You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यातल्या खासगी रुग्णालयातील 80% बेड्स सरकारने घेतले ताब्यात

राज्याची आरोग्ययंत्रणा कोलमडली, 50 हजार कोटींचं पॅकेज द्या - देवेंद्र फडणवीस

लाईव्ह कव्हरेज

  1. युक्रेनच्या 'या' डॉक्टरांनी महाराष्ट्रात येऊन लाखो भारतीयांचे प्राण वाचवले

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं?

  4. चालू आर्थिक वर्षात देशाचा प्रत्यक्ष विकासदर उणे राहणार - RBI गव्हर्नर

  5. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू व्हावी- अनिल परब

  6. आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा

    नमस्कार मंडळी,

    बीबीसी मराठीचं आजचं लाईव्ह कव्हरेज थांबवत आहोत.

    जाता जाता एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर...

    • खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राज्य सरकारच्या ताब्यात
    • परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देणं योग्य ठरणार नाही, राज्यपालांची भूमिका
    • RBI कडून कर्जदारांना दिलासा, कर्ज फेडण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली
    • राज्यात आज 2940 नवे रुग्ण, आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक वाढ
    • राज्याची आरोग्ययंत्रणा कोलमडली, 50 हजार कोटींचं पॅकेज द्या - देवेंद्र फडणवीस
    • मोदींचं 20 लाख कोटींचं पॅकेज, पुढचे 5 दिवस त्याचा पाढा वाचणं ही क्रूर चेष्टा - सोनिया गांधी
    • देशातील 80 टक्के कोरोनाग्रस्त 5 राज्यांमध्ये

    कोरोना व्हायरससंदर्भातील क्षणा-क्षणाचे अपडेट्स मिळवण्यासाठी उद्या पुन्हा बीबीसी मराठीच्या वेबसाईटला भेट द्या. आमचं फेसबुक पेज लाईक करा. युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. ट्वीटर आणि इतर सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा.

    धन्यवाद, शुभरात्री.

  7. महिलेने चालत्या बसमध्ये दिला बाळाला जन्म

    महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशच्या दिशेने बसने जात असलेल्या एका महिलेने चालत्या गाडीतच बाळाला जन्म दिल्याची घटना आज घडली. मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या राऊ गावाजवळ बस आली असताना महिलेची प्रसूती झाली.

    त्यानंतर आई आणि बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

  8. 'माझा मुलगा अतिरेकी नव्हता, तरीही पोलिसांनी त्याचा मृतदेह दिला नाही'

  9. परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देणं योग्य ठरणार नाही, राज्यपालांची भूमिका

    परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे.

    पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. यानंतर अंतिम वर्षीच्या परीक्षासुद्धा रद्द करण्यात याव्यात या मागणीचं पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांना लिहिलं होतं.

    अंतिम वर्षीच्या परिक्षा न घेणं म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नियमावलीचं उल्लंघन आहे. याबाबत युजीसीला पत्र लिहिण्याआधी राज्यपालांना माहिती देण्यात आली नाही, यावर राज्यपाल नाराज आहेत.

    तसंच अंतिम परीक्षा घेतल्याशिवाय डिग्री देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे.

  10. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतरचं जग 'असं' असेल : पाहा व्हीडिओ

  11. खबरदारी बाळगून चित्रपट निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का याची चाचपणी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना सांगितले आहे.

    आज इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली. यावेळी रेड झोन्स मधील शहरे वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळे उपलब्ध होतील का तसेच चित्रीकरणाबाबत आराखडा लगेच सादर केल्यास शासन त्यावर निर्णय घेईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    या कॉन्फरन्समध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे डी मजिठीया, नितीन वैद्य, एकता कपूर पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी सहभागी झाले होते.

  12. #CoronaPodcast : कोरोना व्हायरससंदर्भात आज काय-काय घडलं?

    #CoronaPodcast : महाराष्ट्रात एकाच दिवसात 2940 रुग्णांची वाढ. मुंबईमध्ये 24 तासांत वाढले 1,751 रुग्ण. खासगी हॉस्पिटल्सच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं घेतले 80% बेड ताब्यात, भाजपनं आज केलं ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन तर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका. याबाबत सांगतायत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड

  13. आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केलं 1110 कोटींचं 'रिस्टार्ट पॅकेज'

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी 1110 कोटींची रिस्टार्ट पॅकेज योजना जाहीर केली आहे.

