कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल - डॉ. शशांक जोशी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार

    कोव्हिड-19च्या लसीकरणासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    राज्यातील सर्व नागरिकांना लस मोफत देण्यात येईल.

    राज्यातील 5.71 कोटी लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य कॅबिनेटने घेतला आहे.

    यामुळे 6500 कोटींचा भार राज्यावर पडणार असल्याचं सांगण्यात आलंय.

    कोरोना लस

    फोटो स्रोत, Getty Images

  2. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 'या' कारणांमुळे कमी झाली का?

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. कोरोना : महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात छत्तीसगडमधून पुरवला जातोय ऑक्सिजन

    कोरोना व्हायरसच्या संकटात देशभरात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना छत्तीसगड अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारं केंद्र बनलं आहे.

    छत्तीसगड दिवसभरात केवळ राज्यातल्याच हॉस्पिटल्सना नव्हे तर देशभरातल्या इतर राज्यांनाही ऑक्सिजन पुरवत आहे.

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बीबीसीला सांगितलं, "छत्तीसगड ऑक्सिजन उत्पादक राज्य आहे. इथून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा तसंच इतर राज्यांमध्ये ऑक्सिजन पाठवला जात आहे. छत्तीसगडमध्ये सध्या दररोज 386.92 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन होत आहे. यापैकी राज्यात केवळ 160 मेट्रिक टन इतका वापर होत आहे. उर्वरित ऑक्सिजन इतर राज्यांना पाठवला आहे."

    छत्तीसगडमध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणारे 29 यंत्र आहेत. यापैकी 27 स्प्रिंग असोर्प्शन संयंत्र आहेत. यात 176.92 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. याचा वापर उद्योग आणि दवाखान्यांमध्ये केला जातो.

    छत्तीसगड

    फोटो स्रोत, Getty Images

  4. पत्रकार सिद्दीक कप्पन यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीत आणा-सर्वोच्च न्यायालय

    सर्वोच्च न्यायालय, सिद्दीक कप्पन, उत्तर प्रदेश सरकार

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, सर्वोच्च न्यायालय

    पत्रकार सिद्दीक कप्पन यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात स्थलांतरित करण्यात यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे.

    कप्पन यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुन्हा मथुरा तुरुंगात पाठवण्यात यावे असं न्यायालयाने म्हटलं आहे.

    उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी कप्पन तिथे जात होते. त्यांच्यावर युएपीए अक्टअंतर्गत अटक करण्यात आली.

    केरल यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स संघटनेनं कप्पन यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कप्पन यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसंच कार्यालयातील सहकारी यांच्यापैकी कुणालाही कल्पना देण्यात आली नव्हती असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

  5. मोफत लसीकरण आणि लॉकडाऊन संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

    कोरोना लस

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, कोरोना लस

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून या बैठकीत लॉकडाऊन आणि मोफत लसीकरणासंदर्भात निर्णय होणार आहे.

    आजपासून 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सगळ्यांना लशीसाठी नोंदणी करता येणार आहे. 1 मे पासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल.

    "राज्यातल्या नागरिकांना ही लस मोफत मिळणार का? यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. माझी सही झाली आहे," आता मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असं मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं.

    कोरोना रुग्णांच्या उपचारांचा भाग असलेल्या रेमडेसीविरच्या उपलब्धता आणि व्यवस्थापनाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

    राज्यात मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. मात्र अन्य भागांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार का काही निर्बंध शिथिल होणार यासंदर्भात बैठकीत निर्णय होणं अपेक्षित आहे.

  6. पीएम केयर्स फंडांतून ऑर्डर केलेल्या व्हेन्टिलेटर्सचं काय झालं? - बीबीसी फॅक्ट चेक

  7. राजस्थान, झारखंड, काश्मीरमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, राजस्थानमधील दृश्य

    झारखंड, राजस्थानसह जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. झारखंडमध्ये 51,252अक्टिव्ह केसेस आहेत. हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने 22 ते 29 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.

