You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाईव्ह कव्हरेज
वन नेशन वन रेशनः रेशन कार्डाचे कोणते नियम आजपासून बदलणार?
आज दिवसभरात काय घडलं?
नमस्कार मंडळी,
कोरोना व्हायरस संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजही आपण महाराष्ट्र, भारत आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या. आता आपली भेट पुन्हा लवकरच होईल.
पण, टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आजच्या महत्त्वाच्या घडामोंडीवर एकदा नजर टाकूयात.
1.महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2,682 रुग्ण आढळले, यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 62,228 वर पोहोचली.
2.देहू आळंदीहून निघणारी पंढरपूरची पायी वारी रद्द करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला.
3.कोरोनाच्या काळात शिक्षणाची व्यवस्था मुलांपर्यंत पोहोचावी, यासाठी 12 तास नॅशनल टिव्हीवर आणि 2 तास रेडिओवर स्लॉट देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे केली.
4.कोरोनाचा प्रसार थुंकीतून होतो. त्यामुळे थुंकणे आणि धूम्रपान यासाठी एक निर्णय काढण्यात आला आहे. एकदा थुंकल्यास 1 हजार रुपये दंड, 1 दिवस सेवा, दुसऱ्यांदा थुंकल्यास 3 हजार दंड आणि 3 दिवस सेवा, तिसऱ्यांदा थुंकल्यास 5 हजार रुपये दंड आणि 5 दिवस सेवा करावी लागणार आहे. – राजेश टोपे, आरोग्य मंत्री
5.शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
6.पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपासून मंदिर, मशीद, गुरुद्वारा...आदी सगळ्या प्रकारची प्रार्थनास्थळं उघडली जातील. पण, कोणत्याही ठिकाणी 10 पेक्षा अधिक जणांना एकत्र यायला बंदी असेल- ममता बॅनर्जी , मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
शुभ रात्री, भेटूयात...
दरभंगामध्ये ज्योतीचे घर बनले पिपली लाईव्ह, झोप अपूर्ण तर जेवणही अवेळी
महाराष्ट्राला 12 तास दूरदर्शनचा अॅक्सेस द्या – वर्षा गायकवाड
महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला 12 तास नॅशनल टिव्हीवर आणि 2 तास रेडिओवर स्लॉट देण्याची मागणी केली आहे. या मागणीचं पत्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलं आहे.
या माध्यमातून मुलांसाठी शैक्षणिक प्रोग्राम घेणे, आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांना शिकवणे, जिथं इंटरनेटचा अक्सेस शक्य नाही तिथपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 2,682 नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 62,228
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2,682 रुग्ण आढळले आहेत, यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 62,228 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी 8,381 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26,997 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33,124 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
'आम्ही केंद्राला सांगत होतो त्यावेळी मजुरांना जाऊ दिलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती'
कोरोना टोळधाडीचं संकट, कसं करायचं शेतीचं राखण?
ब्रेकिंग, रस्त्यावर एकदा थुंकल्यास 1 हजार रुपये दंड - राजेश टोपे
महाराष्ट्र सरकारनं आज तीन मोठे निर्णय घेतले आहेत. त्याविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
1. डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिबंधित डॉक्टरांच्या मानधनांत 20 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना 60,000 रुपयांऐवजी 75,000, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना 70,000 रुपयांऐवजी 85,000, इतर भागातील MBBS डॉक्टर्सना 55,000रुपयांऐवजी 70,000, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना 65,000 रुपयांऐवजी 80,000 रुपये मानधन देण्यात येईल.
2. महाराष्ट्र सरकारनं कोरोनासाठी काम करणाऱ्या सगळ्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी (कंत्राटी,रोजंदारी) जर ते कोरोनामुळे आजारी असेल आणि त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येणार आहे. यासाठी एकच अट आहे की, ते सेवेत असायला पाहिजेत आणि त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला पाहिजेत.
