You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

अर्थसंकल्प 2023 जाणून घ्या सर्वकाही; कर सवलत, काय स्वस्त- काय महाग?

निर्मला सीतारामन यांनी 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली.

लाईव्ह कव्हरेज

  1. सध्याच्याआयकरमर्यादाखालीलप्रमाणे

    • 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कोणताही आयकर नाही.

    • 2.5 ते 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला 5 टक्के आयकर,पण कलम 87a च्याअंतर्गत टॅक्सरिबेट मिळणार

    • 5 ते 7.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर

    • 7.5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के आयकर

    • 10 ते 12.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के आयकर

    • 12.5 ते 15 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के आयकर

    • 15 लाखाहून जास्त असलेल्या उत्पन्नावर 30 टक्के आयकर

  2. अर्थसंकल्पाच्या काही पद्धती ज्या आता इतिहासजमा होत आहेत…

  3. बजेटपूर्वी घेतलेल्या देवदर्शनात अर्थराज्यमंत्र्यांनी काय प्रार्थना केली असेल?

    अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अर्थसंकल्पापूर्वी देवाचं दर्शन घेऊन प्रार्थना केली. मात्र बजेटमध्ये काय असेल हे 11 वाजताच तुम्हाला कळेल असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

  4. अर्थसंकल्प 2023 हा निर्मला सीतारामन यांच्यासाठी तारेवरची कसरत आहे का?

    1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प 2024 च्या निवडणुकांच्या आधी सादर होणारा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

    सध्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीला सावरण्यासाठी लोकप्रिय घोषणा होणार नाहीत, अशी शक्यता.

    मात्र कोव्हिडनंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना सरकारची मदत लागणार आहे हेही नक्की. अर्थसंकल्पाबद्दल तज्ज्ञांनी हे महत्त्वाचं मत नोंदवलं आहे.

    यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांना नेमकं कसं संतुलन साधावं लागणार आहे? सविस्तर इथे वाचू शकता.

  5. आज अर्थसंकल्प

    नमस्कार,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024 च्या निवडणुकांपुर्वी होणारा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, उद्योजक यांना कोणता दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अर्थसंकल्प, त्यातील तरतुदी, त्यावरील प्रतिक्रिया आम्ही दिवसभर येथे देणार आहोत.