You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
पुतिन यांनी युद्ध संपवण्यासाठी अटी ठेवल्या, युक्रेन सहमत होईल का?
बिअरमध्ये डुंबायचे, बिअरमध्येच पडायचे, पापण्या मिटून जगाला भुलायचे; बिअरबाथ स्पाचा ट्रेंड
स्मार्टफोन वापरायचं या 10 मुलांनी सोडून दिल्यावर काय झालं? बीबीसीनं केला प्रयोग
G-7 गट म्हणजे काय? हा गट युक्रेन आणि गाझामधील युद्ध थांबवू शकतो का?
इस्रायलकडून हमासला हवे आहे कायमस्वरूपी पूर्ण युद्धविरामाचे वचन
रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू
रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या दोन भारतीय नागरिकांचा युक्रेन युद्धात मृत्यू झालेला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रेस रिलीज काढून याबद्दल माहिती दिली आहे.
या पत्रकात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, “आम्ही मृतांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत. मॉस्कोमध्ये आमचे दूतावास रशियाचं संरक्षण मंत्रालय आणि रशियन अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत ज्यायोगे त्यांचे मृतदेह लवकरात लवकर परत येतील.”
पत्रकात पुढे म्हटलं आहे की, “मॉस्कोतल्या भारतीय दूतावासने दिल्लीतल्या रशियन राजदूतासमोर तसंच मॉस्कोतल्या अधिकाऱ्यांसमोर रशियाच्या सैन्यात सामील झालेल्या सगळ्या भारतीय नागरिकांची सुटका आणि त्यांना परत आणण्याचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला आहे.”
भारताने मागणी केलीये की, रशियाने भारतीय नागरिकांच्या भरतीवर बंदी आणावी. अशा घटना दोन्ही देशांच्या सहकार्यासाठी योग्य नाहीत.
त्याबरोबर मंत्रालयाने सगळ्या भारतीयांना रशियातल्या नोकरीबद्दल सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. याच वर्षी मार्चमध्ये समोर आलं होतं की अनेक भारतीयांना काही एजेंट्सनी रशियात नोकरी मिळवून देतो असं सांगत तिथल्या सैन्यात भरती केलं होतं.
आता या लोकांना जबरदस्ती यूक्रेन युद्धात लढायला पाठवलं जातंय. यातल्या काही भारतीय लोकांनी व्हीडिओ शेअर करून भारत सरकारकडे मदत मागितली होती.
इस्रायल-हमास संघर्ष: अमेरिकेच्या युद्धबंदी योजनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा पाठिंबा
मोदींच्या आघाडी सरकारबद्दल अमेरिकेने नेमकं काय म्हटलं?
भारतातील लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (4 जून)आले आणि यासोबतच देशातील आगामी सरकार हे आघाडीचे सरकार असेल हेही स्पष्ट झालं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणारा भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही.
भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत.
निवडणूक विश्लेषक आणि एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरवत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने 234 जागा जिंकल्या आहेत.
संपूर्ण जगाचं भारताच्या निवडणुकीवर लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचा निकाल आता लागला असून जगभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
बुधवारी (5 जून) अमेरिकेच्या सरकारचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी भारतातील निवडणूक निकालांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सांगितलं की, “आम्ही भारतीय मतदारांच्या इच्छेचा आदर करतो, पंतप्रधान आणि त्यांच्या युतीने बनलेलं सरकार हे लोकांच्या निवडीने बनलेलं सरकार असेल. बायडन प्रशासन मोदींसोबत काम करत आलं आहे आणि त्यात बदल होणार नाही. भविष्यातही आम्ही असंच काम करू.”
लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत संसदेत पुनरागमन केलं आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप '370 जागा' जिंकेल असं भाकीत वर्तवलं होतं.
निकाल मात्र वेगळा लागला. भाजपला स्वबळावर बहुमत मिळू शकलं नाही आणि एनडीए देखील 300 चा आकडा गाठू शकली नाही.
एक क्रिप्टो 'माफिया' जिचे ड्रग माफियांसोबत होते कथितरित्या संबंध, अचानक गायब झाली अन् पुढे काय झालं?
युक्रेन रशियातल्या प्रदेशांवर हल्ले करण्याची तयारी करतोय का?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तुरुंगातून लढवता येते का?
पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी, आता ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार का?
युक्रेन: रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनमधील खारकिव्हमध्ये सात जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
युक्रेनमधील खारकिव्ह शहरावर रशियानं क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून डझनावारी लोक जखमी झाले आहेत.
खारकिव्हचे गव्हर्नर ओलेह सिन्येहुबोव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दोन जण बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ओलेह यांनी स्थानिकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेनच्या सरकारी रेल्वे कंपनीने दावा केला आहे की, रशियन हल्ल्यामुळे त्यांच्या अनेक ठिकाणांचं नुकसान झालं आहे आणि त्यांचे अनेक कर्मचारी जखमी देखील झाले आहेत.
युक्रेनला कमकुवत करण्यासाठी रशियाने खारकिव्हवरील हल्ल्यांचं प्रमाण वाढवलं आहे. ओलेह म्हणाले की वोवचांस्क च्या आसपास युद्ध सुरू आहे.
मात्र तेथील परिस्थिती युक्रेनच्या सैन्याच्या नियंत्रणात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी सांगितलं की, रशिया युक्रेनच्या कमकुवत हवाई संरक्षणाचा फायदा घेतो आहे.
युक्रेनचं हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी, झेलेंस्की आपल्या मित्रराष्ट्रांकडे सातत्याने आधुनिक लढाऊ जेट विमानांची मागणी करत आहेत.
तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा केला आहे की, खारकिव्हवर कब्जा करण्याचा त्यांचा इरादा नाही. त्यांना रशियाच्या सीमेवर संरक्षक फळी तयार करायची आहे.
ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय का घेतला?
राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींच्या मृत्यूनंतर इराणसमोर कुठली आव्हानं आणि पुढे काय होईल?
चांद्रमोहीम : भारत, चीन, अमेरिका - कोणत्या देशाचा अंतराळवीर चंद्रावर पुढचं पाऊल टाकेल?
व्लादिमीर पुतिन यांचा चीन दौरा, सर्व जगाचे का आहे याकडे लक्ष?
नकबा: 1948 मध्ये काय घडलं? पॅलेस्टिनी याला 'भयंकर आपत्ती' का म्हणतात?
व्लादिमीर पुतिन यांनी सर्गेई शोइगु यांना रशियाच्या संरक्षण मंत्रालयातून हटवले
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दीर्घकाळापासून त्यांचे सहकारी राहिलेल्या सर्गेई शोईगु यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवलं आहे.
रशियन सरकारने ही घोषणा केली आहे. 68 वर्षीय सर्गेई शोइगु हे 2012 पासून या भूमिकेत आहेत आणि आता त्यांना रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्त केलं जाणार आहे.
रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने प्रकाशित केलेल्या कागदपत्रांमध्ये असं म्हटलं आहे की शोईगु यांच्या जागी आता उपपंतप्रधान आंद्रेई बेलोसोव्ह यांना नियुक्त केलं जाईल.
क्रेमलिनने म्हटलं आहे की संरक्षण मंत्रालयाने सतत 'नाविन्यपूर्ण' बदल केले पाहिजेत. सर्गेई शोईगु यांचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.
कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसतानाही त्याला संरक्षण खात्याचा कार्यभार देण्यात आला होता. बीबीसीचे रशियाचे संपादक स्टीव्ह रोसेनबर्ग म्हणाले की, शोईगु यांची बदली केली जाणं ही आश्चर्यकारक नाही कारण त्यांची स्थिती कमकुवत झाली होती आणि काही काळ अशी चर्चा होती की ते त्यांची नोकरी गमावू शकतात.