You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या वर

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.

लाईव्ह कव्हरेज

  1. मुंबईतून दररोज 25 उड्डाणांना परवानगी- नवाब मलिक

    मुंबईतून दररोज 25 उड्डाणांना आणि 25 विमाने उतरू देण्याला परवानगी दिली आहे. हळूहळू हा आकडा आणखी वाढेल असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

  2. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण

  3. आता बोलून नाही करुन दाखवा - भाजपा.नेते आमदार अँड आशिष शेलार

    आता बोलून नाही, करुन दाखवा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच राज्य शासनाने मदतीचे पॅकेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांंची संख्या वाढते आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांना जागा शिल्लक नाहीत, खाजगी रुग्णालये दाद देत नाहीत, खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, नर्स, डाॅक्टर नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाहीत, म्हणून रुग्ण दगावत आहेत.

    रुग्णांचे हालहाल होत आहेत असे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात आहे.

    तर दुसरीकडे शेतकरी, विद्यार्थी, बलूतेदार, कामगार, मुंबईकर केंद्रा प्रमाणे राज्य शासनाकडून काही तरी मदतीची अपेक्षा करतो आहे. त्यामुळे तातडीने महाराष्ट्राने मदतीचे पॅकेज जाहीर करावे.

    आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करणे अपेक्षित असताना पुन्हा महाराष्ट्राचा अपेक्षाभंग करीत आधी कोरोनाशी लढू मग पॅकेज देणार असे जाहीर केले.

    कोरोनाशी लढतानाच एकाचवेळी सर्वच आघाडीवर काम करणे अपेक्षित असताना मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आमदार आशिष शेलार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

  4. ब्रेकिंग, कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला

    कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची गती कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले आहे.

  5. वाढत्या लॉकडाऊनमुळे दृष्टिहीनांच्या आयुष्यातील अंधार अधिकच दाट होतोय..

  6. धारावी या काळात अशी बदलली आहे - पाहा फोटो

    मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होताना दिसतोय. त्यातही मुंबईतलं हॉटस्पॉटठरलीयती धारावी झोपडपट्टी.

    आशिया खंडातल्या सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक, अशी धारावीची ओळख आहे. दाटीवाटीच्या या वस्तीत लाखो लोक राहतात. इथं छोटे-मोठे कारखाने आहेत. चिंचोळ्या गल्ल्या आहेत. एका खोलीत अवघा संसार मांडलेले अनेक कुटुंबं आहेत.

    अशा सगळ्या स्थितीत कोरोना व्हायरससाठीच्या खबरदाऱ्या कशा घ्यायच्या, हा प्रश्न इथल्या अनेकांना भेडसावतोय.

    'धारावी' नामक या जगाचा धांडोळा या फोटोंमधून घेऊया...धारावीच्या या फोटोसांठी येथे क्लिक करा.

  7. जगभरातील एक कोटी मराठी भाषिकांचा जागतिक कोव्हिड - 19 महाजागर

    कोव्हिड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील 42 देशातून, अमेरिकेतील 21 राज्यातून आणि महाराष्ट्रासह भारतातील 12 राज्यातून एकाचवेळी अनेक मराठी भाषिक एकत्र येत असून 25 मे, 2020 रोजी ते समूह माध्यमावर कोव्हिड – १९ संबंधाने महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी ह्या करणार असून बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन 2021 शार्लेट अमेरिकाचे मुख्य संयोजक आणि गर्जा मराठीचे संस्थापक सदस्य संदीप पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील तसेच जगभरातील अनेक देशातील आणि भारतातील अनेक राज्यातील महाराष्ट्र मंडळांचे आजी माजी पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत.

  8. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना कमकुवत केलंय का?, सारा रॅन्सफर्ड, बीबीसी प्रतिनिधी, मॉस्को

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा कोरोना व्हायरसबाबतचा संयम आता संपताना दिसतोय.

    गेल्या सोमवारी त्यांनी संपूर्ण रशियातल्या लाखो मजुरांना फॅक्टरी आणि बांधकामाच्या ठिकाणी काम करण्याची परवानगी दिली. यासोबतच त्यांनी गेले सहा आठवडे रशियात असणारा लॉकडाऊन संपुष्टात आणत असल्याचंही जाहीर केलंय.

    इतर निर्बंध कसे आणि कधी हटवायचे याचा निर्णय त्यांनी त्या त्या विभागातल्या नेत्यांवर सोडलाय. देशात विशेषतः मॉस्कोमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त असताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

  9. काश्मीरची ही फॅशन डिझायनर बनवतेय PPE किट्स - व्हीडिओ

  10. उत्तर प्रदेशात आतापर्यंत कोरोनामुळे 155 जणांचा मृत्यू

  11. ब्रेकिंग, दिल्लीत कोरोनाचे 508 नवे रुग्ण

    दिल्लीमध्ये कोरोनाचे 508 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 13,418 वर गेली आहे.

