अमित शाह यांच्याबरोबरची बैठक संपली, काय झालं या बैठकीत?
गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यास शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तयारी दर्शवली आहे. एकूण 15 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
लाईव्ह कव्हरेज
काल दिवसभरात काय घडलं?
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानिमित्त काल देशभरात भारत बंद पुकारण्यात आला.
देशभरातील विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी या बंदाला पाठिंबा दिला होता.
या बंदाला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक नेते आणि संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर जमा झाले होते.
काल गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवली. काही निवडक लोक अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी गेले असता काही शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
काही शेतकऱ्यांनी गृहमंत्र्यांना वेगळं भेटायला जाणं अयोग्य असल्याचं मत त्यांनी प्रदर्शित केलं. काल रात्री उशिरापर्यंत शेतकरी आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली.
सरकारने शेतकरी विधेयकात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली पण शेतकऱ्यांची मागणी तिन्ही विधेयक परत घेण्याची होती त्यामुळे तोडगा निघाला नाही अशी माहिती शेतकरी नेते हनन मुल्ला यांनी माध्यमांना दिली.
आम्ही हे पेज बंद करत आहोत. 9 डिसेंबर रोजी सुरू असलेल्या घटनांच्या ताज्या अपडेट तुम्हाला या पेजवर पाहायला मिळतील.
अमित शाह यांच्याबरोबरची बैठक संपली, काय झालं या बैठकीत?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली शेतकऱ्यांची बैठक संपली आहे. या बैठकीत हजर असलेले शेतकरी नेते हनन मुल्ला यांनी बाहेर आल्यावर सांगितले की 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात बैठक होणार नाही.
सरकार तिन्ही विधेयक परत घेण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता कमी आहे असं मुल्ला म्हणाले.
सरकार कृषी विधेयकात दुरुस्ती करण्यासाठी तयार आहे पण शेतकऱ्यांची मागणी हे विधेयक मागे घेणे ही आहे. उद्या सरकारकडून शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवला जाईल. त्यावर सर्व शेतकरी नेते विचार करून निर्णय घेतील.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अमित शाह यांच्या बैठकीला गैरहजर राहणारे उगराहा कोण आहेत?
गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी काही लोकांनी वेगळं जायला नको होतं - उगराहा
9 डिसेंबरला होऊ घातलेल्या आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार दरम्यानच्या चर्चेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांना अनौपचारिक भेटीचं निमंत्रण दिलं.
याबद्दल शेतकरी नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अनौपचारिक चर्चेसाठी 13 शेतकरी नेत्यांना बोलवण्यात आल्याची माहिती बीबीसी पंजाबीचे पत्रकार सरबजीत धालीवाल यांनी दिली.
पंजाबातली सगळ्यांत मोठी शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान युनियन (उगराहां)चे नेते या बैठकीसाठी गेलेले नाहीत. ही एक अनौपचारिक चर्चा असल्याचं भारतीय किसान युनियन (राजेवाल)चे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी बीबीसीला सांगितलं.
ते या बैठकीत सहभागी होत आहेत. पण काही नेत्यांनी या बैठकीसाठी एकटं जायला नको होतं, यामुळे शेतकरी संघटनांमधल्या एकजुटीबद्दल शंका निर्माण होऊ शकते असं मत भारतीय किसान युनियन (उगराहां)चे नेते जोगिंदर सिंह उगराहा यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलंय.
आजच्या बैठकीसाठी सरकारकडून आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं त्यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं.

दिवसभर धगधगणाऱ्या शेतकरी आंदोलनात रात्री जागता पहारा कसा असतो?
दिल्ली शेतकरी आंदोलनाला कोल्हापूरमध्ये संमिश्र प्रतिसाद
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मार्केट यार्ड लक्ष्मीपुरी येथील बाजारपेठ, गुळाची बाजारपेठ आज पूर्णपणे ठप्प होती शहरात बऱ्याच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या बंदला पाठिंबा दिला.शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील एसटीची सुविधा सुरळीत सुरू होती.
लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सुविधा सुरू ठेवण्यात आल्या होत्या या बंदला जिल्ह्यातील वेगवेगळ्या कामगार संघटना शेतकरी संघटना अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, शहर नागरी कृती समिती तसेच आम आदमी पार्टी ,काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता शहरातील ऐतिहासिक बिंदू चौकात यावेळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काळा झेंडा फडकवत सरकारच्या कृषी विधेयकांचा यावेळी निषेध करण्यात आला.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गावांमध्ये या बंदला पाठिंबा देत सरकारचा निषेध केला कृषी विधेयकाची होळी करत शेतकरी संघटनेला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शिरूर इथल्या निवासस्थानाबाहेर कृषी विधेयकाची होळी केली.
देशातील शेतकरी अशांत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे त्यामुळे याचा केंद्र सरकारने विचार करावा असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला बिंदू चौक इथल्या निषेध सभेत राजू शेट्टी बोलत होते.
दरम्यान, बाजारपेठा बंद असल्या तरी शहरात रस्त्यांवर दुपारनंतर वर्दळ पाहायला मिळाली. मात्र ग्रामीण भागात या कृषी विधेयकाला विरोध करण्यात आल्याने व्यवहार ठप्प होते. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून मद्यस्थ व्यापाऱ्यांचे आहे अशी टीका केली.

