राज्यात 2608 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांचा एका दिवसात मृत्यू

राज्यात शनिवारी 2,608 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 47 हजारांच्या वर गेला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोनाचं संकट सर्कसच्या जीवावर का उठलंय?

  2. 80 टक्के ट्रेन्स बिहार आणि उत्तर प्रदेशात आल्या

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    स्थलांतरित कामगारांसाठी 1 मे पासून चालवण्यात आलेल्या ट्रेन्सपैकी 80 टक्के ट्रेन्स बिहार आणि उत्तर प्रदेशात आल्या असं रेल्वेचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी सांगितले.

  3. आतापर्यंत 2600 विशेष ट्रेन्सची सोय

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    लॉकडाऊननंतर स्थलांतरित कामगारांसाठी 2600 ट्रेन्सची सोय आतापर्यंत करण्यात आल्याचे 35 लाख कामगारांनी याचा फायदा घेतल्याचे केंद्रीय गृह खात्याच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले.

  4. महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोव्हिड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

    महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोव्हिड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोव्हिड योध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे असे आवाहन केले आहेमुख्यमंत्री आपल्या पत्रात पुढे म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

    हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही.

    या युद्ध संकटात एक "सैनिक" बनून आपण कोव्हिड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

  5. रेल्वे खात्याची पत्रकार परिषद सुरू

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. हर्ड इम्युनिटीमुळे साथीचे आजार बरे होऊ शकतात का? | #सोपीगोष्ट 82

  7. ‘शेवटचा एकदा तरी चेहरा पाहू द्या’- मुंबई स्मशानभूमीतील कर्मचारी ज्यांच्या वाट्याला हे दुःख येतं

  8. 'पास सक्तीमुळं गावी जाता येत नाही, अन् शहरात पोट भरत नाही '

    व्हीडिओ कॅप्शन, 'पास सक्तीमुळं गावी जाता येत नाही, अन् शहरात पोट भरत नाही ' - पाहा व्हीडिओ
  9. अभिनेता सोनू सूदचे ट्वीटरवर कौतुक

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरित कामगारांसाठी बसची व्यवस्था केल्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पवार यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.

  10. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका, पण मनसेचा त्यांच्यावरच निशाणा

  11. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले कामगार मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात अडकलेले सुमारे स्थलांतरित कामगार मध्यप्रदेश आणि छत्तिसगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासाठी कटरा येथून विशेष रेल्वे सोडण्यात आली.

  12. कोरोनाच्या संसर्गातच लहान मुलांमध्ये फैलावतोय 'हा' गूढ आजार

  13. निर्मला सीतारमण यांच्या 'आत्मनिर्भर' पॅकेजमधल्या घोषणांमध्ये नवं काय?

  14. सरकारने परवानगी दिलेल्या मोबाईल देखरेखीवर इस्त्राएलचे नागरिक का नाराज आहेत?

    व्हीडिओ कॅप्शन, सरकारने परवानगी दिलेल्या मोबाईल देखरेखीवर इस्त्राएलचे नागरिक का नाराज आहेत?
  15. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसंदर्भात ICMRची नियमावली

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन

    कोरोना रुग्णांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात यावं की नाही यावरून वेगवेगळे मतप्रवाह असताना ICMR अर्थात इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने या औषधाच्या वापराबाबत नियमावली जारी केली आहे.

    ज्वॉइंट मॉनिटरिंग ग्रूप आणि नॅशनल टास्क फोर्सच्या शिफारसीनुसार, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध कोणाला द्यावं?

    -कोव्हिड-१९ रुग्णांचे उपचार आणि कंटेनमेंटसाठी कार्यरत लक्षण नसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना

    -नॉन कोव्हिड रुग्णालयं आणि ब्लॉकमध्ये काम करणारे लक्षण नसलेले आरोग्य कर्मचारी पॅरामिलेटरी, पोलीस कर्मचारी, फ्रंटलाईनवर कोव्हिडच्या सर्व्हेक्षणात कार्यरत आरोग्य कर्मचारी कोव्हिड-१९ रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नातेवाईकांना

    कोणाला देण्यात येवू नये?

    -रॅटिनोपॅथीचा आजार असलेल्यांना

    -कार्डिओमायोपॅथीचा आजार असलेल्यांना

    -हृदयाचे ठोके अनियमित असलेल्यांना

    -HCQ बाबत हायपर सेन्सिटीव्हीटी असलेल्यांना

    - १५ वर्षाखालील लहान मुलं आणि गर्भवती महिला

    आयसीएमआरच्या माहितीनुसार, हायड्रोस्कि-क्लोरोक्विनमुळे फार कमी प्रकरणात कार्डियोमायोपॅथीसारखे किंवा हृदयाचे ठोके अनियमित होण्यासारखे दुष्परिणाम जाणवतात. होतात.

