युक्रेनच्या राजधानीवर हल्ला करणार- रशियाचा इशारा

कीव्हमधल्या टीव्ही टॉवरच्या परिसरात रशियाचा हल्ला. टॉवरवर थेट हल्ला झाला की नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. युक्रेनमधले निर्वासित 'या' मार्गांनी बाहेर पडू शकतात...

    नकाशा
  2. खारकीव्हवर मिसाईल हल्ला, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून व्हीडिओ ट्वीट

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    खारकीव्ह शहरातील फ्रीडम स्क्वेअर भागामध्ये झालेल्या स्फोटाचा व्हीडिओ युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्वीट केला आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर ‘वॉर क्राइम’चा आरोप केला आहे. जगाने रशियावर बहिष्कार टाकावा अशी मागणी ते करत आहेत.

    सूचना- या व्हीडिओमधली काही दृश्यं विचलित करणारी आहेत. बीबीसीने या व्हीडिओची पुष्टी केली आहे, मात्र त्याचा स्रोत अज्ञात आहे.

  3. ब्रेकिंग, खारकीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

    युक्रेनमधील खारकीव्ह शहरात आज सकाळी झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यानं प्राण गमावले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

    परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असं बागची यांनी म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    अरिंदम बागची यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनमधल्या दूतांशी चर्चा करत आहेत. खारकीव्ह आणि संघर्षग्रस्त असलेल्या अन्य भागांमध्ये भारतीय नागरिकांना तिथून सुरक्षित बाहेर काढण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला जात आहे.

    युक्रेन आणि रशियामध्ये असलेले भारतीय राजदूतही हीच मागणी करत होते.

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

  4. रशिया-युक्रेन संघर्षात आज काय काय घडलं? जाणून घेऊ थोडक्यात-

    • युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने शहर सोडावे असा आदेश युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिला आहे. येत्या काही दिवसांत राजधानी कीव्हचा ताबा मिळविण्यासाठीचा संघर्ष तीव्र होऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने भारतीयांना हा सल्ला पाळण्याचं आवाहन केलं आहे.
    • युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठीच्या प्रयत्नांमध्ये हवाई दलालाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
    • कमीतकमी कालावधीत जास्तीत जास्त भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' ही मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे.
    • युक्रेनच्या क्षेत्रफळापैकी 75 टक्के भागावर रशियाचं सैन्य पोहोचलं आहे. कीव्ह तसंच खारकीव्ह शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाकडून जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत.
    • युक्रेनमधलं दुसरं मोठ्या क्रमांकाचं शहर खारकीव्हमध्ये रशियाने जोरदार हल्ले केले आहेत. फ्रीडम स्क्वेअर परिसरातील सरकारी इमारती रशियाच्या हल्ल्याचं लक्ष्य होत्या.
    • रशियाच्या ओखत्यार्का शहरातील लष्करी तळावरील हवाई हल्ल्यात युक्रेनच्या 70 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
    • शांततामय चर्चेसह युक्रेन तयार आहे. पण आम्ही समर्पण करणार नाही. रशियांच्या अटींसमोर झुकणार नाही," असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबो यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
    हल्ल्यानंतर सुरू असलेलं बचावकार्य

    फोटो स्रोत, Dmytro Zhyvytskyi/Telegram

  5. युक्रेनला युद्धासाठी अशी मिळत आहेत कोट्यवधींची मदत

  6. लष्कराचा अनुभव नसलेले लोकही देशासाठी रणांगणावर

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी हजारोंच्या संख्येने युक्रेनचे सामान्य नागरीक संरक्षण दलांमध्ये सामील होत आहेत. लष्कराचा काहीही अनुभव नसलेल्या लोकांचाही त्यात समावेश आहे. हातातली लेखणी टाकून हे पुरूष युद्धभूमीवर लढायला तयार होत आहेत.

  7. खारकीव्हमध्ये सरकारी इमारती लक्ष्य

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, खारकीव्हमधील इमारतीची अवस्था

    युक्रेनमधलं दुसरं मोठ्या क्रमाकांचं शहर खारकीव्हमध्ये रशियाने जोरदार हल्ले केले. फ्रीडम स्क्वेअर परिसरातील सरकारी इमारती रशियाच्या हल्ल्याचं लक्ष्य होतं.

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये क्षेपणास्त्र सरकारी इमारतीवर आदळताना दिसत आहे. जोरदार धमाक्यामुळे धुराचे लोळ परिसराला वेढून टाकतात.

    इमारतीचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि गाड्या उडून विखुरल्या गेल्या आहेत. या हल्ल्यात अद्यापतरी जीवितहानीचं वृत्त नाही. हल्ल्यानंतरच्या परिस्थितीच्या व्हीडिओची शहानिशा बीबीसीने केली.

    गेल्या काही दिवसांपासून रशियाच्या फौजांनी खारकीव्हला लक्ष्य केलं आहे. या शहराची लोकसंख्या 16 लाख एवढी आहे.

    स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता हा हल्ला झाला.

  8. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी वायूदलाची C17 विमानं जाणार

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठीच्या प्रयत्नांमध्ये हवाई दलालाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे.

    वायूदल C17 विमानं युक्रेनला रवाना होणार आहेत.

    वायूदल C17 विमानं युक्रेनला रवाना होणार आहेत. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी स्लोव्हाकियाच्या कोसाइसमधून भारतासाठी स्पाइसजेट कंपनीचं विमान रवाना होणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रीजिजू विशेष दूत म्हणून रवाना झाले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. लष्कराच्या मदतीसाठी युक्रेनने जारी केले वॉरबॉन्ड्स

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    युक्रेनच्या क्षेत्रफळापैकी 75 टक्के भागावर रशियाचं सैन्य पोहोचलं आहे. कीव्ह तसंच खारकीव्ह शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाकडून जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत.

    युक्रेनने लष्कराला आर्थिक मदत मिळवण्याच्या दृष्टीने वॉर बॉन्ड्स जारी केले आहेत. आजपासून या बॉँड्सची विक्री होणार आहे. रशियाविरुद्ध लढणाऱ्या लष्करासाठी निधीउभारणी हे बॉन्ड्स जारी करण्यामागचं उद्दिष्ट आहे.

    युक्रेनच्या वित्त मंत्रालयाने ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वार्षिक बॉन्डची किंमत 1000 युक्रेनियन हरिवनिया म्हणजेच 33.27 डॉलर असणार आहे. बॉन्डवर मिळणारं व्याजाची रक्कम लिलावात निश्चित होईल.

  10. 'भारतीयांच्या निष्ठेवर कधी शंका घेऊ नका,' प्रियंका चतुर्वेदी पोलंडच्या राजदुतांवर कडाडल्या

  11. कीव्ह शहर ताबडतोब सोडा- भारतीय दूतावासाचा भारतीयांना आदेश

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने शहर सोडावे असा आदेश युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिला आहे.

    काही मिनिटांपूर्वीच दूतावासाने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. रशियाच्या फौजा सातत्याने कीव्ह शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या काही दिवसात राजधानी कीव्हचा ताबा मिळवण्यासाठीचा संघर्ष तीव्र होऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने भारतीयांना हा सल्ला पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

    ट्रेनने किंवा अन्य कोणत्याही उपलब्ध वाहतूक प्रणालीद्वारे कीव्ह शहरातून बाहेर पडा असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

    युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी पोलंड, हंगेरी, रोमानिया या देशांमध्ये खुश्कीच्या मार्गाने जाऊन तिथून मायदेशी परतत आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा कार्यान्वित करण्यात आलं आहे.

  12. ओखत्यार्का शहरातील लष्करी तळावरील हल्ल्यात 70 सैनिकांचा मृत्यू

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रशियाच्या शक्तिशाली हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू झाला आहे.

    रशियाच्या हवाई हल्ल्यात ओखत्यार्का शहरातील लष्करी तळावरील हल्ल्यात युक्रेनच्या 70 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

    समी भागात हे शहर वसलं आहे. रशियाच्या फौजांनी या प्रदेशावर ताबा मिळवला आहे.

    युक्रेनच्या संसदेने केलेल्या ट्वीटमध्ये सैनिकांच्या शौर्याला आदरांजली व्यक्त केली आहे.

  13. खारकीव्हची दृश्यं

    युक्रेन, रशिया,

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, खारकीव्ह

    रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या रणगाड्याची झालेली स्थिती दिसते आहे. खारकीव्ह शहरात रशियाने जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

  14. युक्रेनमध्ये अडकलेल्या 187 भारतीय विद्यार्थ्यांची तुकडी मुंबईत दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान मुंबईत दाखल झालं. या विमानात 182 विद्यार्थी होते. युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनहून भारतात येणारं हे सातवं विमान आहे.

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुपपणे मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे.

    युक्रेनच्या विविध भागात अडकलेल्या भारतीयांना रोमानिया, पोलंड, हंगेरी आणि माल्दोव्हा या देशांमध्ये रस्ते मार्गाने नेऊन तिथून विशेष विमानाने भारतात आणण्यात येत आहे.

