युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मार्शल लॉ लागू करण्याच्या तयारीत
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेची बैठक बोलावणार असून त्यात मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
परिषदेच्या तातडीच्या बैठकीत मार्शल लॉ लागू करण्याबाबत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
रशियानं युक्रेनवर पूर्णपणे हल्ला सुरू केला आहे, असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं म्हणणं आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"पुतीन यांनी नुकताच युक्रेनवर पूर्ण हल्ला करण्यास सुरुवात केली आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
"युक्रेनमधली शांत शहरं ही हल्ल्याच्या सावटाखाली आहेत. युक्रेन स्वतःचं रक्षण करू शकतं आणि आम्ही विजयी होऊ. जग पुतिन यांना थांबवू शकतं आणि त्यांनी तसं करायला हवं. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे," असं ते म्हणाले.