  12. दिल्लीहून निघालेल्या स्थलांतरित रामपुकार पंडित यांचा फोटो व्हायरल कसा झाला?, नीरज प्रियदर्शी, पाटण्याहून बीबीसी हिंदीसाठी

    लॉकडाऊनमुळे घरी परतणाऱ्या हजारो प्रवाशी मजुरांचे फोटो आणि व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातलाच एक फोटो बिहारमधल्या बेगूसरायमध्ये राहणारे रामपुकार पंडित यांचाही आहे.

    या फोटोत फोनवर बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाल्याचं दिसतं. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार रामपुकार पंडित यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच ते 11 मे रोजी दिल्लीहून बेगूसरायमधल्या तारा बरियारपूर या आपल्या गावी जायला पायीच निघाले.

    मात्र, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर यूपी गेटजवळ त्यांना पोलिसांनी रोखलं. यूपी पोलीस त्यांना पायी जाऊ द्यायला परवानगी देत नव्हते आणि रामपुकार यांच्याकडे खासगी गाडीने जाण्यासाठी पैसे नव्हते.

    रामपुकार यांच्याकडे स्मार्टफोनही नाही आणि त्यांना तो वापरताही येत नाही. असता तर त्यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनचं ऑनलाईन तिकीट काढलं असतं किंवा बिहार सरकारकडे मदतीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असता.

  13. कोरोनाच्या काळातही या आजी 1 रुपयात इडली का विकतात?

    या आहेत कोईमतूरच्या कमलाताल आजी. 81 वर्षांच्या आहेत. दररोज शेकडो इडल्यांचे घाणे त्या काढतात. पण या वाफाळत्या इडल्या केवळ 1 रुपयाला विकतात. त्यांनी कोरोनाच्या काळातही इडलीचा दर का वाढवलेला नाही? हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ नक्की पाहा.

  14. कोरोना व्हायरसची साथ आणि पडद्यामागून खेळलं जाणारं युद्ध, जोनाथन मार्कस, बीबीसी प्रतिनिधी

    अमेरिका चीनबरोबर नवं शीतयुद्ध करण्याचा प्रयत्नात आहे असं चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत.

    कोरोना व्हायरसच्या जागतिक प्रकोपादरम्यान चीन आणि अमेरिकेमध्ये एक युद्ध छेडलं गेलं आहे आणि दोन्ही देशांचं बरंच काही पणाला लागलं आहे.

    चीनला जागतिक नेता व्हायचंय तर अमेरिकेच्या हातातून 'जगाचे पोलीस' ही भूमिका निसटताना दिसून येतेय. खरंतर अख्ख्या जगासाठीच हा चांगला काळ नाहीये. त्यात चीन आणि अमेरिकेचे आपसातले संबंधही चांगले नाहीयेत.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप वारंवार कोरोना व्हायरसला 'चीनी व्हायरस' म्हणत आहेत तर आक्रमक शैली असणारे त्यांचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ याला 'वुहान व्हायरस' म्हणत आहेत. अमेरिकेच्या अशा नाव ठेवण्याने साहजिकच चीन उखडला आहे.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री दोघांनीही कोरोना व्हायरसच्या सुरुवातीलाच त्यावर नियंत्रण न मिळवू शकल्याने चीनवर टीका केली आहे. पण चीनच्या प्रवक्त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या व्हायरससंदर्भात चीनने कोणतीही माहिती जगापासून लपवली नाही.

  15. निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटर्समुळे गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं?

  16. 'संकटाच्या काळात राजकारण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही'

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातील महत्त्वाचे मुद्दे.

    -शिक्षण, कृषी, अर्थ, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील परिस्थितीचा विचार

    -शेतकऱ्यांना बांधावर बी-बियाणं देण्याचा प्रयत्न

    -रत्नागिरीत टेस्ट लॅबला परवानगी. सिंधुदुर्गात व्हायरॉलॉजी सेंटरला परवानगी

    -चित्रीकरणाला कशी परवानगी देता येईल याचा विचार. डबिंग, पोस्ट प्रॉडक्शन, एडिटिंगचं काम कसं सुरू करता येईल याबाबत विचार.

    -कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही

    -हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये. तुम्ही केलं तरी आम्ही करणार नाही. महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. तुम्ही काही बोला, मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे.

    -केंद्र सरकारकडून राज्याचे पैसे येणं बाकी आहे. त्याविषयी दाद मागू.

    -वारीसंदर्भात बोलणी सुरू आहे. राजकारण करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. अडचणीच्या वेळी राजकारण करणं बसत नाही.

    -31 नंतर लॉकडाऊन राहणार की उठणार हा हो किंवा नाही असा विषय नाही. हळूहळू एकेक गोष्टी बंद करत गेलो.

    -लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवा. गर्दी झाली तर दुर्देवाने पुन्हा बंद करावं लागेल. प्रत्येकाला खबरदारी घ्यायची आहे. रांगेची शिस्त पाळा.

  17. ब्रेकिंग, अमेरिका चीनला एका नव्या शीतयुद्धाच्या दिशेने घेऊन जात आहे- चीनचे परराष्ट्रमंत्री

    अमेरिका चीनशी असलेल्या संबंधांना एका नव्या शीतयुद्धाचं वळण देत आहे असं मत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केले आहे.

