वीकेंडच्या सकाळी बीबीसी मराठीच्या कोरोना अपडेट्स लाईव्ह पेजमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत. कोरोनाला हरवण्यासाठी नियम फॉलो करणं आवश्यक आहे. अगदीच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. राज्यातील, देशातील आणि जगातील कोरोनाचे अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.
जगभरात 51 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 3.35 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून, तिथे 95,000 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे.
भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6000हून अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात शुक्रवारी 2940 नवे रुग्ण आढळले तर 63 जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत यादृष्टीने राज्य सरकारने खाजगी हॉस्पिटल्समधील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
RBIने कर्जदारांना दिलासा दिला आहे. कर्ज फेडण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे.
राज्यात कोरोनावरून राजकारण तापलं असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 50 हजार कोटीचं पॅकेज देण्याची सूचना केली आहे.
शुक्रवारी दिवसभरात काय काय घडलं हे तुम्ही या लिंकवर वाचू शकता.