राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या वर
मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.
लाईव्ह कव्हरेज
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्दच- उदय सामंत
कोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळे आतापर्यंत 304 स्थलांतरितांचा मृत्यू
आज दिवसभरात का झालं?....
नमस्कार,1) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधून पावसाळ्यात घेण्याच्या काळजीबद्दल सूचित केले.2) त्यांनी आपल्याकडे स्थलांतरित मजुरांची यादी असल्याचा दावा केल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही यादी रेल्वेला देण्याची मागणी केली.
3) राज्यात एका दिवसात 3 हजारांहून नवे कोरोनाग्रस्त आढळले असून राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
4) मुंबईत प्रत्येक दिवशी 25 विमानांना उतरण्याची व उड्डाणाची परवानगी सरकारने दिली आहे.
आता हे लाइव्ह पेज येथेच थांबवत आहोत. उद्या नव्या लाइव्ह पेजच्या माध्यमातून भेटू.
धन्यवाद.
कोव्हिड योद्ध्यांचा ताण कमी करणाऱ्या हार्लेला तुम्ही पाहिलंत का?
'कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आणि मला वाटलं आता सगळं संपलं', दिपाली जगताप, बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Getty Images
"30 एप्रिलला माझ्या नवऱ्याला ताप आला. दोन दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मी, माझ्या दोन मुली आणि माझ्या 82 वर्षांच्या सासूबाईंची कोरोना टेस्ट केली. आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एका क्षणात माझा संसार उद्ध्वस्त झाला असं वाटलं," नवी मुंबईत राहणाऱ्या मानसी (बदललेलं नाव) यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मानसी आणि त्यांचे पती वाशी बाजारपेठेत व्यवसाय करतात. फळांच्या गिफ्ट पॅकेजिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. लॉकडाऊन सुरू असलं तरी बाजारपेठेत फळांची विक्री सुरू असल्याने दररोज हे दाम्पत्य कामावर जात होते.
बाजारपेठेत सकाळी ग्राहकांची गर्दी व्हायची. कारण वाशी बाजारपेठेत कल्याण,डोंबिवली,ठाणे अशा सगळ्या ठिकाणाहून छोटे व्यापारी फळांच्या खरेदीसाठी येत होते. बाजारपेठेत सुरक्षा व्यवस्था होती. सोशल डिस्टंसिंग पाळून काम करण्याच्या सूचना होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाचव्या लॉकडाऊन बद्दल नेमकं काय सांगितलं?
भारताला कॉलरा आणि प्लेगपासून यांनी वाचवलं होतं..., हरजिंदर, ज्येष्ठ पत्रकार

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईत काही वर्षांपूर्वी शिवसेनेने हाफकिन इन्स्टिट्युटच्या परिसरात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी हाफकिन इन्स्टिट्युटचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. पुढे स्मारकाची जागा बदलण्यात आली. मात्र, या घटनेने दाखवून दिलं की ज्या व्यक्तीने आपल्या देशाला दोन मोठ्या साथीच्या आजारापासून वाचवलं त्याचा आपल्या सगळ्यांनाच कसा विसर पडला आहे.
त्या व्यक्तीचं नाव आणि कर्तृत्व जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा- साथीच्या जीवघेण्या रोगापासून सुटका करणाऱ्या देवदुताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
कोरोना- आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांची स्थिती कशी आहे?
- चीनमध्ये आतापर्यंत 83000 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, 4600 लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
- दक्षिण कोरियात शनिवारी 23 नवे रुग्ण आढळले आहेत.राजधानी सोलमधील दाट लोकवस्तीच्या प्रदेशात ते आढळले आहे. इथं लॉकडाऊन सुरू आहे.
- थायलंडने कोरोनाच्या लशीची चाचणी उंदरांनंतर माकडांवर करणं सुरु केले आहे.
- इंडोनेशियात शनिवारी कोरोनाची लागण झालेले 949 नवे रुग्ण आढळले. या देशात कोव्हिडचे एकूण 21,745 रुग्ण असून आतापर्यंत या आजारामुळे 1351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- श्रीलंकेत मार्च महिन्यापासून कोलंबोसह अनेक भागांमध्ये कर्फ्यु लावण्यात आला होता. मंगळवारपासून त्यात थोडी सूट दिली जाईल असं सरकारनं म्हटलं आहे.
- जपानमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
कोरोना: मोदी सरकारच्या आर्थिक पॅकेजचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?
'कधीतरी हे सगळं संपेल आणि मी परत घरी जाईन', चिंकी सिन्हा, बीबीसी प्रतिनिधी

फोटो कॅप्शन, शरद उघाडे आपल्या स्वत:च्याच घरात दरवाजाबाहेर उभं राहून शरद उघाडे पत्नीकडे पाहून हसत होते. त्यांच्या पत्नीचा त्यादिवशी वाढदिवस होता
. 8 मे रोजी त्यासाठीच ते घराबाहेर आले. पण घरात जाऊन पत्नीला साध्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देऊ शकले नाहीत.
37 वर्षीय उघाडे जी साऊथ वॉर्डचे आयुक्त आहेत. कोरोनापासून संरक्षण कसं करावं याची माहिती ते सातत्याने लोकांना देत आहेत. त्यामुळेच ते 26 मार्चपासून आपल्या 150 सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये राहत आहेत.
मुंबईतील जी साऊथ वॉर्डात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आणि रुग्णसंख्या वाढू लागली. परिस्थिती आव्हानात्मक होती.
जिजामाता झोपडपट्टी आणि जनता कॉलनी हे हॉटस्पॉट बनले. त्यामुळे संपूर्ण परिसर सील करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या ठिकाणी एक चौरस किलोमीटरमागे जवळपास 82 हजार रहिवासी राहतात.
पीयूष गोयल यांनी मागितली उद्धव ठाकरे यांच्याकडे स्थलांतरित कामगारांची यादी
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
टीव्हीवर जुन्याच मालिका पुन्हापुन्हा, ठप्प असलेलं शूटिंग सुरू होणार तरी कधी?
महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 50 हजाराच्या पार. लाॅकडाऊन 5 बद्दल काय बोलले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅकेज जाहीर करण्यावरून सरकार आणि विरोधक आमने-सामने.
'शहरात भूकेने किंवा लाचारीने मरण्यापेक्षा गावात जाऊन मरू'
मुख्यमंत्र्यांनी घेतली बीबीसीच्या बातमी दखल
ब्रेकिंग, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या वर
आज राज्यात कोरोनाची लागण झालेले 3,041 नवे रुग्ण आढळले. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50,231 वर गेली असून आज राज्यात 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 1परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
X पोस्टवरून पुढे जा, 2परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
'पास सक्तीमुळं गावी जाता येत नाही, अन् शहरात पोट भरत नाही ' - पाहा व्हीडिओ
पास काढायची सक्ती केल्यामुळे अनेक मजूरांना महाराष्ट्रात अडकून पडावं लागलं आहे. हे कुटुंब त्यातलंच एक आहे. पाहा व्हीडिओ
व्हीडिओ कॅप्शन, 'पास सक्तीमुळं गावी जाता येत नाही, अन् शहरात पोट भरत नाही ' - पाहा व्हीडिओ महाराष्ट्रातून 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले- अनिल देशमुख
महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आज 24 मे पर्यंत जवळपास 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.
यासाठी 527 विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
