मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कोणीही दिवास्वप्न पाहू नये-उदय सामंत
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, ती अफवा आहे. आम्ही अजिबात नाराज नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर
2022 सालीच भाजपाबरोबर सरकार स्थापन करण्याची विनंती केली होती- प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल या मंचावर का याचं उत्तर आज देणार नाही, योग्यवेळ आली की सांगणार. माझी ताकद अजितदादांमागे आहे. त्यांना अधिक सक्षम करायचं आहे. असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.
दादांना बदनाम करण्याचा कट काही लोक करत आहेत. शिवसेनेचे आमदार गुवाहाटी, सुरत, गोव्याला गेले होते तेव्हा सर्व मंत्र्यांनी, सदस्यांनी सरकारमध्ये भाजपाबरोबर जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे हे काही नवं घडलेलं नाही. दादांनी काहीही पक्षविरोधी काम केलेलं नाही.
मीही एकदा अनुभवांचं पुस्तक लिहिणार आहे. प्रफुल्ल पटेल पवारसाहेबांच्या सावलीप्रमाणे राहिले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. दादांमागे आम्ही उभं राहिलो आहोत यामागचा इशारा तुम्हाला समजला पाहिजे. मी आजही माझ्या गुरूंना हात जोडून विनंती करुन आमची भावना समजून घ्या असं सांगतो.
शरद पवारांवर सर्वात जास्त आरोप बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो तर मग भाजपाकडे आपण का पाहू शकत नाही? आम्ही स्वाभीमानाने या युतील भागीदार झालो आहोत. फारुक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती भाजपाबरोबर जाऊ शकतात, एम. के स्टॅलिन भाजपाबरोबर गेले होते मग राष्ट्रवादी काँग्रेस का नको?बिहारमध्ये गेल्यावर जे विरोधी पक्ष आले होते त्यांच्याकडे पाहून हसू आले. तिथे आलेल्या पक्षांचे सदस्यही कमी होते, अशांबरोबर परिवर्तन घडेल का?
शरद पवार यांच्या यशवंतराव चव्हाण सेंट्रल येथील बैठकीला सुुरवात
शरद पवारांच्या बैठकीसाठी कोणते नेते उपस्थित आहेत?
किरण लहामाटे, अशोक पवार, रोहीत पवार, देवेंद्र भुयार, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे, जयंत पाटील, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, चेतन तुपे, सुमन पाटील, सुनिल भुसारा, मकरंद पाटील,शशिकांत शिंदे, बाबाजानी दुरानी, एकनाथ खडसे हे आमदार तर श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान हे खासदार शरद पवार यांच्या बैठकीत उपस्थित आहेत.
माझं आज मन रडतंय- धनंजय मुंडे
माझं आज मन रडतंय अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी मत व्यक्त केलं आहे. या सर्व नेत्यांनी साहेबांचा शब्द कधीही ओलांडला नाही. आज हा निर्णय घ्यावा लागतो ही गुगली नाही. अनेक प्रसंग आज आठवत आहेत. सर्व नेत्यांत ठेचा खाल्ल्या, अपमान सहन केला त्या नेत्याचं नाव अजित पवार आहे. त्यांनी कधीही शब्द मोडला नाही. स्वतःला चांगली संधी मिळत असतानाही त्यांनी साहेबांच्या शब्दाखातर दुसऱ्या सहकाऱ्यांना दिल्या.
स्वाभिमानाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मला ताकद दिली असेल तर ती अजित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. सर्व मान्यवरांवर ही आज वेळ येतेय याचा विचार दादा तुम्हाला करावा लागणार, कधीतरी तुम्हाला मन मोकळं करावं लागणार, तुमच्या मनातलं सांगावं लागणार.प्रत्येक गोष्टीत दादांना बदनाम केलं जातं, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरे यांच्या गटाची मातोश्री निवासस्थानी बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या बैठका मुंबईत सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेना उबाठा गटाच्या आमदारांची ही बैठक होत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी आले आहेत. येथे जयंत पाटील, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत
साहेब आमचे विठ्ठल आहेत, विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय- छगन भुजबळ
साहेबांचा फोटो का लावला असा प्रश्न विचारला जात आहे. साहेब आमचे विठ्ठल आहेत. या विठ्ठलाला बडव्यांनवी घेरलंय. साहेब बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपलं मत वांद्रे येथील बैठकीत व्यक्त केलं आहे.
