नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग,
कोरोना व्हायरसविषयक महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजही आपण महाराष्ट्र, भारत आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहे.
बीबीसी मराठीचं लाईव्ह कव्हरेज आता सुरू करत आहोत. तत्पूर्वी काल घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...
1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 2,598 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 59,546 वर पोहोचली.
2.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली.
3.भारतात जवळपास 30 टीम कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचं काम करत आहे. साधारपणे एखादी लस 10 ते 15 वर्षांतून एकदा तयार होत असते. पण, एकाच वर्षात लस बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही एकदाच 100हून अधिक लशींवर काम सुरू केलं आहे. - के. विजय राघवन, भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार
4.मजुरांच्या तिकिटाचा भार राज्यांनी उचलावा, तसंच प्रवासादरम्यान मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करावी. - सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
5.सगळ्या जगात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. चीननं जगाला दिलेली ही वाईट भेटवस्तू आहे. – डोनाल्ड ट्रंप
6.फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात जवळपास 8 लाख 50 हजार जणांना नोकरी गमवावी लागली. यामुळे फ्रान्समधील बेरोजगारांची संख्या 45 लाखांवर पोहोचली आहे.
7.अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 1 लाखांवर गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 47 जणांचा मृत्यू झालाय.
काल कोरोना व्हायरससंदर्भात घडलेल्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.