राज्यात 2608 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांचा एका दिवसात मृत्यू

राज्यात शनिवारी 2,608 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 47 हजारांच्या वर गेला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. बलात्काराची भाषा करणाऱ्यांना कठोर शिक्षा-अनिल देशमुख

    लॉकडाऊन लागू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. टिकटॉकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बलात्कार तसंच अॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देणारे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. असे व्हीडिओ पोस्ट करणाऱ्यांवर सायबर क्राईम डिपार्टमेंटतर्फे कठोर कारवाई होईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. 24 तासात कोरोनाचे 6654 नवे रुग्ण; 137जणांचा मृत्यू

    गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 6654 रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात रुग्णसंख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. याच काळात 137 जणांचा मृत्यू झाला.

    देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 125101 इतका झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3720 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. ब्राझील कोरोनाचा नवा केंद्रबिंदू

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं दक्षिण अमेरिका नवं केंद्र बनलं आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

    कोरोनामुळे ब्राझीलमध्ये आतापर्यंत 20,000 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. एवढा मृत्यूदर असूनही ब्राझीलमध्ये कोरोनाने परिसीमा गाठलेली नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

  4. कोरोनामुळे लहान मुलांसाठीच्या लसीकरण मोहिमेला उशीर?

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, कोरोनामुळे बाकी आजारांसाठी लस मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील आठ कोटी लहान मुलांना विविध आजारांसाठी लस मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलिओ, डिफ्थेरिया, मीजल्स या आजारांवरील लस देण्याच्या उपक्रमात अडथळा निर्माण होऊ शकतो.

    एका वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलांना देण्यात येणाऱ्या लसींच्या उपक्रमाला जगभरातील 68 देशांमध्ये फटका बसला आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

  5. ट्रंप घेत असलेलं HCQ औषध 'मृत्यूचा धोका वाढवू शकतं'

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन

    कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी HCQ अर्थात हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं. मात्र कोरोना रुग्णांना हे औषध देणं घातक ठरू शकतं असं लॅन्सेट या विज्ञानविषयक शोधपत्रिकेत म्हटलं आहे.

    अभ्यासात हे स्पष्ट झालं की कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना या औषधाचा कोणताही फायदा होत नाही. मी हे औषध घेत आहे असं ट्रंप यांनी सांगितलं होतं मात्र या औषधाचे दुष्परिणाण असतात असा इशारा आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी दिला होता. दुष्परिणामांची कल्पना असूनही ट्रंप यांनी या औषधाच्या वापराला प्रोत्साहन दिलं होतं.

    हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन मलेरियाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतं. मात्र कोरोना रुग्णांसाठी हे औषध परिणामकारक नाही त्यामुळे त्याची शिफारस करण्यात आलेली नाही. लॅन्सेटमधील प्रकाशित संशोधनाकरता 96,000 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला.

    यापैकी 95,000 रुग्णांना हे औषध देण्यात आलं. अँटीबायोटिकच्या बरोबरीने देण्यात आलं किंवा फक्त हेच औषध देण्यात आलं. कोरोनाच्या अन्य रुग्णांच्या तुलनेत हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्यात आलेल्या रुग्णांचे मृत्यू जास्त झाले आहेत. तसंच या रुग्णांमध्ये हृदयविकाराचाही धोका उत्पन्न झाल्याचं स्पष्ट झालं.

    हाइड्रॉक्सीक्लोरोक्विन देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर 18 टक्के राहिला तर हे औषध न देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर नऊ टक्के एवढाच राहिलाय

    क्लिनिकल ट्रायलव्यतिरिक्त हे औषध घेणं धोकादायक आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत असल्याने कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असा दावा ट्रंप यांनी केला होता.

  6. चर्च उघडायला हवीत, आपल्याला प्रार्थनांची आवश्यकता-ट्रंप

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

    चर्च हे प्रार्थनेचं ठिकाण आहे. आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर प्रार्थनेची आवश्यकता आहे. त्यामुळे चर्चा उघडायला हवीत असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलं.

    दारुची दुकानं, गर्भपात केंद्रं उघडली आहेत असा टोला त्यांनी विविध राज्यांच्या गर्व्हनरांना हाणला.

    सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थात सीडीसीने सार्वजनिक ठिकाणं खुली करण्याबाबत नियमावली जाहीर केली होती. यामध्ये धार्मिक स्थळांचा उल्लेख नव्हता.

  7. कोरोना अपडेट्स

    कोरोना

    फोटो स्रोत, EPA

    फोटो कॅप्शन, शरीराच्या तापमानाची चाचणी

    गुड मॉर्निंग,

    वीकेंडच्या सकाळी बीबीसी मराठीच्या कोरोना अपडेट्स लाईव्ह पेजमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत. कोरोनाला हरवण्यासाठी नियम फॉलो करणं आवश्यक आहे. अगदीच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. राज्यातील, देशातील आणि जगातील कोरोनाचे अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

    जगभरात 51 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 3.35 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून, तिथे 95,000 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे.

    भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6000हून अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात शुक्रवारी 2940 नवे रुग्ण आढळले तर 63 जणांचा मृत्यू झाला.

    दरम्यान कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत यादृष्टीने राज्य सरकारने खाजगी हॉस्पिटल्समधील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    RBIने कर्जदारांना दिलासा दिला आहे. कर्ज फेडण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे.

    राज्यात कोरोनावरून राजकारण तापलं असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 50 हजार कोटीचं पॅकेज देण्याची सूचना केली आहे.

    शुक्रवारी दिवसभरात काय काय घडलं हे तुम्ही या लिंकवर वाचू शकता.