फोटो स्रोत, ANI
सातत्यानं सांगूनही पक्षातल्या नेमणूका झाल्या नाहीत. जेव्हा जेव्हा राज्यात राजकीय बंड झालं तेव्हा नेत्यांना वाईट वाटलंच. आम्ही ओबीसी, दलित आदिवासी, बेरोजगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार. आम्ही सगळे आमदार सरकारडून काम करुन घेणार. हे काम करण्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही आलो आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
एकीकडे अजित पवार यांची वांद्रे येथे सभा सुरू असताना शरद पवार आपल्या बैठकीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानामधून यशवंतराव चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या घटनेत काय म्हटलं आहे?
अजित पवारांनी आठ आमदारांसह मंत्रीमंडळाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यांवरही दावा सांगितला आहे. 3 जुलै रोजी अजित पवार गट आणि शरद पवारांच्या कार्यालयातून हकालपट्टी विरुद्ध हकालपट्टी असं चित्र पाहायला मिळालं.
या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेतल्या काही तरतुदी वाचून दाखवल्या.
फोटो स्रोत, SHARDUL KADAM
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही राष्ट्रवादी काँग्रेसची घटना पाहायला मिळते. तसंच ती डाऊनलोडही केली जाऊ शकते. आयोगाच्या वेबसाईटनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही घटना 8 जुलै 2022 रोजी सादर केल्याचं दिसतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
दुपारी 1 वाजता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. तेव्हा काय होईल ते पाहा अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
अजित पवार बैठकीच्या मंचावर
अजित पवार वांद्रे येथील बैठकीच्या मंचावर आले असून त्यांच्याबरोबर अनेक आमदार उपस्थित आहेत.
फोटो स्रोत, ANI
या बैठकीला अजित पवार, अनिल पाटील, अहेरी धर्मरावबाबा आत्राम, छगन भुजबळ, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, नीलेश लंके, दत्ता भरणे, सुनील शेळके, बाबासाहेब पाटील लातूर, नरहरी झिरवाळ तसेच विक्रम काळे, रामराजे निंबाळकर,दिलीप बनकर, अनिकेत तटकरे, नितिन पवार, दिलिप मोहिते, अमोल मिटकरी,अण्णा बनसोडे, शेखर निकम, प्रकाश साळुंखे, इंद्रनील नाईक, सतीश चव्हाण, माणिक कोकाटे, राजू कारमोरे, सुनील टिंगरे, यशवंत माने, बाळासाहेब आसबे, मनोहर चंद्रिकापुरे, अतुल बेनके हे आमदारही उपस्थित आहेत.
वांद्रे येथील बैठकीच्या जागी कशी स्थिती आहे? पाहा फोटो-
फोटो स्रोत, SHARDUL KADAM
फोटो कॅप्शन, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे येथे बैठक होत आहे.
फोटो स्रोत, SHARDUL KADAM
फोटो कॅप्शन, वांद्रे येथे अजित पवार यांच्या समर्थनाचे फलक झळकवण्यात आले आहेत.
फोटो स्रोत, SHARDUL KADAM
फोटो कॅप्शन, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीसाठी उपस्थित कार्यकर्ते
4 जुलै रोजी काय घडलं? शिंदे गटात चलबिचल,नाराजी आणि शंकेचं वातावरण
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर ते आज पहिल्यांदा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाली. या बैठकीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची खातेवाटपाबाबत चर्चा झाली. अजित पवारांनीच स्वत:माध्यमांसमोर येत ही माहिती दिली.
त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांमधील नाराजी उघड होण्यासही सुरुवात झाली.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले म्हणाले की,“जी वस्तुस्थिती आहे,ती स्वीकारली पाहिजे आणि तिला सामोरे गेले पाहिजे,त्यामुळे आता नाराज होऊन काय चालणार नाही. प्रत्येकाची थोडीफार नाराजी राहणारच आहे. कारण,ज्याला एक भाकरी खायची होती,आता अर्धी मिळेल. ज्याला अर्धी खायची होती,त्याला पाव भाकरी मिळेल.
“राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर ते सर्व स्वीकारून पुढे चालायला पाहिजे. सध्या तरी मिळणाऱ्या आम्ही पाव भाकरीत खुश आहोत.”
गोगावले पुढे म्हणाले, “मंत्रिपदाच्या पहिल्या नऊ जणांच्या यादीत मी पहिल्या क्रमांकावर होतो,पण काही कारणास्तव मला थांबावं लागलं होते. ते आतापर्यंत थांबलो आहे. आता थांबण्याचं काहीही कारण नाही.”
