कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल - डॉ. शशांक जोशी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. कोविन अॅपवर नोंदणी न करता लस कशी घ्यायची? Co-Win, Aarogya Setu अॅप वापरून नोंदणी कशी करायची?

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस घेता येते का?

  4. महाराष्ट्रातला लॉकडाऊन वाढवला, 15 मे पर्यंत निर्बंध कायम

  5. ताज्या बातम्यांसाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला भेट द्या

    28 एप्रिल रोजी बीबीसी मराठीने राज्य, देश आणि जगभरातील कोव्हिड संदर्भातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. आता हे लाईव्ह पेज आम्ही बंद करत आहोत.

    ताज्या बातम्या, घडामोडी आणि विश्लेषणासाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला भेट द्या.

  6. महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल - डॉ. शशांक जोशी

    महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येईल, असा अंदाज डाॅ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलाय. डॉ. शशांक जोशी महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

    बीबीसी मराठीच्या वेबिनारमध्ये बोलताना डॉ. शशांक जोशी म्हणाले, "सप्टेंबरमध्ये पुन्हा तिसरी लाट येईल. या लाटेचे परिणाम किती गंभीर असतील हे पाहावं लागेल. कारण व्हायरसमध्ये म्युटेशन होत असतात."

    बीबीसी मराठीच्या वेबिनारमध्ये त्यांनी राज्यातल्या कोव्हिडच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. हा संपूर्ण वेबिनार तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

  7. 'या' आजोबांनी खरंच तरुण रुग्णासाठी त्यांचा बेड दिला?

  8. भारतातल्या कोरोना संकटाची काळजी जगाने का करायला हवी?

  9. मुंबईतली 40 खासगी लसीकरण केंद्र उद्या बंद, उर्वरित केंद्रांवर फक्त दुसरा डोस मिळणार

    लसीकरण केंद्र बंद

    फोटो स्रोत, Getty Images

    लशींचा पुरेसा साठा नसल्याने मुंबईतली 40 लसीकरण केंद्रं बंद राहणार असून उरलेल्या केंद्रांवर फक्त दुसरा डोस देण्यात येणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे.

    आज रात्री लससाठा उपलब्ध झाला, तरच उद्या शासकीय आणि महानगरपालिकेची लसीकरण केंद्र सुरू राहतील. पण उद्या फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांनीच लसीकरणासाठी यावं, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलंय.

    मुंबईतल्या 73 खासगी लसीकरण केंद्रांपैकी 40 उदया बंद असतील. उरलेल्या 33 खासगी लसीकरण केंद्रांवर मर्यादित साठा उरलेला आहे.

    महापालिका आणि शासनाच्या 63 लसीकरण केंद्रांना रात्री उशीरापर्यंत काही प्रमाणात लशींच्या डोसचा साठा मिळण्याची शक्यता असून, हा साठा आला तरच उद्या ही केंद्र सुरू राहणार असल्याचं मुंबई महापालिकेने एका पत्रकाद्वारे सांगितलंय.

  10. पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा

    भारतातल्या कोरोना व्हायरसच्या संकटाविषयी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बुधवारी चर्चा झाली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    याविषयी ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत आज चांगली चर्चा झाली. कोरोनाच्या जागतिक साथीविषयी आम्ही बोललो. कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये रशिया भारताला करत असलेल्या मदतीबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले.”

  11. पीएम केअर्स फंडातून एक लाख ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स विकत घ्यायला परवानगी

    ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

    फोटो स्रोत, Getty Images

    पीएम केअर्स फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स विकत घ्यायला परवानगी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

    पीएम केअर्स फंडातून आणखीन 500 PSA ऑक्सिजन प्लांट्सना परवानगी देण्यात आली असून हे प्लांट्स DRDO ने विकसित केलेल्या तंत्राद्वारे उभारले जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.

    पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स लवकर विकत घेऊन जास्त कोव्हिड रुग्णसंख्या असणाऱ्या राज्यांना देण्याची सूचना या बैठकीत पंतप्रधानांनी दिली आहे.

    कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा भारताला बसलाय. या संसर्गाने बाधित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा जीव गेलाय.

    मंगळवारी भारतात 60,000 नवीन कोव्हिड रुग्णांची नोंद झाली तर आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त जणांचा यामुळे मृत्यू झालाय.

  12. ट्विटरने सुरू केलं माहिती पुरवणारं विशेष पेज

    भारतासाठी ट्विटरने माहिती एकत्र पुरवणारं एक विशेष पेज सुरू केलंय.

    कोव्हिड-19 विषयीची चुकीची माहिती पसरू नये आणि योग्य माहितीची खातरजमा युजर्सना करता यावी यासाठी कोव्हिड-19 : नो द फॅक्टस (Covid:19: Know the Facts) हे पेज सुरू करण्यात आलंय. यावरची माहिती ही पडताळणी केलेली असेल.

    यासोबतच ट्विटरने भारतामधल्या हॉस्पिटलमधले बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि रक्तदात्यांची माहिती असणारं एक पेज - 'Covid-19 SOS: Resources' ही सुरू केलंय. लोकांनी ट्विटरवर शेअर केलेली माहिती या पेजवर ताबडतोब अपडेट होत राहील.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. राज्य सरकारांसाठी कोव्हिशील्डची किंमत 400 वरून 300 रुपयांवर

    राज्य सरकारांसाठी कोव्हिशील्डच्या डोसची किंमत 100 रुपयांनी कमी करत असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावालांनी जाहीर केलंय.

