या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ काॅन्फसरींग मिटींगमध्ये घेण्यात आला.
यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिकविधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त होणारे इतर सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे
फोटो स्रोत, get
केरळमध्ये आढळले 24 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण
केरळमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 24 नवे रुग्ण आज(गुरुवारी) आढळून आले. त्यामुळे राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एकूण 177 वर पोहोचली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत 701 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 510 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
कोरोना विरोधातील लढाईत युकेमधील प्रयोगशाळा बजावते महत्त्वाची भूमिका
प्रियंका गांधींना 'योगी' सरकार एवढं महत्त्व का देतं?
स्थलांतरित मजुरांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत 67 कोटी 19 लाख 55 हजार 490 रुपये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
राष्ट्रपतींनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली राजदूतांना मान्यता
इतिहासात पहिल्यांदाच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध देशांच्या राजदूतांना मान्यता दिली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवर पार पडली.
कोव्हिड-19 च्या संकटाला मात देण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो, असं राष्ट्रपती कोविंद म्हणाले.
यावेळी ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, उत्तर कोरिया, सेनेगल, त्रिनिदाद अँड टोबॅगो, रवांडा इ. देशांच्या भारतातील नव्या राजदूतांना मान्यता देण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
राज्यात कापूस, ज्वारी, मका खरेदी सुरू
राज्यात 410 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत 344 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस 15 ते 20 जून पर्यंत खरेदी केला जाईल.
163 कापूस खरेदी केंद्र सध्या कार्यरत आहेत. दररोज 2 लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात 98 हजार 933 शेतकऱ्यांकडून 9 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे.
राज्यात ज्वारी, मका, खरेदीसाठी 75 केंद्र सुरू आहेत. त्यात 29 जिल्ह्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीसाठी 293 खरेदी केंद्र असून आतापर्यंत 1 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या चाचणीला सुरूवात
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड आणि ब्रायटनमध्ये मलेरियावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची चाचणी घेतली जात आहे. कोव्हिड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन खरंच गुणकारक आहे का, हे समजून घेतलं जाईल.
बाजारात क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या नावानं विकलं जाणारं हे औषध युरोप, आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील 40 हजारहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलं जाईल.
या चाचणीमध्ये केवळ कोव्हिड-19 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिलं जाईल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपण कोव्हिड-19 पासून बचाव करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर ब्रिटनमध्ये या चाचणीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला गेला.
या संशोधनाचे प्रमुख प्रोफेसर निकोलस व्हाइट यांनी सांगितलं, की हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गुणकारकतेबद्दल अजूनही आपल्याला पुरेशी माहिती नाहीये.
फोटो स्रोत, Getty Images
IRCTC : 1 जूनला सुटणाऱ्या ट्रेन्सचं बुकिंग सुरू, काय आहेत प्रवासाचे नियम?
ऑलिंपिक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता
जगभरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा रद्द होऊ शकतात, असं आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (IOC) चे प्रमुख थॉमस बाख यांनी स्पष्ट केलंय.
मार्च महिन्यात IOC आणि जपान सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर टोकियो ऑलिंपिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धा आधी जुलै महिन्यात होणार होत्या, मात्र त्या पुढील वर्षी आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला.
मात्र कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवता आलं नाही तर 2021 मध्येही ऑलिंपिकचं आयोजन करणं कठीण होईल, असं जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी म्हटलं आहे. थॉमस बाख यांनीही हे मान्य केलं आहे.
जपानमध्ये आतापर्यंत 17 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 797 जणांचा मृत्यू झालाय.
फोटो स्रोत, Reuters
डोनाल्ड ट्रंप यांचा विश्वास हायड्रोक्सीक्लोरोक्वीनवर
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर तिथल्या आरोग्यविषयक तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी टीका केली आहे. स्वत:ला कोरोनापासून वाचवण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेत असल्याचं ट्रंप यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.
पण, हे औषध कोव्हिड-19पासून बचाव करतं असा कुठलाही पुरावा नसल्याचं अमेरिकेतल्या औषध नियमन मंडळाने जाहीर केलंय. शिवाय या औषधामुळे ह्रदयविकाराचा धोका असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
मात्र ट्रंप यांनी औषधाचं कौतुक करणं सुरूच ठेवलंय. त्यावरूनच अमेरिकेत सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप अजूनही करतायत हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची भलामण, अमेरिकेतील डॉक्टर मात्र नाराज
ब्रेकिंग, देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात एअरपोर्ट अॉथॉरिटीकडून नवीन नियमावली
देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन नियम प्रसिद्ध केल्याची बातमी PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या प्रवाशांना वगळता सर्वांसाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने बुधवारी 25 मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
विमानतळावर दाखल होण्यापूर्वी सर्व प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जाईल.