तर भरत गोगावले यांच्याप्रमाणेच संजय शिरसाट यांची प्रतिक्रियाही नाराजी दर्शवणारी होती.
फोटो स्रोत, ANI
शिरसाट म्हणाले, “मुळात आम्हाला बहुमताची गरज नव्हती. त्यामुळे यांना का घेतलं हा प्रश्न आहे. 172 पर्यंत आपली संख्या गेली असताना त्यांना घेण्याची गरज काय,असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पण राजकारणात काही समीकरण बसवत असताना लोकसभा,विधानसभा आणि त्या माणसाची ताकद यांचा विचार केला जातो. पक्ष हा असतोच,पण वैयक्तिक ताकद हीसुद्धा महत्त्वाची असते.
“सध्या तयार झालेल्या मंत्रिमंडळामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे मंत्रिमंडळ कसं चालणार,या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहेत. त्यामुळे या विस्तारानंतर आणखी एक विस्तार पुढील आठवड्यात होईल.”
तसंच, “शिवसेनेप्रमाणेच भाजपमधल्या नेत्यांनाही प्रश्न पडलेला आहे. सगळं एकदमच सोडून द्यायचं तर सत्ता काय कामाची?अशा स्थितीत सत्तेत राहण्याचा अर्थ नाही. म्हणून पुढे काय करायचं हा विचार झालेला आहे. येणाऱ्या काळात ते नक्की दिसेल. त्याविषयी मी आशावादी आहे.
“आमच्या नेत्यांना आम्हाला न्याय द्यावाच लागेल. त्याशिवाय जमणार नाही. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे आमचे हात रिकामी झाले,असं समजण्याचं कारण नाही. त्याचा समतोल ठरवणारे लोक मजबूत आहेत,” असं शिरसाट म्हणाले.
3 जुलै रोजी काय झालं होतं? गुरुपौर्णिमा, कऱ्हाड दौरा आणि आरोप-प्रत्यारोप
शरद पवार यांच्या गटानं खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. तसंच, मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 जणांवरही पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कारवाई केली.
यानंतर अजित पवार यांच्या गटातील स्वत:अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेतून प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीवर शिक्कामोर्तब केला. कारण या पत्रकार परिषदेतूनच पटेलांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असल्याचा दावा करत जयंत पाटलांना पदावरून काढून, त्या ठिकाणी म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदावर खासदार सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. तसंच, महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक अध्यक्षपदी सुरज चव्हाण आणि प्रवक्तेपदी अमोल मिटकरी यांची नियुक्ती केली.
तसंच, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचंही प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं.
मात्र, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. जितेंद्र आव्हाड म्हणाले,“प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय. त्यामुळे त्यांना कुणाच्या नेमणुका करण्याचा कुठलाच अधिकार नाही.”
आव्हाड पुढे म्हणाले की, “तुम्ही शरद पवार यांना अध्यक्ष मानता,मग त्यांनी तटकरे आणि पटेलांवर केलेली कारवाई मान्य करता की नाही?
फोटो स्रोत, Getty Images
“बाहेर पडलेला गट म्हणजे पक्ष नाही. 40 आमदारांवरून तुमचा अध्यक्ष होऊ शकत नाही. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांना शरद पवारांसोबतच यावं लागेल.”
संध्याकाळनंतर शरद पवारांनी सोशल मीडियावरून कारवायांचे पत्र शेअर करण्यास सुरुवात केली. यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचे पत्रही पवारांनी ट्विटरवरून शेअर केले.
2 जुलै रोजी नक्की काय झालं होतं? शपथविधी आणि धक्कातंत्र
फोटो स्रोत, Getty Images
अजित पवारांनी'देवगिरी'या सरकारी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली. प्रफुल्ल पटेल,सुप्रिया सुळे,छगन भुजबळांसह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतरच महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील मात्र नव्हते.
या बैठकीनंतर पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यात अजित पवारांच्या या बैठकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना आमदारांची बैठक घेण्याचा अधिकार आहे.
पवारांची पत्रकार परिषद संपताच इकडे मुंबईत राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. अजित पवारांच्या निवासस्थानातून नेत्यांसह गाड्यांचा ताफा राजभवनाच्या दिशेला निघाला. या ताफ्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसह वरिष्ठ नेते होते. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे राजभवनात गेल्या नाहीत.
एव्हाना अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार, याची माहिती महाराष्ट्रासह देशभर पोहोचली होती. राजभवनाचा दरबार हॉलही शपथविधीसाठी सजवण्यात आला होता.