    सामाजिक हित जपण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोव्हिशील्डचे दर 400 रुपयांवरून 300 रुपये करत असल्याचं अदर पूनावालांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

    यामुळे राज्य सरकारांकडील हजारो कोटींचा निधी वाचेल, लसीकरणाची संख्या वाढेल आणि अनेक आयुष्य वाचणार असल्याचंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.

    केंद्र सरकारला या लशीचा प्रत्येक डोस दीडशे रुपयांना मिळणार असून खासगी हॉस्पिटलसाठी प्रत्येक डोसची किंमत 600 रुपये असेल. या दरांमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. कोरोना लस 1 मेपासून तरुणांना देऊ शकणार नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

    राज्याकडे सगळ्यांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे पण पुरेशा लशीच नसल्याने 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण शक्य होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय.

    यासोबतच 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी वेगळी केंद्र असतील आणि या वयोगटातही वर्गीकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचं टोपेंनी म्हटलंय.

    महाराष्ट्रातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवावा असं कॅबिनेटमधल्या सर्वांचं मत असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलंय.

    राजेश टोपे म्हणाले, “ महाराष्ट्रात दोन आठवडे लॉकडाऊनवाढवावा यासंबंधी कॅबिनेट बैठकीत सगळ्यांनी मत व्यक्त केलंय. माझ्या अंदाजानुसार 2 आठवडे लॉकडाऊनवाढवावा लागणार आहे. या संबंधी निर्णय 30 एप्रिलला घेण्यात येईल. यादिवशी सध्याच्या निर्बंधांचा शेवटचा दिवस आहे.”

    राजेश टोपे

    फोटो स्रोत, ANI

  15. 18 वर्षांवरील नोंदणी सुरू झाल्यानंतर Co-Win वेबसाईट अडकली

    लसीकरणासाठीची नोंदणी करण्यासाठीची Co-Win वेबसाईट चालत नसल्याची तक्रार सोशल मीडियावरून अनेकांनी केलीय.

    कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सगळ्यांना 1 मेपासून लस देण्यात येण्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यासाठी कोविन पोर्टल दुपारी 4 वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार होती.

    पण ही वेबसाईट चालत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर अनेकांनी केल्या आहेत.

    नोंदणीकृत मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला ओटीपीच येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

    कोविन पोर्टलवरून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीची नोंदणी सुरू करण्यात आल्यानंतरही अनेकांना हीच अडचण आली होती.

    पण 4 वाजता काही तांत्रिक कारणामुळे अडचण आली होती आणि ती आता सुधारण्यात आली असून वेबसाईट काम करत असून 18 वर्षांवरील व्यक्तींना आता कोविनवर नोंदणी करता येईल, असं आरोग्य सेतू अॅपकडून सांगण्यात आलंय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. आसाममध्ये झालेल्या भूकंपात हॉस्पिटल्सचं नुकसान

    आज सकाळी आसाममध्ये झालेल्या भूकंपाचा फटका कोव्हिडशी लढणाऱ्या यंत्रणेला बसलाय.

    आसामला आज सकाळी 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. ईशान्येमध्ये या भूकंपामुळे मोठं नुकसान झालंय.

    दिसपूर हॉस्पिटल, अपोलो क्लिक, डाऊन टाऊन हॉस्पिटल आणि एक्सलकेअर हॉस्पिटल या सगळ्या हॉस्पिटल्सचं या भूकंपामुळे नुकसान झाल्याचं PTI वृत्तसंस्थेने म्हटलंय.

    भूकंपाचे हादरे जाणवू लागताच लोकांनी घरांबाहेर आणि इमारतींबाहेर धाव घेतली. पण यामुळे गर्दी झाल्याने सोशल डिस्टंन्सिंग आणि कोव्हिडसाठीचे इतर नियम पाळले गेले नाहीत.

    कोव्हिडशी लढणाऱ्या आसाममधल्या बंधु-भगिनींसाठी हा दुसरा झटका असून आपण या सगळ्यांच्या सोबत असल्याचं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी म्हटलंय.

    आसाम भूकंप

    फोटो स्रोत, Getty Images

  17. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी दक्षिण कोरिया भारताला मदत पाठवणार

    भारतातल्या लोकांचा जीव वाचवता यावा यासाठी ताबडतोब वैद्यकीय मदत पाठवणार असल्याचं दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

    वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसारख्या गोष्टी आणि आणि इतर वैद्यकीय साहित्य ताबडतोब पाठवणार असल्याचं दक्षिण कोरियाच्या दूतावासाने म्हटलं आहे.

    कोरोनाविरुद्धच्या भारताच्या लढाईत आपण सोबत असल्याचं दक्षिण कोरियाने म्हटले आहे. तर सिंगापूरचे मंत्री मलिक उस्मान यांनी भारतासाठी 256 ऑक्सिजन सिलेंडर पाठवली आहे.

    सिंगापूरच्या वायुदलाची दोन विमान ही सिलेंडर घेऊन भारतात येतील. सिंगापूर वरून येणारी ही मदत भारतात बुधवारी दाखल होणार आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. गोव्यामध्ये लॉकडाउन जाहीर

    गोवा राज्यामध्ये 29 एप्रिल ते 2 मेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय.

    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा आणि उद्योगांना वगळण्यात आलंय. पण या कालावधीदरम्यान सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

    गोव्यात मंगळवारी (27 एप्रिल) संसर्गाचे 2110 रुग्ण आढळले तर 31 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला.

    प्रमोद सावंत

    फोटो स्रोत, Twitter/@DrPramodPSawant

  19. 'मुंबई मॉडेल'प्रमाणे देशाला काम करावं लागेल - संजय राऊत

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. महाराष्ट्रात सर्वांचं मोफत लसीकरण, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतले 5 महत्त्वाचे मुद्दे