मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही दिवास्वप्न पाहू नये-उदय सामंत

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, ती अफवा आहे. आम्ही अजिबात नाराज नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. शरद पवार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पडतील तेव्हा अधिक समर्थक येतील- अनिल देशमुख

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. दोन वेगळे पक्ष नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच - रुपाली चाकणकर

  3. अजित पवारांसोबत आज एमईटी मुंबईच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार येणार?

  4. एकनाथ खडसे म्हणतात, 'फडणवीस महत्त्वाकांक्षी, ते अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत'

    pawar

    फोटो स्रोत, Getty Images

    अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं दिसत आहे. या सगळ्या घडामोडींमागे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा शरद पवार यांनी आरोप केला आहे.

    गेली 40 वर्षं भाजपमध्ये काम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना काय वाटतं? ते कोणत्या पवारांसोबत आहेत?

    बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी एकनाथ खडसे यांची मुलाखत घेऊन, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. तसंच, सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर संवादही साधला.मुलाखत वाचा- पक्षात असा नाराजीचा सूर दिसला नाही.

  5. किती नेते येतील हे तुम्हीच पाहा- छगन भुजबळ

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    आजच्या बैठकीला किती लोक येतील हे तुम्हीच पाहा. इथे येणारे समर्थक आता कागदपत्रांवर सह्या करत आहेत. त्यावरुन नंतर आकडा स्पष्ट होईलच अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी वांद्रे येथील बैठकीच्या स्थळी दिली आहे.

  6. आम्ही नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात होतो- संजय शिरसाट

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात होतो, आजही शरद पवारांच्या विरोधात आहोत. या प्रवेशामुळे आम्ही नाराज आहोत. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तोडगा काढावा. ही नाराजी वाढणं आपल्यासाठी योग्य नाही. आता एकनाथ शिंदे पुढील दिशा ठरवतील. असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.

  7. अजित पवारांमुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे का?

    pawar

    शिंदे गटातील शिवसेना नेत्यांनी गेल्या वेळी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड केलं, त्यामागे पक्षनेतृत्वावरील नाराजीसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा एक कारण होतं.

    अजित पवार आपल्या आमदारांना कामे करण्यासाठी निधी देत नाहीत, आपल्या पक्षातील संभाव्या उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात बळ देतात, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला होता.

    वर्षभरात जेव्हा-जेव्हा बंडाबाबत उल्लेख झाला, त्या-त्या वेळी नेत्यांनी त्यांच्या मनातील ही नाराजी बोलून दाखवल्याचं आढळतं.

    केवळ शिवसेना नेतेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वेळोवेळी अजित पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचं दिसून येतं.

    पण, अचानक झालेल्या या राजकीय घडामोडींनंतर पुन्हा अजित पवार शिवसेना नेत्यांच्या वाट्याला आले आहेत.

    अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीनंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया प्रचंड सावध होती.पूर्ण बातमी वाचा- ‘पूर्ण भाकरी खायची होती, आता अर्धीच मिळेल’

  8. सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचल्या

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. बहुतांश आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा- सुनील तटकरे

    बहुतांश आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा- सुनील तटकरे

    फोटो स्रोत, TWITTER

    बहुतांश आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे असं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. वांद्रे येथिल बैठकीच्या स्थळी ते बोलत होते. तटकरे यांना अजित पवार यांच्या गटाने प्रदेशाध्यक्षपदी नेमलं आहे.

  10. अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ खडसे कोणत्या पवारांसोबत जाणार?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  11. महाराष्ट्रातल्या राजकारणावर तुमचं मत काय आहे?

    bbc
  12. दोन्ही गटांनी काढला व्हीप

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात दोन बैठका होत आहेत. या दोन्ही गटांनी व्हीप काढले असून आमदारांना उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहे. अजित पवारांच्या गटाने अनिल पाटील यांच्या नावाने तर शरद पवार यांच्या गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याकरवी हे व्हीप बजावले आहेत.

  13. देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या समर्थकांची गर्दी आणि घोषणाबाजी

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. खासदार अमोल कोल्हे राजीनामा देण्याच्या विचारात

    amol kolhe

    फोटो स्रोत, TWITTER

    शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी याबद्दल एक ट्वीट केले आहे.

    ते म्हणतात, सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीबाबत मनातील अस्वस्थता आदरणीय शरद पवार साहेबांना भेटून मांडली. "अमोल, ही अस्वस्थता फक्त तुझ्याच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक युवक व मतदाराच्या मनात आहे. आता आपल्याला लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. शिरूरच्या मायबाप जनतेने 5 वर्षांसाठी दिलेल्या जबाबदारीचे 8-10 महिने अजून बाकी आहेत. या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली असून अनेक महत्वकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे सुद्धा तुझं कर्तव्य आहे." असं मोलाचं मार्गदर्शन आदरणीय साहेबांनी केलं . एकंदर पवार साहेबांना आज भेटून माझ्या मनातील अनेक प्रश्नांना सकारात्मक उत्तरं मला मिळाली आहेत.

  15. जेव्हा शरद पवार 40 आमदारांबरोबर सरकारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री झाले होते

    Mjo

    फोटो स्रोत, Getty Images

    पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोदची स्थापना करून शरद पवारांनी राज्यातलं पहिलं आघाडी सरकार स्थापन केलं होतं. वयाच्या 38 व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले. नाट्यमय घडामोडीनंतर ते मुख्यमंत्री झाले.

    शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती. काही जणांच्या मते शरद पवारांनी अगदी तरुण वयात सरकार स्थापन करून आपल्या राजकीय चातुर्याची ओळख राज्याला करून दिली. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री कसे बनले हे आपण पाहू.वाचा- पुलोद : जेव्हा शरद पवार 40 आमदारांबरोबर सरकारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री झाले होते

  16. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता किती?

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता किती?

    फोटो स्रोत, Getty Images

    बदललेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (4 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली.

    मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित ही बैठक होती. बैठकीला मनसेचे नेते आणि पदाधिकारी होते.

    यावेळी दादर येथे म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवसेना भवन येथे लावलेल्या एका पोस्टरची चर्चा झाली.

    हे बॅनर लावलं मनसेचे उपशहाराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी. 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा आता चिखल झाला आहे. राजसाहेब... उद्धवसाहेब आता तरी एकत्र या... संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे - महाराष्टसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती' असं आवाहन पाटील यांनी बॅनरच्या माध्यमातून केलं.

    याच बॅनरची चर्चा मनसेच्या बैठकीतही झाली. इतकच नाही तर आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, मनसे आणि ठाकरे गटाची युती व्हावी असाही प्रस्ताव राज ठाकरेंसमोर काही जणांनी ठेवल्याची माहिती समोर येतेय.पूर्ण बातमी वाचण्यासाठी- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता किती?

  17. सुप्रिया सुळे यांनी केले ट्वीट

    महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (@PawarSpeaks) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (@NCPspeaks) पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई वेळ - दुपारी १.०० वाजताअसे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. नमस्कार

    रविवार 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश केला. यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना, विधानांना वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी बैठक बोलावलेली आहे. या बैठकीतून पुढचे राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.