    या कामात सूसत्रता येण्यासाठी हरदीप सिंग पुरी, किरण रीजिजू, ज्योतिरादित्य सिंदिया आणि जनरल व्ही.के.सिंग हे केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये रवाना होणार आहेतत

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. युक्रेनमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

    ऑक्सिजन सिलिंडर्स वाहून नेणारी गाडी

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

    रशियाच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या युक्रेनमध्ये नवे संकट तयार झाले आहे.

    कोव्हिड, गंभीर आजार तसेच युद्धात जखमी झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

    ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांतून रुग्णालयांपर्यंत हा वायू वाहून नेणं अशक्य झालं आहे. तसेच राजधानी कीव्हमध्येही असेच संकट उभं राहिलं आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

    येत्या 24 तासांमध्ये ऑक्सिजनचा साठा संपू शकतो असंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य संचालक टेड्रोस घेब्रेयसुस आणि युरोप प्रादेशिक संचालक हॅन्स क्लुग म्हणाले, “ऑक्सिजन पुरवठा आता धोकादायक पातळीवर आहे. काही रुग्णालयांमध्ये आधीच ऑक्सिजन संपला आहे. यामुळे हजारो रुग्णांचे प्राण पणाला लागले आहेत.”

  16. युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने रशियाच्या फौजांचा ताफा

    कीव्ह, रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, satelite image

    फोटो कॅप्शन, कीव्ह शहराचं सॅटेलाईट चित्र

    रशियाच्या फौजांचा प्रचंड ताफा युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने चाल करत आहे. 40 मैल लांब इतका या फौजेचा आवाका आहे. सॅटलाईट फोटोंच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं आहे.

  17. ‘समर्पण करणार नाही, रशियाच्या अटींसमोर झुकणार नाही’

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, युक्रेनचा सैनिक

    "शांततामय चर्चेसह युक्रेन तयार आहे. पण आम्ही समर्पण करणार नाही, रशियाच्या अटींसमोर झुकणार नाही", असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबो यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

    सोमवारी बेलारुस इथे रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा होत असताना कुलेबो यांनी हे वक्तव्य केलं.

    चर्चा किती काळ चालेल माहिती नाही. या युद्धात युक्रेनचाच विजय होईल असं ते म्हणाले.

    "मी एक डिप्लोमॅट आहे, चर्चेवर माझा विश्वास आहे. रशियावर अधिकाअधिक प्रतिबंध लागू करायला हवेत. युक्रेनला अधिकाअधिक शस्त्रास्त्रं मिळायला हवीत. जेणेकरून रशियाला रोखता येईल", असं कुलेबो यांनी सांगितलं.

    रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर जोरदार हल्ले केले आहेत. युक्रेनचे अनेक नागरिक सुरक्षेसाठी अन्य देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत. युद्धाचा परिणाम आणि आर्थिक निर्बंधामुळे रशियाचं चलन असलेल्या रुबलमध्ये 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

  18. मास्टरकार्डने केलं रशियाला ब्लॉक

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, get

    फोटो कॅप्शन, मास्टरकार्ड

    युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याप्रकरणी मास्टरकार्ड कंपनीने रशियाशी संबंधित व्यवहारांवर बंदी घातली आहे.

    अमेरिका, युके, युरोपियन युनियन, कॅनडा यांनी स्विफ्ट आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून रशियाच्या बँकांवर बंदी घालण्यात आली होती.

    रशियाच्या केंद्रीय बँकेला विदेशात व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

  19. रशियाचा रणगाडा आणि युक्रेनचा ड्रायव्हर

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    युक्रेनमधल्या उत्तरेकडील सुमी प्रदेशातली ही घटना आहे. युक्रेनच्या एका टॅक्सी ड्रायव्हरची रस्त्याने जाणाऱ्या रशियन फौजांशी भेट झाली. त्यांच्या दोघातले संभाषण सध्या व्हायरल झालंय.

    रशिय वाहनांचा ताफा पेट्रोल संपल्यामुळे थांबला होता

  20. ऑस्ट्रेलिया युक्रेनला शस्त्रं पाठवणार

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलिया

    रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला ऑस्ट्रेलिया शस्त्रं पुरवणार आहे. 50 दशलक्ष डॉलर्स डॉलर्स इतक्या रकमेची शस्त्रं ऑस्ट्रेलिया युक्रेनला देणार आहे.

    "मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आम्ही त्यांना शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून मदत पुरवणार आहे. मात्र नक्की काय पुरवलं जाणार आहे याचा तपशील त्यांनी दिला नाही. रशियाला माहिती मिळायला नको", असं स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं.