राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या वर

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.

लाईव्ह कव्हरेज

  1. रेड झोनमध्ये विमानतळ सुरू करणं धोकादायक-अनिल देशमुख

    राज्यातील रेड झोन क्षेत्रात विमानतळ आणि पर्यायाने हवाई वाहतूक सुरू करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

    कोरोनाचा प्रादुर्भाव असताना रेड झोनमध्ये हवाई वाहतूक सुरू करणं योग्य ठरणार नाही असं त्यांनी सांगितलं.

    काही दिवसांतच देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता प्रशासनाने हवाई वाहतूक सुरू होण्यास नकार दिला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. 'रेड झोनमध्ये विमानतळ सुरू करणं योग्य नाही'

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    उद्यापासून देशभरात टप्प्याटप्प्याने विमान प्रवास सुरू होत आहेत. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानुसार, सध्या रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये विमानप्रवास सुरू करणं "अजिबात योग्य नाही".

  3. ‘हिटलरने ज्यूंचा केला तसाच हा स्थलांतरितांचा छळ’: ‘सामना’तून मोदींवर टीकास्त्र

  4. राज्यात 24 तासात, 87 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना

    गेल्या 24 तासात, राज्यातील 87 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

    आतापर्यंत राज्यातील 1,758 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 18जणांचा मृत्यू झाला आहे. 673 पोलीस कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. राजावाडी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या शेजारी मृतदेह

    मुंबईतल्या घाटकोपर इथल्या राजावाडी हॉस्पिटलमधील एक व्हीडिओ आमदार नितेश राणे यांनी शेअर केला आहे. रुग्णांच्या बाजूला कोरोना मृतदेह ठेवण्यात आल्याचं धक्कादायक दृश्य यामध्ये दिसतं आहे.

    मृतदेहाशेजारील बेडवरील रुग्णाचा आवाज व्हीडिओत ऐकू येतो. त्या सांगतात, "हा मृतदेह 10-12 तास झाले तरी इथेच आहे. त्यांनी प्लॅस्टिकमध्ये कव्हर करून ठेवला आहे. बाजूला पेशंट्स आहेत. शेवटी आणखी एक मृतदेह तुम्हाला दिसेल. यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. कोणीही स्टाफ इथं आलेला नाही. मृतदेह ज्यांचा आहे त्या बाई माझ्यासमोर तडफडून गेल्या. पाणी द्यायला कोणी नव्हतं. मी माझ्या बाटलीतील पाणी द्यायचा प्रयत्न केला पण माझ्याकडे ग्लोव्ह्ज नाहीत. सेफ्टी किट नाही. मला मर्यादा आहेत"

    त्या पुढे सांगतात, त्या डायबेटिस आणि ब्लड प्रेशर पेशंट होत्या. सरकार प्रयत्न करते आहे. पण सरकार बाहेर जेवढं दाखवतं तेवढं आत होत नाही. हॉस्पिटलमध्ये आत सीसीटीव्ही बसवायला हवेत. पेशंट्सच्या मध्ये मृतदेहाला ठेऊन कसं चालेल? हा कोरोना पेशंटचा मृतदेह आहे. मी बरी व्हायला आले होते. आता असं वाटतंय, घरी गेलेलंच चांगलं.

    काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हीडिओ शेअर केला होता. आता त्यांनी राजावाडी हॉस्पिटलचा व्हीडिओ शेअर केला आहे. खरंच परिस्थिती बदलली आहे? का आपण आशाच सोडून द्यायची असा सवाल त्यांनी केला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. गोव्यात आता 50 नवे रुग्ण

    19 एप्रिललाच आपलं राज्य गोवा कोरोना मुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली होती. मात्र आता मुंबईहून परतलेल्या लोकांमुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत.

    राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीट करून सांगितलं की मुंबईहून राजधानी एक्सप्रेसने राज्यात आलेले 11 जण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 वर पोहोचला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    ही चिंतेची बाब असून, याबाबतीत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं राणे यांनी ट्वीट करून सांगितलं.

    आपण मुख्यमंत्र्यांना अधिक कडक पावलं उचलण्याची विनंती करू, जसं की गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, जे 48 तासांसाठी वैध असेल, असं राणे म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

  7. ब्राझीलमध्ये 24 तासात 965 जणांचा मृत्यू

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ब्राझीलमधली परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे.

    ब्राझीलमध्ये शनिवारी कोरोनामुळे 965 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनामुळे 22,013 जणांचा मृत्यू झाला आहे.