सर्व प्रवाशांना आधी स्क्रीनिंग झोनमध्ये यावं लागेल आणि तपासणीनंतरच विमानतळावर प्रवेश मिळेल, असं एअरपोर्ट ऑथॉरिटीनं म्हटलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
अम्फान वादळाचे भारत - बांगलादेशात 16 बळी
फोटो स्रोत, REUTERS/RUPAK DE CHOWDHUR
अतिशय शक्तीशाली
अम्फान वादळामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आणि बांगलादेशात किमान 16 जणांचा बळी गेलाय.
बंगालच्या खाडीत
उसळलेल्या या वादळामुळे पश्चिम बंगला, ओडिशा आणि शेजारच्या बांगलादेशात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय.यामुळे अनेक
वृक्ष उन्मळून पडले आहेत, घरांची वाताहत झालीय आणि लाखो लोकांना याचा
फटका बसलाय.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लोकांना घरांतून बाहेर काढून सुरक्षित
ठिकाणी नेणं एक आव्हान होऊन बसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
अम्फानमुळे
पश्चिम बंगालमध्ये ताशी सुमारे 165
किलोमीटर वेगाने
वारे वाहात असून पाच मीटरपर्यंतच्या लाटा उसळत असल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेने
म्हटलंय.
पश्चिम बंगालमधल्या
दोन जिल्ह्यांना वादळाचा सर्वात जास्त फटका बसला असून इथल्या अनेक भागांशी संपर्क
तुटल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सांगितल्याचं रॉयटर्सने
म्हटलंय. याभागात आतापर्यंत 10
जणांना मृत्यू
झालाय.
ममता बॅनर्जी
म्हणाल्या, "आतापर्यंत 5 लाख लोकांना
सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आलेलं आहे. वादळामुळे अनेक भागांमध्ये मोठं नुकसान
झालंय. माझ्यामते वादळामुळे होणारं नुकसान हे कोरोनामुळे होत असलेल्या नुकसानाच्या
अनेक पटींनी जास्त असेल."
ब्रेकिंग, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 5,609 नवीन रुग्ण
फोटो स्रोत, MOHFW
भारतात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 5,609 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 1,12,359 झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 45,299 रुग्ण उपचारानंतर ठीक झाले आहेत, तर कोरोनामुळे 3435 जणांचा मृत्यू झालाय.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 39,297 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 1390 जणांचा मृत्यू झालाय.
तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 13,191 रुग्ण आहेत, तर गुजरातमध्ये 12,537. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11,088 आहे.
'कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आणि मला वाटलं आता सगळं संपलं'
हर्ड इम्युनिटी हाच कोरोनावरचा उपाय?
कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याचा एक मार्ग म्हणजे - हर्ड इम्युनिटी. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? कोरोनासाठीची ही हर्ड इम्युनिटी कधी तयार होणार, कशी तयार होणार आणि यामार्गातले धोके काय आहेत?
या सगळ्यामध्ये लसीचं महत्त्वं काय आहे? आजवर कोणते रोग या हर्ड इम्युनिटीमुळे आटोक्यात आले?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
या वेळची G7 देशांची परिषद ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न होता वॉशिंग्टनमध्ये व्हावी, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनना वाटतंय.
यावेळची परिषद
वॉशिंग्टनमध्ये घेण्यात यावी आणि यामध्ये सात देशांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष
सहभागी व्हावं असं ट्रंप यांना वाटतंय.
याविषयीचं ट्वीट
करत ट्रंप यांनी म्हटलंय, "G7 परिषद वॉशिंग्टनमध्ये पुन्हा नियोजित करण्यात
यावी, त्याच किंवा इतर तारखांना ही परिषद प्रसिद्ध
कँप डेव्हिडमध्ये व्हावी असं मला वाटतं. इतर देशही आता कमबॅकच्या प्रयत्नांत आहेत.
परिस्थिती सामान्य करण्याच्यादृष्टीने हे
महत्त्वाचं असेल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
सतत राज्यपालांना त्रास देऊ नका, यापुढे आम्हाला सल्ले द्या - जयंत पाटील
कोरोना पॉडकास्ट
दररोज
रात्री आठच्या सुमारास आशिष आणि विनायक तुमच्यासाठी कोरोनासंदर्भातले दिवसभराचे
अपडेट्स घेऊन येतात, त्यांचं
विश्लेषण करतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरंही देतात.
देशभरात आता लवकरच सुरु होणार रेल्वे आणि विमान सेवा, स्थलांतरित मजुरांसाठीच्या बसवरुन प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर केली टीका, उद्धव ठाकरे सरकारचा विरोध करत भाजप करणार महाराष्ट्र बचाव आंदोलन, ५ जूनला जाहीर होणार UPSC परिक्षांच्या तारखा याबद्दलचे अपडेट्स पाहा #CoronaPodcast62 मध्ये.