You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

उत्तर प्रदेशाचे 2022चे निकाल 2024 चं भवितव्य ठरवतील - मोदी

उत्तर प्रदेशात भाजपनं जोरदार आघाडी घेतली असून, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजपची आगेकूच सुरू आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं आघाडी घेतली आहे.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे and तुषार कुलकर्णी

  1. पराभव स्वीकारताना चरणजीत सिंह चन्नी म्हणाले...

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी काँग्रेसचा झालेला पराभव स्वीकारत आम आदमी पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन ही केलंय.

    चन्नी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "आम्ही पंजाबच्या जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत आहोत. तसेच आम आदमी पक्षाने संपादन केलेल्या विजयासाठी त्यांचे ही अभिनंदन करतो. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांचेही खूप खूप अभिनंदन. मला आशा आहे की भगवंत मान लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील."

    याआधी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी ही आपलं पराभव स्वीकारून आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले आहे. नवज्योतसिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. तर चरणजित सिंग चन्नी यांचाही पराभव झाला आहे.

  2. भगवंत मान : कॉमेडियन ते राजकारणी

  3. उत्तरप्रदेश, पंजाबच्या निकालांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात...

    उत्तरप्रदेश, पंजाबच्या निकालांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मतं व्यक्त केलं आहे.

    एकीकडे उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमत मिळताना दिसून आलं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला एकतर्फी विजय मिळाल्याचं चित्र आहे. दरम्यान, या निकालांवर विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून ही प्रतिक्रिया उमटत आहेत.

    पंजाबच्या जनतेने भाजप आणि काँग्रेसला नाकारून आम आदमी पार्टीच्या बाजूने जनादेश दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पवार म्हणाले, "पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात चीड दिसते आहे."

    त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या निकालावर पवार म्हणतात की, "यात अखिलेश यादव यांचा काहीही दोष नाही, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. अखिलेश यांनी निवडणुकीच्या निकालांचा विचार करू नये, कारण देशात त्यांचा दर्जा या निकालांपेक्षा ही उच्च आहे. ही निवडणूक त्यांनी पूर्वीपेक्षा ही चांगल्या पद्धतीने लढवली आहे."

  4. गोवा विधानसभा निवडणूक निकाल

  5. या निकालांवरून बोध घेऊ, काँग्रेस पक्षाचा पराभव स्वीकारत राहुल गांधींची प्रतिक्रिया

    पाच राज्यांतल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव स्वीकारत काँग्रेस नेते राहुल गांधींनी विजयी पक्षांचं अभिनंदन केलंय.

    राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, "या निकालांवरून आम्ही बोध घेऊ आणि भारताच्या जनतेच्या हितासाठी काम करत राहू."

  6. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2022

  7. काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज - देवेंद्र फडणवीस

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यात जे पानिपत झालं आहे त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

    ते म्हणाले,"पहिल्या दिवशी सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही, ती नोटाशी आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युती होती. या दोघांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा कमी आहे त्याच्यामुळे मी सांगितलं होतं. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली होती त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला 97 मत मिळाली आहेत शंभर ही मिळू शकलेली नाहीत."

    काँग्रेसला सल्ला देताना फडणवीस म्हणाले, "काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि विशेषता परिवारवादी पार्ट्यांना एक मोठा सेटबॅक या निवडणुकीने दिला आहे."

    गोव्याची निवडणूक प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील लढवलेली असून आता मुख्यमंत्री पदासंदर्भात अंतिम निर्णय संसदीय समिती घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

    महाराष्ट्रात सत्ता बदल होईल का ? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये आम्ही 2024च्या दृष्टीने आमची तयारी केलेली आहे. पूर्ण बहुमत घेऊ आणि आम्ही निवडून येणारच. दरम्यानच्या काळात सरकार पडलं तर आम्ही सरकार स्थापन करू."

  8. ‘धर्माच्या-जातीच्या पुढे उत्तर प्रदेशचं राजकारण गेलं नाही’

    उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं बहुमताचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपनं 244 जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष 124 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 1 जागा राखता आली आहे.

    बीबीसी मराठीनं या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम केला. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काय म्हटलं?

  9. 'देशाच्या राजकारणात 'आप'च्या रुपाने पर्याय'

    पंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी मारली आहे. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार आम आदमी पक्षानं 92 जागेवर आघाडी घेतली आहे.

    पंजाबमध्ये विधानसभेची दुसरीच निवडणूक लढवत असलेला आप आता दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही सत्ताधारी असेल.

    बीबीसी मराठीनं या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम केला. या कार्यक्रमात पंजाबमधल्या या यशाबद्दल आपचे संयोजक अक्षय मराठे यांनी काय म्हटलं?

