You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल - डॉ. शशांक जोशी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. बगिचाच्या हिरवळीवर उभारलं तात्पुरतं स्मशान

  2. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 'या' 3 कारणांमुळे कमी होत आहे का?

  3. कोरोना : 'या' कारणांमुळे आता घरातही मास्क घालावा लागेल...

  4. 'या' मुंबईकर तरुणानं लोकांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी गाडी आणि दागिने विकले

  5. कोव्हिड कव्हरेज दिन: राज्य, देश आणि जगातील कोरोना स्थितीचा आढावा घ्या बीबीसी मराठीसोबत

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर तुमचे स्वागत आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये दिवसाला किमान 3 लाख कोव्हिड रुग्णांची नोंद होत आहे.

    महाराष्ट्राची स्थितीही विदारक आहे. राज्यात दिवसाला रोज नव्या 60 हजार रुग्णांची नोंद होत आहे. या रुग्णसंख्या वाढीमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    लोकांची ऑक्सिजन, बेड आणि औषधीसाठी वणवण सुरू असल्याचे दिसत आहे. बीबीसी आज तुमच्यापर्यंत राज्यातील, देशातील आणि जगातील कोरोनाची स्थिती काय आहे याची माहिती पोहोचवणार आहे.

    ताज्या बातम्या आणि अपडेटसह तुम्हाला आज कोव्हिड विषयक विश्लेषण, तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले, कोव्हिड काळात आशेचा किरण बनलेल्या व्यक्ती यांच्या बाबात वाचायला आणि पाहायला मिळेल.