फोटो स्रोत, Swati Patil/BBC
फोटो कॅप्शन, कोल्हापूरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद आता मधला मार्ग नाही, गृहमंत्र्यांनी फक्त हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यावे : शेतकरी नेते
केंद्राने तीन कृषी विधेयकं मागे घ्यावीत यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता याप्रकरणी कोणताही मधला मार्ग उरला नसल्याचं म्हटलंय.
आंदोलक शेतकऱ्यांचं 13 सदस्यांचं एक प्रतिनिधी मंडळ आज संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार असल्याचं भारत बंदनंतर सिंघु बॉर्डरवर पत्रकारांशी बोलताना शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
स्वतः गृहमंत्र्यांनी त्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या प्रकरणामध्ये मधला मार्ग काढण्याचा पर्याय उरला नसून गृहमंत्र्यांनी केवळ हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यावं अशी मागणी आपण करणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय.
दरम्यान देशभरातल्या 25 राज्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी भारत बंद यशस्वी झाल्याचा दावा या शेतकरी नेत्यांनी केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
शेतकरी आंदोलनाविषयी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर काय म्हणाल्या?
शेतकरी आणि उद्योगपती यांच्या किती आर्थिक दरी आहे हे या आंदोलनामुळे हे अधोरेखित झाल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.
शेती संबंधी कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांकडे आहे केंद्राकडे नाही त्यामुळे ही त्यांच्याही हक्कांची पायमल्ली आहे असं मेधा पाटकर म्हणाल्या.
या निर्णयामुळे मंडी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल असे पाटकर म्हणाल्या.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बच्चू कडू यांचे मध्य प्रदेशात चक्का जाम आंदोलन
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बच्चू कडू अमरावतीतून दिल्लीकडे बाईकने रवाना झाले आहेत.
दरम्यान भारत बंद ला त्यांनी पाठिंबा दिला असून मध्यप्रदेशातील शिवपुरीच्या महामार्गावर त्यांनी चक्का जाम आंदोलन केले.
तासाभरापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. कडू यांना बाईक रॅलीत शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मध्य प्रदेशातील शेतकरीही त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहे.

स्थानबद्ध केल्याचा केजरीवालांचा आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळला
शेतकऱ्यांना भेटायला जात असताना पोलिसांनी मला अडवलं आणि त्यांनी मला स्थानबद्ध केलं असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
दिल्ली पोलिसांनी त्यांचा हा दावा फेटाळला आहे. जर पोलिसांनी मला अडवलं नसतं तर मी नक्कीच शेतकऱ्यांना भेटलो असतो असं केजरीवाल म्हणाले.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शेतकऱ्यांची सात वाजता बैठक
गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी आंदोलनातील नेते यांच्यात आज संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे.
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली. टिकैत यांनी सांगितलं की ते सर्वांत आधी सिंघू बॉर्डरवर जातील. तिथून ते काही नेते आणि शेतकऱ्यांना सोबत नेतील.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मोदी सरकारच्या नवीन शेतकरी विधेयकाला विरोध का होतोय? #सोपीगोष्ट 169
त्या व्हायरल पत्राबद्दल शरद पवार काय म्हणाले?
देशभरात भारत बंदला प्रतिसाद कसा आहे?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, भारत बंदमुळे हायवेवरही असा शुकशुकाट आहे. -शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे क्रमांक 24 बंद केला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत हायवे बंद ठेवण्याचा त्यांचा विचार आहे.
-नवी मुंबईतील एपीएमसी भारत बंदच्या निमित्ताने बंद आहे. मुंबईतील खाद्यपदार्थ खरेदी-विक्रीचं हे सगळ्यात मोठं केंद्र आहे.
-लखनौमधील सगळ्यात मोठं फळमार्केट बंद आहे. या मार्केटमध्ये साधारण 15,000 फळविक्रेते असतात.
-शेतकऱ्यांचं मागण्यांना पाठिंबा असल्याचं बँक युनियनचं म्हणणं आहे.
-तामिळनाडूत भारत बंदला फारसा पाठिंबा मिळालेला नाही. विरोधी पक्षांनी केलेल्या आवाहनानंतरही ट्रेड युनियन्सनी बाजार उघडले आहेत.
-हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात बाजार उघडले आहेत.
-मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.
-बिहार, आसाम, कर्नाटक या राज्यांमध्ये शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा मिळाल्याचं चित्र आहे.
त्यांनी ते पत्र वाचलेलं नाही- पवार
कृषी कायद्यासंदर्भात खासदार, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य आणि पत्रव्यवहार सोशल मीडियावर चर्चेत आहे. कृषी कायद्यासंदर्भात पवारांनी घूमजाव केल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पुकारलेल्या भारत बंदवेळी पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
MSP म्हणजे काय? मोदी सरकार शेतकऱ्यांची मागणी का मान्य करत नाहीये?
दिल्लीत शेतकरी आंदोलनाची दृश्यं
दिल्लीतल्या सिंघू बॉर्डर परिसरात बीबीसी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी टिपलेली छायाचित्रं

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक 
फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक आयुष्यातला शेवटचं आंदोलन दिल्लीत करणार - अण्णा हजारे
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
...तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीत आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करेन - अण्णा हजारे