अजित पवारांचा ताफा राजभवनाकडे जात असताना, दुसरीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनाकडे निघाले. यातून अजित पवारांच्या बंडावर शिक्कामोर्तबच झालं.
फोटो स्रोत, Getty Images
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचल्यानंतर तिथं राज्यपाल रमेश बैसही आले आणि शपथविधीला सुरुवात झाली.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले प्रफुल्ल पटेल हेही राजभवनात उपस्थित होते. तसंच, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे, आमदार अमोल मिटकरी हे नेतेही उपस्थित होते.
या शपथविधीनं महाराष्ट्रासह देशभरात राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला की अजित पवार यांनी बंड केलं, याबाबत गोंधळाचं वातावरण तयार झालं असतानाच, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्हीडिओ जारी करत स्पष्ट केलं की, अजित पवारांच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाहीय.
शपथविधीनंतर शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा नसल्याचंच स्पष्ट केलं. तसंच पवार म्हणाले की, माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षातील विशेषतः विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली,याचं चित्र पुढील दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
मात्र, शपथविधीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत”असा दावा केला.
तसंच, अजित पवार म्हणाले की,“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही याच नावाखाली आणि चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला न्याय देणं गरजेचं आहे. आम्हाला अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग सरकारला होईल. सोबतच पक्ष अधिक मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यात जयंत पाटील म्हणाले की,“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे सरकार आणि भाजपला आमचा कोणताही पाठिंबा नाहीये. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन शपथ घेतली आहे,त्यांनाही आमचा विरोध आहे.”
तसंच, जयंत पाटील म्हणाले की,“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहील आणि शरद पवार यांच्या सोबत राहील. काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या संमतीशिवाय विरोधी पक्षात जाऊन शपथविधीचा कार्यक्रम झाला आहे. विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते व्यथित होऊन झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत.”
तसंच, जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिली की, जितेंद्र आव्हाड हे नवे विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे प्रतोद असतील. तसंच, 5 जुलै रोजी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि संघटनांची मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठक आयोजित केल्याचीही माहिती दिली.
यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी“आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत,”असं म्हणत यू-टर्न घेतला. त्यांनी ट्विटरवरून तशी माहिती दिली.
2 जुलै रोजीच रात्री उशिरा सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यांनी पक्षातील घडामोडींवर ठोस अशी कोणतीच भूमिका जाहीर केली नाही.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात
अजित पवार यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाला वंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतानंतर बैठकीला सुरुवात होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक वांद्रे येथे होत आहे. येथे येत असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आताच येथे अजित पवार उपस्थित झाले आहेत. यापूर्वी प्रफुल्लल पटेल, छगन भुजबळ हे येथे आलेले आहेत.
अजित पवारांच्या बैठकीच्या स्थळाच्या दिशेने निघाले
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या देवगिरी निवासस्थानावरुन वांद्रे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकस्थळाच्या दिशेने निघाले आहेत. देवगिरी निवासस्थानातून बाहेर पडताना अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एकच वादा, अजितदादा अशा घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिल्या आहेत. यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांच्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
शरद पवार आयुष्यातलं सर्वात मोठं राजकीय आव्हान कसं पेलतील?
फोटो स्रोत, Getty Images
अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवारांनी जाहीर केलं इतर काहीही प्रयत्न करण्यापेक्षा ते जनतेच्या न्यायालयात जाऊन त्यांना सिद्ध करतील.
ते दुस-या दिवशी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेही. कराडला गेले आणि मग तिथून साता-याला गेले.
2019 मध्ये साता-यात पवारांनी भर पावसात केलेली सभा गाजली होती. तिथे राष्ट्रवादीसाठी निवडणूक फिरली. प्रश्न आता हा आहे, तेच 2023-24 मध्ये पवार पुन्हा करु शकतील का?
असं नाही की पवारांच्या राजकीय आयुष्यात अशा प्रकारचे प्रसंग कधी आले नाहीत. स्वत: त्यांनीच वारंवार अशा प्रसंगांबद्दल सांगितलं आहे.
अगदी 1 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्येही त्यांनी अशा प्रसंगांचा उल्लेख केला. 'पुलोद'चं सरकार कोसळल्यावर नंतरच्या काळात त्यांचे समर्थक आमदार दूर गेले होते आणि बोटावर मोजता येतील एवढेच सोबत राहिले होते.पूर्ण बातमी वाचण्यासाठी- शरद पवार आयुष्यातलं सर्वात मोठं राजकीय आव्हान कसं पेलतील?