    केंद्रशासित प्रदेश झालेल्या जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत 2197 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसात 11,000हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

    राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि कोटा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 1 लाख, 55हजार 182 अक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत राजस्थानमध्ये 3806 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये दिवसाला 6500 ऑक्सिजन सिलेंडर लागत असत. आता ही मागणी वाढून 31हजार 425 सिलेंडर एवढी झाली आहे. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, अम्ब्युलन्स ड्रायव्हर या यंत्रणेवरील ताण वाढला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातली परिस्थिती चिंताजनक आहे.

  8. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताला चांगलाच तडाखा दिला आहे. दररोज लाखो नवे रुग्ण सापडत आहेत. हजारोंचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे.

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी येईल? । सोपी गोष्ट 324
  9. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

    माजी खासदार व माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा एकनाथजी गायकवाड यांचं सकाळी 10.00 वाजता कोरोना मुळे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

    शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

    एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. लोकसभेचे माजी सभापती आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा त्यांनी पराभव केला होता.

    काँग्रेसकडून ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले. ते 14आणि 15व्या लोकसभेचे खासदार होते. 2014 मध्ये गायकवाड यांनी मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवली. शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांना नमवलं होतं.

    गायकवाड धारावी मतदारसंघातून तीनवेळा आमदार निवडून आले होते. त्यांनी दोनवेळा राज्याचं कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलं.

    एकनाथ गायकवाड

    फोटो स्रोत, INC

  10. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात

    राहुल गायकवाड,

    बीबीसी मराठीकरिता

    राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्याला मोठा फटका बसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत पुण्याची परिस्थिती गेले काही दिवस अतिशय बिकट होती. तसंच, बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदींच्या उपलब्धतेबाबतही समस्या निर्माण झाल्या होत्या. पण 19 एप्रिलपासून पुण्याची स्थिती सुधारत असल्याचं चित्र आहे.

    गेल्या एका आठवड्यापासून शहर-जिल्ह्यातील नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या पुण्यात 47 हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या 54 हजार होती. एका आठवड्यापूर्वी पुण्यात कोव्हिड रुग्णांना बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. पण आज परिस्थितीत सुधारणा झाल्याचं दिसून येतं.

    पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार पुण्यात मंगळवारी (27 एप्रिल) 227 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तर 1158 आयसोलेशन बेड उपलब्ध होते. अनेक स्वयंसेवी संस्थांनी कोव्हिड केअर सेंटर उभारल्याने बेडची संख्याही वाढत आहे.

    दुसरीकडे, पुण्यात अजूनही रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. याबाबत गेल्या आठवड्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रशासनाने रेमडेसिवीर औषधासाठी हेल्पलाईन बनवली. पण तरीही रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या औषधाच्या टंचाईची समस्या अजूनही सोडवली गेली नाही.

    कोरोना टेस्ट

    फोटो स्रोत, Getty Images

  11. भारतात कोरोना रुग्णांची संख्या इतकी कशी वाढली?

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे.

    देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच तडाखा दिला आहे. जानेवारी महिन्यात देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 20,000 पर्यंत खाली गेली होती. फेब्रुवारी महिन्यात तर ही संख्या आणखी घटून 10,000 पर्यंत गेली. पण मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. लोकांचं घराबाहेर पडणं वाढलं, मास्क घालण्यात नियमितपणा नव्हता तसंच कोव्हिडचे अन्य नियम पाळणंही कमी झालं. बीबीसी न्यूजने हे विश्लेषण केलं आहे.

    पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठीच्या प्रचाराकरता रॅली, सभा यांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अंतर पाळण्याच्या नियमाचं उल्लंघन झालं. उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यात हजारो नागरिकांनी शाही स्नानात सहभाग नोंदवला. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबरमध्ये आलेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत मृत्यूदर जास्त आहे तसंच कोरोना संसर्गाचं प्रमाणही अधिक आहे.

    ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स, व्हेंटिलेटर, औषधं-इंजेक्शनं यांची तीव्र कमतरता जाणवते आहे. रुग्णांना या पायाभूत सुविधांसाठी वणवण करावी लागत असल्याचं चित्र आहे. राजधानी दिल्लीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र आहे. स्मशानात जागा अपुरी पडत असल्याने मोकळ्या जागी अंत्यसंस्काराची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते आहे.