    फार थोड्या प्रकरणात या औषधाच्या वापरामुळे व्हिजुअल डिस्टर्बन्स म्हणजे डोळ्यांवर याचा परिणाम होतो. मॉनिटरींग हायड्रोस्कि-क्लोरोक्विन देण्यापूर्वी ईजीसी काढून घ्यावा प्रतिबंधाक्मक म्हणून हे औषध सुरू असताना काही साईड इफेक्ट जाणवले तर ईसीजी काढून तपासणी करावी आठ आठवड्यांच्या पुढे वापरण्याआधी ईसीजी काढून तपासणी करावी.

    प्रतिबंधाक्मक म्हणून वापरताना एकदा औषध सुरू असताना ईसीजी काढून तपासणी आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, औषध डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध देण्यात येवू नये.

    हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रतिबंधात्मक म्हणून घेतलेल्या १३२३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्व्हेक्षणातून समोर आलं, नॉशाची तक्रार ८.९ टक्के ७.३ टक्क्यांनी ओटीपोटात दुखण्याची तक्रार ओकारी १.५ टक्के हृदयावर परिणाम १.९ टक्के

    फार्मेको व्हिजलन्स प्रोग्राम इंडियाच्या माहितीनुसार, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन वापरामुळे दुष्परिणाम झाल्याच्या २१४ तक्रारी समोर आल्या आहेत.

  16. संजय राऊतांनी घेतली राज्यपालांची भेट

    कोरोना

    फोटो स्रोत, PRO

    फोटो कॅप्शन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी राजभवन इथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.

  17. गोवा कोरोनामुक्त; देशांतर्गत पर्यटनासाठी खुलं

    "पर्यटनासाठी प्रसिद्ध गोवा राज्य कोरोनामुक्त झालं आहे. त्यामुळे देशाच्या अन्य राज्यातील पर्यटक इथे येऊ शकतात. परदेशी पर्यटकांना इथे येण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. गोव्यातील उद्योगजगताचं प्रदीर्घकालीन नुकसान नाही", असं गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. चीनमध्ये 24 तासात कोरोनाचा रुग्ण नाही

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, चीनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णाची नोंद झाली नाही

    कोरोना विषाणूचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. चीनमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

    गेल्या वर्षी वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली होती. आता जगभर या विषाणूने थैमान घातलं आहे.

    मार्च महिन्यापासून चीनमधील कोरोना रुग्णांमध्ये घट व्हायला सुरुवात झाली. कठोर लॉकडाऊनमुळे हे शक्य झाल्याचं सांगितलं जात आहे.

    दरम्यान चीनमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो आहे. अन्य देशात स्थायिक झालेले चीनचे नागरिक मायदेशी परतत आहेत. काही आठवड्यांपूर्वी चीनच्या पूर्वेकडील जिलिन आणि हेइलॉन्गजियांग भाग कोरोनाचा केंद्रबिंदू बनला होता. वुहानमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला काही रुग्ण सापडले होते. आठ एप्रिलला तिथे लॉकडाऊन हटवण्यात आला होता.

    वुहानमधील सर्वच्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करून घेण्याचं प्रशासनाने पक्कं केलं आहे.

  19. अमेरिका चीनच्या 33 कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार?

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, क्षि जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रंप

    लष्कराशी निगडित तसंच मुस्लीम वीगर अल्पसंख्याकांच्या शोषणाशी संबंधित चीनच्या 33 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा अमेरिकेचा विचार आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या मुद्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगाशाळेत तयार झाला आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात पुरावेही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

    सात कंपन्या आणि दोन संस्थांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. वीगर समाजाचे मानवाधिकारांवर कब्जा करत त्यांना अटक करून, त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या आणि त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याचं अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

    ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि फेशियल रिकगनिशन क्षेत्रात कार्यरत होत्या. अमेरिकेतील अनेक बड्या कंपन्यांनी या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

  20. हर्ट्झ कंपनी अमेरिकेतून गाशा गुंडाळणार?

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, हर्ट्झ

    जगातील प्रसिद्ध कार रेंटल कंपनी हर्ट्झने कोरोना काळात कारभार ठप्प झाल्यानंतर अमेरिकेत दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.

    हर्ट्झ ग्लोबल होल्डिंग्ज इंकचं हे आवेदन फक्त अमेरिकेतल्या कारभारापुरतं आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील कामकाजाचा याच्याशी संबंध नाही.

    सरकारकडूुन प्रवासावर निर्बंध लागू झाल्याने कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागला असं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.

    हर्ट्झ कंपनीचा कारभार विमानतळावर उतरल्यानंतर भाड्याने गाडी घेणाऱ्या व्यक्तींच्या बळावर चालत होता. प्रशासनाने विमान सेवा बंद केल्यानंतर कंपनीच्या उत्पनाचा स्रोतच बंद झाला.

    कंपनीवर 19 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. जगभरात कंपनीचे 39,000 कर्मचारी आहेत. काही महिन्यांपूर्वीच उत्तर अमेरिकेतल्या ऑफिसातून 10,000 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं.

    कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कंपन्यांमध्ये हर्ट्झचं नाव घेतलं जात आहे.

    अमेरिकेतील एअरलाईन्स उद्योग संकटात आहे मात्र सरकारी मदक मिळाल्याने त्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. मात्र हर्ट्झ कंपनीला अशा स्वरुपाची मदत मिळू शकली नाही.