3. कोरोनाचा प्रसार थुंकीतून होतो. त्यामुळे थुंकणे आणि धूम्रपान यासाठी एक निर्णय काढण्यात आला आहे. एकदा थुंकल्यास 1 हजार रुपये दंड, 1 दिवस सेवा, दुसऱ्यांदा थुंकल्यास 3 हजार दंड आणि 3 दिवस सेवा, तिसऱ्यांदा थुंकल्यास 5 हजार रुपये दंड आणि 5 दिवस सेवा करावी लागणार आहे.
ब्रेकिंग, बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे - उद्धव ठाकरे
बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'चा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे, त्यांचे थकीच पीक कर्ज भरण्याची हमी कर्जमुक्ती योजनेतून राज्य शासनाने घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध बँकांना दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची 147 वी बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
अक्षय बोऱ्हाडे कोण आहे? सोशल मीडियावर तापलेलं प्रकरण नेमकं काय आहे?
#CoronaPodcast: आज काय घडलं?
#CoronaPodcast 71: यावर्षी पंढरपूरची वारी रद्द करण्यात आल्याचं जाहीर, 5 आकड्यांमधून जाणून घेऊया की काय आहे महाराष्ट्रातील परिस्थिती? 1 जूनपासून पश्चिम बंगालमध्ये धार्मिळ स्थळं उघडणार. याव्यतिरिक्त कोरोनाविषयक आज दिवसभरात काय घडलं, पाहा बीबीसी मराठीच्या या खास लाईव्ह कार्यक्रमात.
लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 65 पेक्षा अधिक वयाची व्यक्ती परजिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास परवानगी नाही.
जिल्ह्यात संचारबंदी असताना संभाजी भिडे हे अंकली टोल नाक्यावरून शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आले होते. त्यामुळे विना परवाना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी चौकशी करून त्यांना पुन्हा सांगली जिल्ह्यात पाठवले आहे
महाराष्ट्रात मे महिन्यात 30 लाख 58 हजार 165 शिवभोजन थाळ्यांचे वाटप – छगन भुजबळ
महाराष्ट्रात 1 ते 28 मे पर्यंत 834 शिवभोजन केंद्रांतून 30 लाख 58 हजार 165 थाळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे.
राज्यातील 1 कोटी 48 लाख 80 हजार शिधापत्रिका धारकांना 70 लाख 79 हजार 890 क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आलंय. तसंच 27 लाख 15 हजार 710 क्विंटल तांदळाचं वाटप करण्यात आलं आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
लॉकडाऊन 5 कसं असेल? आधीचे लॉकडाऊन यशस्वी झाले का?
कोरोनामुळे सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारुवाला यांचे निधन
सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारुवाला यांचे आज अहमदाबादमध्ये कोरोनामुळे निधन झालं.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दारुवाला यांच्या निधनावर ट्वीट करून दु:ख व्यक्त केलं.
ब्रेकिंग, कोरोना संकटामुळे गेल्या 11 वर्षांमधील सर्वाधिक कमी विकास दर
2019-20मध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा दर 4.2% राहण्याची शक्यता असल्याचं भारत सरकारनं म्हटलं आहे.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा हा दर गेल्या 11 वर्षांमधील सर्वांत कमी विकास दर आहे.
भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयानुसार, 2018-19मध्ये देशाचा विकास दर 6.1% होता.
जीडीपी में विकास का ये अनुमान ऐसे समय आया है जब देश में लॉकडाउन का तीसरा महीना जारी है जिससे देश की अर्थव्यवस्था को गंभीर नुक़सान हो रहा है.
देशात लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट उभं टाकलं आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीत देशाचा विकास दर 3.1% राहिला.
'चीन!' - डोनाल्ड ट्रंप यांच ट्वीट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नुसतंच 'चीन' असं ट्वीट केलं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण - अजित पवार
कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्यं पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना 50 लाख रुपयांचं विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.
विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्यं बजावणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 50 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली आहे.
यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी व तदर्थ असे सर्वं कर्मचारी) अशा सर्वं घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात वाढ करण्याचा तसंच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना 60,000 रुपयांऐवजी 75,000, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना 70,000 रुपयांऐवजी 85,000,
इतर भागातील MBBS डॉक्टर्सना 55,000रुपयांऐवजी 70,000, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना 65,000 रुपयांऐवजी 80,000 रुपये मानधन देण्यात येईल.