    शनिवारी ब्राझीलमध्ये 16,508 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. ब्राझीलमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 347,398 एवढी झाली आहे.

    कोरोना संसर्गाच्या बाबतीत ब्राझीलने रशियाला मागे टाकलं आहे. जगात अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक आहे.

    हे सरकारी आकडे आहेत. प्रत्यक्षात कोरोना मृतांची संख्या जास्त असू शकते. ब्राझीलमध्ये तपासणीसाठीचा कालावधी अत्यंत संथ आहे.

    ब्राझीलच्या स्थितीवरून राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांच्यावर टीका होते आहे. त्यांनी कोरोना संकटाला गांभीर्याने घेतलं नाही आणि लॉकडाऊनला विरोध करत राहिले असं टीकाकार म्हणत आहेत.

  8. मास्कविना डोनाल्ड ट्रंप गोल्फ कोर्सवर

    कोरोना

    फोटो स्रोत, EPA

    फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं गोल्फ खेळणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. 75 दिवसांनंतर पहिल्यांदाच ट्रंप गोल्फ खेळण्यासाठी गेले होते.

    शनिवारी सकाळी ट्रंप व्हाईट हाऊस मधून व्हर्जिनिया इथल्या खाजगी गोल्फ कोर्ससाठी रवाना झाले. त्यांनी पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि बेसबॉल कॅप परिधान केली होती.

    त्यांच्याबरोबर असणाऱ्या सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी मास्क परिधान केले होते मात्र ट्रंप यांनी मास्क घातला नव्हता.

  9. ब्रेकिंग, देशात 24 तासात 6767 नवे रुग्ण; 147 मृत्यू

    देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 6767 नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. दरम्यान याच काळात कोरोनामुळे 147जणांचा मृत्यू झाला आहे.

    देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,31, 868 एवढी झाली आहे. यापैकी 73,560 अॅक्टिव्ह केसेस आहेत. बरं झालेल्या 54, 440 लोकांना घरी सोडण्यात आलं आहे.

    देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3867 जणांचा मृत्यू झाला आहे.

    केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. अमेरिकेत 24 तासात 1,127 जणांचा मृत्यू

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे.

    अमेरिकेत गेेल्या 24 तासात कोरोनामुळे 1,127 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 97,048 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    सेंटर फॉर डिझीज कंट्रोल संस्थेच्या मते, अमेरिकेत एक जून आधी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या एक लाखापुढे जाऊ शकते. अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना मृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना मृत्यूंमध्ये ब्रिटनचा क्रमांक लागतो. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 36,757 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  11. कोरोनाशी झुंज देणारी धारावी या काळात अशी बदलली - पाहा फोटो

  12. न्यूयॉर्क शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, न्यूयॉर्क शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला होता.

    यंदाच्या वर्षी मार्चनंतर पहिल्यांदाच न्यूयॉर्क शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा शंभरपेक्षा कमी झाला आहे.

    गेल्या 24 तासात न्यूयॉर्क शहरात 84 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी 108 जणांचा मृत्यू झाला होता.

    अमेरिकेत न्यूयॉर्क शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. एप्रिल महिन्यात या शहरात हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला होता.

    आता न्यूयॉर्क शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे मात्र अमेरिकेत रुग्णांची संख्या वाढते आहे.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, अमेरिकेत 16,21, 658 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 97,048 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  13. कोरोना अपडेट्स

    गुड मॉर्निंग मंडळी,

    रविवारच्या सकाळी तुमचं बीबीसी मराठीच्या कोरोना लाईव्ह पेजमध्ये स्वागत. कोरोनाबाबतच्या राज्यातल्या, देशातल्या तसंच आंतरराष्ट्रीय अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील.

    जगभरात कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या 52,70, 244 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3 लाख 40 हजार जणांनी जीव गमावला आहे.

    राज्यात शनिवारी 2608 रुग्णांची नोंद झाली तर 60 जणांचा मृत्यू झाला. बरे झालेल्या 821 जणांना घरी सोडण्यात आलं.

    शनिवारी रेल्वे मंत्रालयातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. आतापर्यंत 2600 श्रमिक स्पेशल ट्रेन्सच्या माध्यमातून 35 लाख स्थलांतरित कामगार घरी परतले आहेत. येत्या काही दिवसात आणखी 10 लाख स्थलांतरित कामगार घरी परतण्याची शक्यता आहे.

    शनिवारी दिवसभरात काय काय घडलं याचा आढावा तुम्हाला या लिंकवर घेता येईल.