  12. देशभरात 3 लाख नवे रुग्ण; 3293 मृत्यू

    देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. गेल्या 24 तासात, देशभरात कोरोनाचे 3,60,960 रुग्ण आढळले आहेत.

    या कालावधीत कोरोनामुळे 3293 जणांचा मृत्यू झाला. याच काळात 2,61,162 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले.

    देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 29,78,709 इतकी आहे. देशात आतापर्यंत 2,01,187 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    देशात आतापर्यंत 14,78,27,367 जणांना लस मिळाली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. नागपुरात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी

    मास्क

    फोटो स्रोत, Getty Images

    प्रवीण मुधोळकर,

    बीबीसी मराठीसाठी

    गेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडत आहे. नागपूर महानगर पालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार शहरात गेल्या आठवडाभरात एकही वेंटीलेटर बेड नव्या रुग्णांसाठी उपलब्ध नव्हते.

    नागपूर शहरातील महानगर पालिका क्षेत्रात 551 वेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. महापालिका क्षेत्रात 4 हजार 521 एवढे आॅक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स आहेत. 1 हजार 924 एवढे आयसीयु एवढे बेड्स आहेत. तर विना आॅक्सिजन सपोर्टचे 350 बेड्स उपलब्ध आहेत.

    पण या पैकी गेल्या आठवडाभरात महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स कधीही 40 च्या वर उपलब्ध नव्हते. तर आॅक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स 50 च्या वर उपलब्ध नव्हते.

    गेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा आलेख जरी वाढता असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली आहे. मंगळवारी 27 एप्रिल रोजी 6 हजार 287 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर शहर आणि ग्रामिण मिळून 101 रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका क्षेत्रातील 54 लोक तर ग्रामिण मधील 39 लोकांचा समावेश आहे.

    मंगळवारी शहरात 22 हजार 908 एवढ्या नागरिकांच्या कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचण्या झाल्या. सोमवारी या चाचण्या महापालिका क्षेत्रात 14 हजार 770 एवढ्या होत्या तर ग्रामीणमधील 4 हजार 270 एवढ्या आहेत. एकुण 18 हजार 997 एवढ्या होत्या. गेल्या आठवडाभर चाचण्या याच क्षमतेनं जिल्ह्यात होत आहेत.

    नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ 27 एप्रिल 2021 रोजी पर्यंत नागपूर महानगर पालिका क्षेत्रात साडे पाच हजारावर अतिरिक्त बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या 7 हजार 144 इतकी झाली आहे.

    आय.सी.यू.च्या बेड्‌समध्ये 1817 ने वाढ झाली असून आणखी व्यवस्था वाढवण्यासाठी मनपा प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षी नागपूर शहरात शासकीय आणि विविध खासगी रुग्णालय मिळून केवळ 1 हजार 514 बेड्सची व्यवस्था होती. सप्टेंबरनंतर आता एप्रिल 2021 मध्ये कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला. दरम्यान, मनपा प्रशासनाने उद्‌भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन बेड्सची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात यश आले असून सुमारे साडे पाच हजारांनी बेड्स वाढले आहेत.

    28 सप्टेंबर 2020 मध्ये केवळ 1514 बेड्‌स विविध रुग्णालयात उपलब्ध होते. त्यामध्ये ऑक्सीजनची उपलब्धता असलेले 1144, आय.सी.यू.मध्ये 316 तर व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले 236 बेड्‌स उपलब्ध होते. यानंतर प्रत्येक महिन्यात ही संख्या वाढविण्यात आली. 31 डिसेंबर 2020 रोजी 3993 बेड्‌स रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यात ऑक्सीजनसह 2673, आय.सी.यू.मध्ये 1208 तर व्हेंटिलेटर असलेल्या 349 बेड्‌सचा समावेश होता.

    24 एप्रिल रोजी एकूण बेड्‌सची संख्या 7144 इतकी झाली आहे. अर्थात सप्टेंबर 2020 नंतर 5 हजाप 630 बेड्‌स वाढविण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात 4 हजार 653 बेड्‌स ऑक्सीजनसह असून 2 हजार 113 बेड्‌स आय.सी.यू.चे आहेत तर 542 बेड्‌स व्हेंटिलेटर्सचे आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”

  14. जेव्हा आयसीयूमध्ये थोडाच ऑक्सिजन शिल्लक असतो...