    पहिल्या टप्प्यात 450 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुमारे 10 लाख जणांना रोजगार देत 98 हजार लहान-मोठ्या उद्योगांना याचा लाभ मिळेल, असं आंध्र प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने कळवलं आहे.

  14. कोरोनाच्या काळातही या आजी 1 रुपयात इडली का विकतात?

  15. 'सगळं चांगलं आहे ना? मग टक्कल का केलंय?'

  16. राज्यात आज 2940 नवे रुग्ण, आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक वाढ

    आज राज्यात 2940 कोरोनाची लागण झालेले नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजपर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.

    या वाढीसह राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 44 हजार 582 वर पोहोचली आहे.

    तसंच राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येने आज 1500 चा टप्पा पार केला. आज राज्यात 64 जणांच्या मृत्यूची नोंद होऊन एकूण मृत्यूंचा आकडा 1517 झाला आहे.

    राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज राज्यात 857 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत राज्यातील 12 हजार 583 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

  17. गोव्यात पुन्हा आढळले दोन कोरोनाग्रस्त

    काही दिवसांपूर्वी पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या गोवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत.

    आज(शुक्रवारी) गोव्यात दोन कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 54 वर पोहोचली आहे. यापैकी 16 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून इतर 38 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती गोवा सरकारने दिली आहे.

  18. लॉकडाऊन काळात वाढदिवसानिमित्त गर्दी जमवल्याप्रकरणी आमदाराला हायकोर्टाची नोटीस

    लॉकडाऊन काळात वाढदिवसानिमित्त गर्दी जमवल्याप्रकरणी तेलंगण राज्यातील तेलंगण राष्ट समितीचे आमदार एम. भूपाल रेड्डी यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.

    तेलंगणमधील नारायणखेडचे आमदार रेड्डी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. लॉकडाऊनचे नियम मोडून हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी त्यांना तेलंगण हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.

  19. राज्याची आरोग्ययंत्रणा कोलमडली, 50 हजार कोटींचं पॅकेज द्या - देवेंद्र फडणवीस

    देशातील सर्वाधिक रूग्ण आणि देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रात असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही. एवढेच काय, केंद्राकडून जो निधी येतो आहे, तोही खर्च केला जात नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

    यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याचीच भूमिका भाजपाने घेतली आहे आणि ती यापुढेही राहील. पण, जनतेने तरी किती यातना सहन करायच्या. त्यांना समस्यांना वाचा फोडणार कोण? आज प्रत्येक घटक संकटात आहे. राज्यात शेतमाल खरेदी पूर्णत: थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. केंद्र सरकारने पैसे दिले तरी खरेदी नीट होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. हातावर ज्यांचे पोट आहे, असे असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा सर्व गरिबांसाठी तत्काळ 50 हजार कोटींचं पॅकेज देण्याची गरज आहे.

  20. ब्रेकिंग, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राज्य सरकारच्या ताब्यात

    राज्यातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स सरकारने अधिग्रहीत केले आहेत.

    या रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना सरकारचा निर्णय पूर्ण महाराष्ट्रात लागू असेल, असं राज्य सरकारने कळवलं आहे.

    राज्याचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी याबाबतचं परिपत्रक सर्व संबंधित अधिकारी आणि आस्थापनांना पाठवलं आहे.

    सर्व नर्सिंग होम, क्लिनिक, मोठ्या खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांना हा आदेश बंधनकारक असेल.

    कोव्हिड रुग्णांसाठी प्रतिदिन रूपये 4 हजार, 7 हजार 500 आणि 9 हजारांची श्रेणी ठरवण्यात आली आहे. कोव्हिड-10 ने आजारी नसलेल्या रुग्णांबाबत इन्शुरन्स कंपनीसोबत असलेल्या कराराप्रमाणे पैसे आकारावेत, अशी सूचना राज्य शासनाने केली आहे.