अमित शाह यांच्याबरोबरची बैठक संपली, काय झालं या बैठकीत?

गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यास शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तयारी दर्शवली आहे. एकूण 15 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. शेतकऱ्यांसाठी पुण्यात शीख संघटनांचं आंदोलन

    पुणे
  2. YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  3. पुण्यात बंदला चांगला प्रतिसाद; मोर्चा, घोषणाबाजी

    दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक दुकानं बंद आहेत. आंदोलनाला पाठिंबा असलेल्या संघटनांनी शहराच्या विविध भागात मोर्चे काढत घोषणाबाजी केली.

    भारत बंद
    फोटो कॅप्शन, पुण्यातील दृश्य
    पुणे, शेतकरी आंदोलन
    फोटो कॅप्शन, पुण्यातील बरीच दुकानं बंद आहेत.
    पुणे, शेतकरी आंदोलन
    फोटो कॅप्शन, बंदमध्ये सहभागी आंदोलक
  4. अण्णा हजारेंचा बंदला पाठिंबा

    लोकपालासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

    अण्णा हजारे
    फोटो कॅप्शन, राळेगणसिद्धीत अण्णा हजारे
  5. मुंबईच्या डबेवाल्यांचा बंदला पाठिंबा

    "केंद्र सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांमुळे देशातला शेतकरी संपून जाईल. उत्तर भारतात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. आज भारतबंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनचा बंदला पाठिंबा आहे", असं असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. पुण्यात भारत बंदनिमित्ताने घोषणाबाजी

    सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यात भारत बंदनिमित्ताने घोषणाबाजी पाहायला मिळाली.

    कृषी कायदे, शेतकरी आंदोलन,
    फोटो कॅप्शन, पुण्यात भारत बंदनिमित्ताने आंदोलकांनी कृषी कायद्यांविरोधात घोषणा दिल्या.
    कृषी कायदे, शेतकरी आंदोलन
    फोटो कॅप्शन, कृषी कायद्यांविरोधात घोषणाबाजी
  7. शेतकरी आंदोलन : हे आहेत नेतृत्व करणारे प्रमुख चेहरे

  8. नाशकात कृषी विधेयकाची होळी

    नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विधेयकांची होळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी केली. भारत बंद ला सक्रिय सुरवात केली.तसेच केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे.

    शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे.त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे .अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. जोरदार घोषणा केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.

    नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्या व उपबजार समिती यांनी कडकडीत बंद पाळत किसान आंदोलनाला समर्थन दर्शवले, नाशिक बाजार समितीबाहेर बाजार समिती कर्मचारी व संचालक यांनी निदर्शने करत विधेयकाला विरोध नोंदवला.

    भारत बंदमध्ये सहभाग घेत अकोल्यामध्ये काँग्रेसने काढली मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली.

  9. RSSशी संलग्न संघटनांचं हमीभावाबद्दल काय म्हणणं आहे?

  10. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत

    दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

    केजरीवाल यांनी सोमवारी शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेला भेट दिली होती.

    कोणालाही त्यांच्या निवासस्थानी जाण्याची तसंच त्यांच्या घरातून निघण्याची परवानगी नाही.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. शेतकरी आंदोलन का करत आहेत?

  12. आतापर्यंतचे महत्त्वाचे अपडेट्स

    शेतकऱ्यांच्या भारत बंदला महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रतिसाद.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मलकापूरमध्ये रेल्वेरोको.

    कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प.

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरू.

    इतर राज्यातून येणाऱ्या मालासाठी पुणे APMCसुरू.

    मुंबईतसुद्धा भारत बंदला प्रतिसाद.

  13. कोल्हापुरात बाजार समितीत शुकशुकाट

    कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भारत बंद मुळे भाज्यांची आवक झाली नाही.

    नेहमी गजबजलेल्या शाहू मार्केट यार्ड मध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

    कोल्हापूर
    फोटो कॅप्शन, कोल्हापूर बाजारसमिती
  14. 24 राजकीय पक्षांचा बंदला पाठिंबा

    शेतकरी संघटनांच्या दाव्यानुसार, आतापर्यंत 24 राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र या आंदोलनाचा राजकीय वापर करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

    डीएमके, टीआरएस, सपा, बसपा, आरजेडी, शिवसेना, एनसीपी, अकाली दल, आप, जेएमएम, गुपकर आघाडी यांनी भारत बंदचं समर्थन केलं आहे.

    शेतकरी आंदोलन, केजरीवाल

    फोटो स्रोत, Twitter

    फोटो कॅप्शन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला भेट दिली.
  15. पुण्यातील APMCसुरू

    शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र आम्ही मार्केट खुलं ठेवलं आहे कारण अन्य राज्यातून येणारा माल साठवता येईल, तसं केलं नाही तर तो माल खराब होऊ शकतो. हा माल उद्या विकला जाईल असं स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद, मागण्या मान्य होण्याची अपेक्षा-डॉ. अजित नवले

    "दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. राज्याच्या अनेक भागात, विशेषत: ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे. बाजारपेठा, बाजारसमित्या बंद आहेत.

    किसान सभा, किसान समन्वय समिती आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीने उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार मानतो. सरकार याप्रश्नी योग्य दखल घेईल आणि दिल्लीतील आंदोलनाच्या मागण्या तातडीने मान्य होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो", असं भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी म्हटलं आहे.

  17. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रेल रोको

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारत बंद रेल रोको केला. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथे त्यांनी ट्रेन रोखून आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला करत त्यांना ताब्यात घेतलं.

    केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनेने भारत बंदची हाक दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. अमित शाह यांच्याबरोबरची बैठक संपली, काय झालं या बैठकीत?

  19. सिंघू बॉर्डरवरची आजची सकाळ

    दिल्ली-हरियाणा दरम्यानच्या सिंघू बॉर्डरवरची आजची सकाळ. इथे शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.

    शेतकरी

    फोटो स्रोत, bbc/shrikantbangale

  20. शेतकरी आंदोलन : हे 4 संभाव्य तोडगे निघू शकतात