराव मंजूर, भारत तटस्थ

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मोठं समर्थन मिळालं. कथित युद्ध अपराध (War Crimes) आणि मानवतेच्या विरोधातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय.

    या मतदानाच्या वेळी फक्त एरिट्रियाने प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. 32 देशांनी या ठरावाच्या समर्थनार्थ मत दिलं. 13 देश तटस्थ राहिले. भारत, चीन, पाकिस्तान, क्युबा आणि व्हेनेझुएलाने मतदानात भाग घेतला नाही.

  15. युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पातून ऊत्सर्जन झालेलं नाही - IAEA

    रशियाने युक्रेनमधल्या अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यानंतर तिथे आग लागली होती.

    या झपोरजझिया अणु प्रकल्पातली आग विझवण्यात आलेले आहे. या प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन झालं नसल्याचं इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी - IAEA ने म्हटलंय.

    IAEA चे डायरेक्टर जनरल राफाएल मरियानो ग्रोसी यांनी याविषयीची माहिती दिली.

    या प्रकल्पामधून रेडएशन झालं नसल्याचं ग्रोसींनी सांगितलंय. या सगळ्या प्लांटच्या सुरक्षितेवरही कोणता परिणाम झाला असून रेडिएशन मॉनिटरिंग सिस्टीम व्यवस्थित काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    या प्रकल्पातल्या एका इमारतीला आग लागली पण ही इमारत रिअॅक्टरचा भाग नव्हती, असं IAEA ने म्हटलंय.

    या प्रकल्पामध्ये एकूण 6 रिअॅक्टर असून यापैकी एकच 60% क्षमतेने सुरू आहे.

    झपोरजझिया अणु प्रकल्पातली परिस्थिती आव्हानात्मक आणि तणावाची असल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचं ग्रोसी म्हणाले आहेत.

    या प्रकल्पावर आता रशियाचा ताबा आहे. आणि इथे आधीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रशियन सैनिकांनी काम करू देत असल्याचं सांगण्यात येतंय.

    युरोपातल्या सर्वात मोठ्या या अणुऊर्जा प्रकल्पावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा नाटोच्या प्रमुखांनी निषेध केलाय.

  16. रशियन फौजा युक्रेनमध्ये किती पुढे पोहोचल्या आहेत?

  17. ब्रेकिंग, अणुऊर्जा प्रकल्पावरचा हल्ला चेर्नोबिलच्या सहापट भीषण ठरू शकला असता - झेलेन्स्की

    रशियाने झपोरिझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे चेर्नोबिल दुर्घटनेच्या सहापट मोठे परिणाम होऊ शकले असते, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

    आपण काय करतोय हे रशियाला माहित होतं आणि असं असूनही त्यांनी थेट प्रकल्पावर हल्ला केला, अशा पातळीवरचा 'दहशतवादी हल्ला कधीही ऐकला नसल्याचं' झेलेन्स्कींनी म्हटलंय.

    रशियाच्या नागरिकांना उद्देशून झेलेन्स्की म्हणाले, "असं होऊच कसं शकतं? 1986च्या चेर्नोबिल दुर्घटनेच्या परिणामांना आपण एकत्र सामोरे गेलो होतो ना? रस्त्यांवर उतरा आणि तुम्हाला जगायचंय हे तुमच्या सरकारला सांगा."

    आपण जगभरातल्या नेत्यांच्या संपर्कात असून त्यांना या घडामोडींनी धक्का बसल्याचं झेलेन्स्कींनी सांगितलं.

    युक्रेनवर 'नो फ्लाय' झोन तयार करावा आणि 'अण्वस्त्रांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या राष्ट्रावर' निर्बंध घालावेत असं आवाहन त्यांनी केलं. "ऊत्सर्जन होईल तेव्हा रशियाच्या सीमारेषांनी फरक पडणार नाही. फक्त रशियापुरतं मर्यादित राहणार नाही. ऊत्सर्जनाना तुमच्या देशाच्या सीमांबद्दल माहिती नाही."

  18. रशियामध्ये नवा कायदा प्रस्तावित, लष्कराबद्दल 'खोटी' माहिती पसरवणाऱ्याला मिळणार ही शिक्षा

    सशस्त्र सैन्याबद्दल 'खोटी' माहिती परसवल्यास तुरुंगवासाची तरतूद असणारा नवा कायदा रशियाच्या संसदेत - डूमामध्ये मंजूर करण्यात आलाय.

    इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 401 संसद सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मत दिलं. कोणीही या प्रस्तावाच्या विरोधात मत दिलं नाही. कोणत्याही संसद सदस्याने मतदानात सहभागी व्हायला नकार दिला नाही.

    आता हा कायदा वरच्या सभागृहात मंजूर होणं गरजेचं आहे.

    हा कायदा लागू झाला तर सशस्त्र दलांबद्दल खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो, असं खालच्या सभागृहातून प्रकाशित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय.

  19. नाटोने युक्रेनमध्ये सैन्य पाठवावं, मारिओपोलच्या उपमहापौरांचं आवाहन

    युक्रेनच्या दक्षिणेला असणाऱ्या मारिओपोल या शहरावर रशियाचे जोरदार हल्ले सुरू आहेत.

    नाटोने आता युक्रेनमध्ये सैन्य पाठवावं अशी विनंती मारिओपोल शहराच्या उपमहापौरांनी केलीय.

    'रशियाच्या सेना थांबणाऱ्या नाहीत, त्या सगळ्या देशाचं वाळवंट करतील आणि अनेक नागरिकांना मारतील,' असं उपमहापौर सर्गेई ओर्लोव्ह म्हणाले आहेत.

    बीबीसी रेडिओ 4च्या टुडे या कार्यक्रमात बोलताना सर्गेई ओर्लोव्ह म्हणाले, "आकाशातून हल्ला करत नागरिकांना मारण्यापासून पुतिन यांना थांबवण्याचा कोणताही उपाय नाही. नाटोने जागं व्हावं आणि लक्षात घ्यावं की हा प्रादेशिक वाद नाही. हे लोकशाही, स्वातंत्र्य आणि युरोपातल्या एका मोठ्या देशाविरुद्धचं युद्ध आहे."

    "पुतिन थांबणार नाही हे कदाचित नाटोच्या नेत्यांच्या लक्षात येत नाहीत. ते (नाटोचे नेते) घाबरलेत आणि हे दयनीय आहे. पुतिन यांना थांबवण्यासाठी युक्रेनला थेट लष्करी मदत देणं गरजेचं आहे किंवा आम्हाला हवेतून होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण देण्यासाठी आमची हवाई हद्द बंद करणं पूर्णपणे गरजेचं आहे हे नाटो नेत्यांच्या एक दिवस लक्षात येईल अशी आम्हाला आशा आहे."

  20. रशिया युक्रेन युद्ध निर्बंध घातल्यामुळे थांबवेल का? सोपी गोष्ट 546