युक्रेनने रशियासोबतचे सर्व कूटनितीक संबंध तोडले
रशियासोबतचे सर्व कूटनितीक संबंध आपण तोडत असल्याची घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि लढण्यास सक्षम असलेल्या सर्वांना शस्त्र हाती घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
युक्रेनच्या सरकारी माध्यमांनुसार राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की शस्त्र उचलण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते उपलब्ध करून देऊ.