युक्रेनच्या राजधानीवर हल्ला करणार- रशियाचा इशारा

कीव्हमधल्या टीव्ही टॉवरच्या परिसरात रशियाचा हल्ला. टॉवरवर थेट हल्ला झाला की नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. युद्धझळा

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, रशियाच्या हल्ल्यात उद्धस्त झालेली गाडी
  2. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियावर बंदी

    युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याप्रकरणी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून रशियाला बाहेर काढण्यात आलं आहे. क्लब विश्वचषक स्पर्धेतूनही रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

    फिफा आणि युएफाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला रशियाला पात्रता फेरीचे सामने खेळू देण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं मात्र हा निर्णय बदलत त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

    रशियाला खेळण्याची परवानगी देण्याच्या निर्णयावर पोलंडने आक्षेप घेतला होता. रशियाविरुद्धच्या सामन्यावर ते बहिष्कार घालतील असं त्यांनी सांगितलं.

  3. रशियाने दागले 56 रॉकेट्स आणि 113 क्षेपणास्त्रं- झेलेन्स्की

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रशियाचे हल्ले

    पाच दिवसात रशियाने 56 रॉकेट आणि 113 क्रूझ क्षेपणास्त्र दागल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं.

    रशियाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्यासाठी तयार विदेशी नागरिकांसाठी 1 मार्चपासून युक्रेनमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी असेल असं झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं.

    युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने रशियाच्या फौजांची मोठी तुकडी कूच करत असल्याचं सॅटेलाईटने पाठवललेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून स्पष्ट होतं आहे.

    युद्धाच्या पाचव्या दिवशी रशियाने प्रतिबंध असलेल्या थर्मोबॅरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला असं युक्रेनचे अमेरिकेतील राजदूतांनी सांगितलं.

    रशियाने व्हॅक्यूम बॉम्बचा प्रयोग केला. जिनेव्हा करारानुसार याचा वापर करण्यावर बंदी असं युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूतांनी सांगितलं.

    बीबीसी न्यूज या दाव्याची स्वतंत्र्यरित्या पडताळणी करू शकले नाही.

    थर्मोबेरिक शस्त्रास्त्रांमध्ये पारंपरिक दारूगोळा नसतो. उच्च दाबाने स्फोटकं भरलेली असतात. भवतालातला ऑक्सिजन घेऊन विनाशकारी स्फोट घडवून आणण्यासाठी याचा वापर केला जातो.

    ह्यूमन राईट्स वॉचनुसार चेचेन्यात याआधी या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला होता.

    रशियातील बेलगोरोड शहराजवळ थर्मोबेरिक लॉन्चर पाहिल्याचं वृत्त सीएनएनने दिलं होतं.

  4. आतापर्यंत काय काय घडलं?

    रशिया युक्रेन संघर्ष

    रशिया-युक्रेन संघर्षाचा आजचा सहावा दिवस आहे, आजच्या घडामोडी पाहाण्यापूर्वी आपण काल काय घडले हे पाहू.

    • रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची युक्रेन-बेलारुसच्या सीमेवर बैठक सुरू झाली आहे. शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर युक्रेननं या बैठकीत जोर दिलाय.
    • अण्वस्त्रांची भाषण करणं म्हणजे पुतिन यांचा वेडेपण असल्याची टीका युक्रेनचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी सदस्य सर्गेई किस्लीत्सयांनी केलीय.
    • रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची शिफारस इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) ने इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनकडे केलीय.
    • रशियानं 36 देशांच्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. ब्रिटन, स्पेन, इटली आणि कॅनडा या देशांचा या 36 देशांमध्ये समावेश असून, या देशांच्या एअरलाईन्सवर रशियानं बंदी घातलीय.
    • युक्रेनमधून आतापर्यंत 1400 भारतीयांना मायदेशात आणल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली.
    • पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना झेलण्यास आम्ही सक्षम असून, त्यावर लवकर मार्ग काढू, असं रशियानं म्हटलंय.
    • युक्रेनवरील 'आक्रमणा'नंतर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा परिणाम रशियात दिसू लागलाय. रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याज दर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवलंय.

    कालच्या घडामोडी सविस्तरपणे वाचण्यासाठी बीबीसी मराठीच्या या पेजला भेट द्या. धन्यवाद.