शेतकरी आंदोलनाच्या ताज्या अपडेट्स आणि बातम्या
दिल्लीत दोन आठवड्यांपासून शेतकरी आंदोलन होत आहे. त्याचे लाइव्ह कव्हरेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
लाईव्ह कव्हरेज
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या मराठी शेतकऱ्यांची काय मागणी आहे?
काल दिवसभरात काय घडलं?
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानिमित्त काल देशभरात भारत बंद पुकारण्यात आला.
देशभरातील विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी या बंदाला पाठिंबा दिला होता.
या बंदाला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक नेते आणि संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर जमा झाले होते.
काल गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवली. काही निवडक लोक अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी गेले असता काही शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
काही शेतकऱ्यांनी गृहमंत्र्यांना वेगळं भेटायला जाणं अयोग्य असल्याचं मत त्यांनी प्रदर्शित केलं. काल रात्री उशिरापर्यंत शेतकरी आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली.
सरकारने शेतकरी विधेयकात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली पण शेतकऱ्यांची मागणी तिन्ही विधेयक परत घेण्याची होती त्यामुळे तोडगा निघाला नाही अशी माहिती शेतकरी नेते हनन मुल्ला यांनी माध्यमांना दिली.
काल दिवसभरातील घडामोडी तुम्हाला 8 डिसेंबरच्या पेजवर पाहायला मिळतील.
