You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

उत्तर प्रदेशाचे 2022चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवतील - मोदी

उत्तर प्रदेशात भाजपनं जोरदार आघाडी घेतली असून, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजपची आगेकूच सुरू आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं आघाडी घेतली आहे.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे and तुषार कुलकर्णी

  1. विश्लेषण, उत्तर प्रदेशच्या निकालाचा अर्थ- बीबीसीच्या भारतीय भाषांचे डिजिटल संपादक मुकेश शर्मा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्त रप्रदेशात सुरुवातीपासूनच मोठा फॅक्टर असल्याचे मी आधीपासूनच म्हणत होतो. ते आता दिसतंय. सात-आठ वर्षे केंद्रात सत्तेत असूनही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता उत्तर प्रदेशात टिकून आहे.

    उत्तर प्रदेशात एखाद्या भागात लोक योगींना ओळखत नसतील, पण मोदींना ओळखतात.

    अनेक भागात लोकांना विचारलं गेलं की, तुम्ही कुणाला मत देणार, तेव्हा लोक म्हणत होते की, मोदींना मत द्यायला जातोय. मोदी मोठे फॅक्टर बनलेत.

    उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनला होता. महिलांसाठी विशेषत: हा मुद्दा महत्वाचा बनला होता. यावेळी कुटुंबापासून वेगळं मत महिलांनी दिल्याचं दिसतंय. शक्यता अशी दिसतेय की, कुटुंबातील पुरुषांनी वेगळ्या पक्षाला आणि महिलांनी वेगळ्या पक्षाला मत दिलंय.

    दुसरं म्हणजे, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ध्रुवीकरण जास्त दिसत नाही. याचं कारण असं असू शकेल की, हिंदूही ओळख लोकांमध्ये आता पूर्णपणे रुजली आहे. त्यामुळे ती वेगळ्या मार्गानं सांगण्याची गरज भासली नसावी. त्यात भाजपच्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केडर ठाम उभं राहिल्याचं दिसून आलं. संघटनाच्या पातळीवर संघानं भाजपला मोठी मदत केली.

    शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे कल्याणकारी योजनांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपला उत्तर प्रदेशात मोठी मदत केल्याचे दिसतेय.

    अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष गेल्या सात-आठ महिन्यात चित्रात आला. मात्र, सीएए असेल किंवा इतर आंदोलनांमध्ये सपा कुठेच नव्हती. तेव्हा सर्व ग्राऊंड काँग्रेसनं तयार केला. मात्र त्या ग्राऊंडचा फायदा सपाला मिळाला. मात्र, मुद्द्यांबाबत स्पष्टता सपामध्ये दिसत नाही.

  2. पणजीत उत्पल पर्रिकर पराभूत

  3. उत्तर प्रदेशमध्ये भाजप बहुमताच्या पार, काँग्रेसला अवघ्या 3 जागा

    दरम्यान, मतमोजणीदरम्यान बूथवरच थांबण्याचं आवाहन समाजवादी पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

    समाजवादी पक्षानं ट्वीट केलं आहे, “समाजवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या निकालांवर लक्ष देऊ नका. तुम्ही मतमोजणी केंद्रांवर टिकून राहा. शेवटी लोकशाही जिंकेल आणि समाजवादी पक्षाच्या बाजूनेच निकाल लागेल.”

  4. जेव्हा योगी आदित्यनाथ संसदेत ढसाढसा रडले.... पाहा 10 फोटोंमध्ये त्यांचा आजवरचा प्रवास

  5. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या घराबाहेर जल्लोष

    आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या संगरुर इथल्या घराबाहेर त्यांचे समर्थक जमा झाले असून मोठ्या उत्साहात जल्लोष सुरू आहे.

  6. पंजाबमध्ये आपची विजयाच्या दिशेनं वाटचाल, बहुमताचा आकडा सहज पार करण्याची चिन्हं

    पंजाब विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे.

    सुरुवातीचे आकडे पाहता आपनं 117 पैकी 85 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता आप शंभरी पार करत दणदणीत विजय मिळवणार का, हाच प्रश्न आहे.