  15. 18 वर्षांवरील व्यक्तींना लशीसाठी नोंदणी 4 वाजल्यापासून

    अठरा आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी लशीकरणाची नोंदणी बुधवार 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 4वाजल्यापासून होणार आहे.

    Cowin.gov.in, आरोग्यसेतू, उमंग अॅपवर ही नोंदणी करता येईल. सरकारी तसंच खाजगी रुग्णालयांमध्ये लस घेता येईल.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

  16. ऑक्सिजन खरेदीसाठी ब्रेट लीने केली 43 लाखांची मदत #5मोठ्या बातम्या

  17. मुंबईत बीकेसी केंद्रात लस उपलब्ध नाही

    मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात लस नसल्याने आज लस मिळणार नाही. लशीचा साठा येताच लस मिळू शकेल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. ठाणे जवळच्या हॉस्पिटलला आग लागून चार जणांचा मृत्यू

    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथे नॉन-कोव्हिड हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे पोलिसांनी यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    प्राईम हॉस्पिटल हे हे नॅान कोव्हिड रूग्णालय होतं. रुग्णालयात अचानक आग लागली. त्यात ICU मध्ये दाखल असलेल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    आगीचं नक्की कारण अजूनही समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत असं मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.बी. वल्हटकर यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. 'परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू'

    दिल्ली, कोरोना

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

    राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे होत नसल्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावलं. तुम्हाला ऑक्सिजन व्यवस्थापनाची जबाबदारी हाताळता येत नसेल तर सांगा, ही जबाबदारी केंद्राकडे सोपवू असा इशारा न्यायालयाने दिला.

    ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असंही न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितलं.

    शांतीमुकुंद रुग्णालयाने नियोजित प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्यात आल्याचं न्यायालयाला सांगितलं.

    दरम्यान बँकॉकहून ऑक्सिजनचे 18 टँकर्स मागवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. यासाठी हवाई दलाची विमानं देण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली.

    फ्रान्समधून 21 रेडी टू युझ ऑक्सिजन प्लांट मागवण्यात येणार असून, ते लगेचच कार्यान्वित होतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

  20. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू

    कोव्हिड लशीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. या टप्प्याअंतर्गत 18 वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. 1 मे पासून लसीकरणाला सुरुवात होईल.

    या टप्प्यात लस घेणाऱ्यांना थेट रुग्णालयात किंवा लसीकरण केंद्रात जाऊन लस घेता येणार नाही. कोव्हिन प्लॅटफॉर्म, आरोग्यसेतू याठिकाणी नोंदणी करूनच लसीकरणासाठी जाता येईल.

    -cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिहा.

    -तुम्हाला ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. तो वेबसाईटवरील डायलॉग बॉक्समध्ये टाकावा. व्हेरिफाय लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक करा.

    -यानंतर नोंदणीसाठीचा अर्ज तुमच्या समोर येईल

    -इथे तुम्हाला तुमची माहिती आणि एक फोटो आयडी द्यावा लागेल.

    -तुम्हाला रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असा कुठला आजार आहे का ते सांगावं लागेल.

    -सगळी माहिती देऊन झाल्यानंतर रजिस्टर आयकॉनवर क्लिक करा

    -रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील.

    या आधीच्या दोन टप्प्यांमध्ये कोव्हिन अपवर नोंदणी करून नागरिकांना लस घेण्याचा पर्याय सरकारने दिला होता. मात्र त्याचबरोबरीने थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेता येत होती. तिसऱ्या टप्प्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

    तिसऱ्या टप्प्यात काही अन्य बदल नोंदणी प्रक्रियेत करण्यात आले आहेत. आधी एक माणूस चारजणांसाठी नोंदणी करू शकत होता. आता माणूस फक्त स्वत:चं नाव नोंदवू शकतो.

    60 तसंच 45 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू राहील. 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील.

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images