  10. काँग्रेसचं निवडणुकीचं नियोजन चुकलं - शिवसेना खासदार संजय राऊत

    काँग्रेसचं निवडणुकीचं नियोजन चुकलं, काँग्रेसला स्वतःच्या भूमिकेत बदल करावा लागेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

    ते म्हणाले, "काँग्रेसचा निवडणुकीत वाईट पराभव झाला. आम्हाला अपेक्षित निकाल लागले नाहीत. पंजाबात लोकांना आणखीन एक पर्याय मिळाला आणि त्यांनी 'आप'ला निवडलं. भाजपला मिळालेला विजय हा त्यांच्या 'इलेक्शन मॅनेजमेंट'चाही विजय आहे.

  11. 'उत्तर प्रदेश मध्ये 30 वर्षानंतर इतिहास घडला'

    उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं बहुमताचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपनं 244 जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष 124 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 1 जागा राखता आली आहे.

    बीबीसी मराठीनं या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम केला. या कार्यक्रमात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काय म्हटलं?

  12. पंजाब निकाल : सुखबीर सिंह बादल यांच्या 'आप'ला शुभेच्छा

  13. अरविंद केजरीवालांनी मानले गोव्यातल्या जनतेचेही आभार

    गोव्यामध्ये आम आदमी पक्षानं दोन जागा जिंकल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

    केजरीवाल यांनी म्हटलं आहे, “गोव्यात ‘आप’ला दोन जागांवर विजय मिळाला आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन. ही गोव्यामधल्या प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे.”

    गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि एका जागेवर भाजपला विजय मिळाला आहे. आम आदमी पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसनला एका जागेवर विजय मिळाला आहे.

  14. चार राज्यांत भाजपची आघाडी, पंजाबमध्ये आपची मुसंडी

    • उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. पाचही राज्यांचं चित्र पुरेसं स्पष्ट झालं आहे.
    • उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं बहुमतचा आकडा पार केला आहे. समाजवादी पक्षाने शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
    • उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही भाजप सत्ता मिळवणार असंच चित्र आहे.
    • गोव्यामध्ये अजूनही स्पष्ट बहुमताचं चित्र स्पष्ट झालं नसलं तरी 40 जागांपैकी 18 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर आहे.
    • मात्र, गोव्यामध्ये पणजी विधानसभा मतदारसंघातून
    • पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ‘क्लीन स्वीप’ मिळाली आहे. विधानसभेच्या 117 जागा असलेल्या पंजाबमध्ये आपनं बहुमताचा आकडा केव्हाच ओलांडला आहे.
    • या क्रांतीसाठी पंजाबच्या जनतेचे आभार, या शब्दांत केजरीवाल यांनी पंजाबच्या निकालानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
  15. निवडणूक निकालांच्या आकड्यांचं विश्लेषण

    उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. पाचही राज्यांचं चित्र पुरेसं स्पष्ट झालं आहे. या निकालांचं विश्लेषण करणारा बीबीसी मराठीचा विशेष कार्यक्रम-

  16. छोटा केजरीवाल की छोटा भगवंत मान?

    पंजाबमध्ये आपच्या विजयी आघाडीनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा चिमुकला...अरविंद केजरीवाल आणि आपचे पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांची झलक या लहानग्यात दिसतीये...

  17. मणिपूरमध्येही भाजपचा विजय जवळपास निश्चित

    मणिपूरमध्ये भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला केवळ 3 जागांवर आघाडीवर आहे, तर अन्य पक्षांची 17 जागांवर आघाडी आहे.

    मणिपूर विधानसभेमध्ये 60 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.

  18. उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

    उत्तराखंडमध्ये लालकुआं मतदार संघातून काँग्रेस उमेदवार हरीश रावत हे भाजपच्या डॉ. मोहन सिंह बिष्ट यांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.

    भाजपचे सत्पाल महाराजही आघाडीवर आहेत.

    कोटद्वारमधून भाजपच्या रितू सिंग खंडुरी यासुद्धा आघाडीवर आहेत.

    उत्तराखंडमध्ये काय आहे मतदारांचा कौल?

  19. पंजाबमध्ये 'आप'ला मिळालेल्या यशानंतर अरविंद केजरीवालांनी काय म्हटलं?

    पंजाबमध्ये 'आप'चा 'मान' वाढतोय, केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया...

  20. गोव्याचं चित्र काय आहे? पणजीत उत्पल पर्रिकर पराभूत

    गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून पराभव झाला आहे.

    भाजपाचे बाबुश मॉन्सेरात यांनी जवळपास 800 मतांच्या फरकाने उत्पल पर्रिकर यांचा पराभव केला.

    उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.

    दरम्यान, गोव्यामध्ये काय चित्र आहे? कोणाला किती जागा मिळाल्या आहेत?