    पंजाब विधानसभा निवडणुकीचे ताजे आकडे पाहण्यासाठी तसंच कोणत्या मतदारसंघात कोणी आघाडी घेतली आहे, हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

  7. पाच राज्यांतील निवडणूक निकालांचं ताजं विश्लेषण

  8. मायावती-मुलायम यांच्यातील शत्रुत्वाचं कारण ठरलेलं गेस्ट हाऊस प्रकरण काय होतं?

  9. गोव्यातला पर्रिकरांचा भाजपचा गड देवेंद्र फडणवीस राखणार का?

  10. आम्ही राष्ट्रीय पातळीवर सशक्त पर्याय म्हणून समोर येतोय- राघव चढ्ढा

    पंजाब विधानसभा निवडणूक निकालांचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. आम आदमी पक्षानं भाजप, काँग्रेसला मागे टाकत जोरदार मुसंडी मारली आहे.

    आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे, "पंजाबमध्ये पक्षाला मिळत असलेल्या यशामुळे लोक जागरुक होत आहेत, हे दिसतंय. आमचा पक्ष काँग्रेसची नैसर्गिक रिप्लेसमेंट आहे."

    "पंजाबमध्ये पक्षाला मिळत असलेल्या यशामुळे लोक जागरुक होत आहेत, हे दिसतंय. आमचा पक्ष काँग्रेसची नैसर्गिक रिप्लेसमेंट आहे."

    "आम्ही केवळ एका राज्यातच सत्तेवर येत नाहीये, तर राष्ट्रीय स्तरावर एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहोत."

  11. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग लखनऊमधूनच का जातो?

  12. गोव्यामध्ये भाजप सत्ता राखण्याच्या दिशेने

    गोव्यातील निकालाचे सुरुवातीचे कल समोर यायला सुरुवात झालीय. भाजप सध्या आघाडीवर दिसतेय, तर काँग्रेस पिछाडीवर आहे. कलांमध्येही दोन्ही पक्षात मोठा फरक दिसून येतोय. आताच्या घडीला भाजप 11, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर दिसतेय.

  13. निवडणूक निकालांचे ताजे कल काय सांगतात?- पाहा विश्लेषण

  14. ब्रेकिंग, पंजाबमध्ये काँग्रेसला मागे टाकत आपची मोठी मुसंडी

    पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ताज्या कलानुसार आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येते आहे, तर भाजप, काँग्रेस, अकाली दल पिछाडीवर दिसतायेत. मात्र, हे कल क्षणा-क्षणाला बदलत आहेत.

  15. ब्रेकिंग, उत्तर प्रदेशमध्ये भाजपची आघाडी

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल हाती येत आहेत. भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष आठ जागांवर आघाडीवर आहे.

  16. वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का- अखिलेश यादव

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मतमोजणीदरम्यान एक ट्वीट केलं आहे.

    त्यांनी लिहिलं आहे, “इम्तिहानबाकीहैअभीहौसलोंका,वक़्तआगयाहैअब‘फ़ैसलों’का”

    “मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस सतर्क आणि जागरूक राहिल्याबद्दल सपा आणि आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्ता, समर्थक, पदाधिकारी, नेते आणि शुभचिंतकांचे मनापासून आभार. लोकशाहीच्या सैनिकांना आता विजयाचं प्रमाणपत्र घेऊनच परतावं,” असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

  17. उत्तर प्रदेशमधले सुरुवातीचे कल काय सांगतात?

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे अगदी सुरूवातीचे कल हाती यायला लागले आहेत. आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साडे आठ वाजेपर्यंत समाजवादी पक्ष 4 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.

    एकीकडे सुरुवातीचे कल हाती येत असताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर चिमटा घेणारं कार्टून ट्वीट केलं.

    दुसरीकडे भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी 'गुंडगिरी हारतीये, जनता जिंकतीये' असं ट्वीट केलं.

  18. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पोहोचले मंदिरात

    गोव्यामध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याच्या आधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

  19. ब्रेकिंग, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू

    उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

    उत्तर प्रदेशच्या 403 विधानसभा जागांचे निकाल येतील. एक्झिट पोलमध्ये भाजप उत्तर प्रदेशमध्ये सत्ता राखेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

    मतमोजणीदरम्यान सर्वांत आधी पोस्टल मतांची मोजणी होईल.

  20. गोवा कोणाला कौल देणार?