"विमानात सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही"- हरदीप सिंह पुरी
राज्य, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.
लाईव्ह कव्हरेज
जगभरातल्या रुग्णसंख्येत एका दिवसात उच्चांकी वाढ - WHO
कोरोना व्हायरसच्या साथीपासून जगाची
इतक्यात सुटका होणार नसल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. गेल्या 24 तासांमध्ये
जगभरात 1,06,000 नवीन रुग्णांचं निदान झालेलं आहे.
आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वात मोठी रुग्णसंख्याआहे.
संपूर्ण जगातली कोव्हिड-19ची
रुग्णसंख्या आता 50 लाखांच्या उंबरठ्यावर आहे.
एकीकडे
श्रीमंत देश लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत आहेत तर दुसरीकडे गरीब
देशांमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरत असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे संचालक
तेद्रॉस अॅडहॉनम गिब्रिएसुस यांनी जिनिव्हामध्ये म्हटलंय.
युरोपातल्या देशांनी संसर्गाच्या
दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावं, असा इशारा युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड
कन्ट्रोलच्या संचालक डॉ. अँड्रिया अमॉन यांनी दिलाय.
फोटो स्रोत, Getty Images
रेल्वेच्या 200 गाड्यांसाठी आजपासून तिकिट बुकिंग
रेल्वेने 1 जूनपासून सुरू
होणाऱ्या 200 ट्रेन्सची
यादी जाहीर केली आहे. या ट्रेनसाठी 21 मे म्हणजेच आजपासून बुकिंग
सुरू होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून हे बुकिंग सुरू होईल.
स्थलांतरित मजुरांसाठी
सुरू केलेल्या श्रमिक स्पेशल गाड्यांहून या ट्रेन वेगळ्या असतील.
या गाड्यांमध्ये एसी आणि
नॉन एसी असे दोन क्लास तसेच जनरल कोचही असतील. अर्थात, सर्वच कोचसाठी आरक्षण करावं
लागेल.
ट्रेनच्या तिकिटांची
बुकिंग ही केवळ IRCRC ची वेबसाइट किंवा मोबाईल अपवरूनच होईल. 30
दिवस आधी या गाड्यांसाठीचं आरक्षण करता येईल.
प्रवासाला सुरूवात
करण्यापूर्वी सर्व प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जाईल आणि कोरोनाची लक्षण नसलेल्या व्यक्तिंनाच
प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या गाड्यांव्यतिरिक्त अन्य
मेल/एक्सप्रेस, पॅसेंजर आणि सबअर्बन रेल्वे सेवा
अजूनतरी सुरू होणार नाहीत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त, 2
गेल्या 24 तासातले कोरोनासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट्स
फोटो स्रोत, Getty Images
भारतात गेल्या 24 तासात 5,611 नवीन रुग्ण
आढळले आहेत. ही एका दिवसात आजवर झालेली सर्वाधिक वाढ आहे. भारतात आता कोरोनाचे 1 लाख 6 हजार 750 रुग्ण
बुधवारी राज्यात 2250 नवे
कोरोनाग्रस्त रुग्ण, एकूण संख्या 39 हजार 297 वर
25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू-गृहमंत्रालय़
नागरी सेवा
पूर्व परीक्षेची तारीख 5 जून ला जाहीर होणार - यूपीएससी
कोव्हिड-19 मधून बरे होण्याचं प्रमाण 39.62
टक्क्यांवर