    ते म्हणाले, "अमेरिकेतील काही राजकीय शक्तींनी चीन-अमेरिका संबंधांवर ताबा मिळवला आहे आणि त्या शक्ती दोन्ही देशांना एका नव्या शीतयुद्धाच्या दिशेने नेत आहेत. इतिहासाचं चक्र फिरवण्याचा हा एक भयंकर प्रयत्न आहे."

    वांग यी म्हणाले, "चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील राजकीय व्यवस्था वेगवेगळी आहे, ही व्यवस्था तिथल्या लोकांनी आपापल्या मर्जीने निवडली आहे.'

    "ते आपल्या मार्गावरुन दूर जात असले तरी आमच्याकडून सहकार्याची शक्यता मावळली आहे असं नाही. दोन्ही देशांमध्ये अनेक मोठ्या मुद्द्यांवर सल्लामसलत आणि चर्चेची गरज आहे."

    कोरोनाच्या काळातही या दोन्ही देशांनी सहकार्याची परंपरा कायम ठेवल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

  18. कोरोना मृतदेह अंत्यसंस्कार : मुंबई स्मशानभूमीतील कर्मचारी ज्यांच्या वाट्याला हे दुःख येतं, मयांक भागवत, बीबीसी मराठीसाठी

    "कधी-कधी स्मशानाबाहेर कोव्हिड-19 मुळे मृत्युमुखी पडलेले रुग्ण घेऊन येणाऱ्या अँब्युलन्सची रांग लागते. 4-5 अँब्युलन्स एकापाठोपाठ एक उभ्या असतात.

    स्मशानात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करेपर्यंत, बाहेर दुसरी अँब्युलन्स मृतदेह घेऊन उभी राहते. एक-एक करून आम्ही प्रत्येक मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो."

    मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत काम करणारे मोहन खोराटे यांचे हे शब्द. देशाच्या आर्थिक राजधानीत कोव्हिड-19ची परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव त्यांच्या बोलण्यातून होते.

    मुंबईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची 900च्याही पुढे गेलीय, आणि हा आकडा वाढतच असल्याने मोठा चिंतेचा विषय आहे.

    एकट्या मध्य मुंबईतील शिवाजीपार्क स्मशानभूमीत आतापर्यंत 150हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

  19. 100 कोरोनाग्रस्त मातांचं बाळंतपण या रुग्णालयानं कसं केलं?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना बीबीसीच्या बातमीच्या उल्लेख केला.

    कोरोना पॉझिटिव्ह महिलांची यशस्वी प्रसूती करण्याची कामगिरी डॉक्टरांनी केली आहे असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. ही स्टोरी वाचा इथे

  20. 'मे महिन्याच्या अखेरीस लाखो रुग्णाचा अंदाज होता; आपण कोरोनाला थोपवलं'

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे.

    -ईद घरातूनच साजरी करा. मुस्लिम बांधवाकडूनही सहकार्य मिळतंय.

    -कोरोना विषाणू गुणाकार करत जातो. अर्थसंकल्प जाहीर झाला, प्रत्येक भागासाठी काही करणार तोच हे संकट आलं.

    -मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात राज्यात सव्वा ते दीड लाख पॉझिटिव्ह केसेस असतील असा केंद्रीय पथकाचा अंदाज होता. खबरदारी म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आता 33,786 पॉझिटिव्ह केसेस आहेत. 13,404 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सव्वा लाख रुग्ण होतील असं भाकीत होतं, पण 33 हजार अक्टिव्ह केसेस आहेत.

    -मला हुकूमशहा झाल्यासारखं वाटतंय. घर के बाहेर निकल के देख, दिखाता हूँ असं वाटतं. बाहेर धोका आहे, म्हणून आपल्याला घरी राहायचं आहे.

    -बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आईंच्या पोटी जन्माला आलेली बालकं ठणठणीत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर. त्या डॉक्टरांचं, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे.

    -पुढची लढाई बिकट आहे. जीवघेणा. घाबरण्याचं कारण नाही. आरोग्य सुविधा निर्माण करतो आहोत. फिल्ड हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत. आयसीयू बेड्स उभे करतो आहेत. रुग्णांची आबाळ होतेय अशा बातम्या येत आहेत. व्हायला नको, पण त्रास होतो. कारण हे संकट अभूतपूर्व आहे. कोणाच्याही आकलनाच्या पलीकडे आहे.

    -मे महिन्याच्या अखेरीस 14 हजार बेड्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देऊ शकू. लक्षणं नसलेले, व्हेंटिलेटरची गरज असलेले अशी रुग्णांची विभागणी

    -राज्याला रक्ताची आवश्यकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर रक्तदान करावं.

    -पावसाळा येतो आहे. साथीच्या रोगांकडे दुर्लक्ष करू नका. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, तोंडाची चव जाणं, थकवा यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं दिसत असतील तर

    -पॅकेजच्या घोषणा आधीही झालेल्या आहेत. पॅकेज येतं, आत पोकळ असतं. आधी हे संकट दूर करणं आवश्यक