कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. राज्यात एका दिवसात 67 मृत्यू झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. ही चिमुकली पुणे ते नांदेड चालत निघालीय...

  2. निर्मला सीतारमण यांची 4 वाजता पत्रकार परिषद

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजविषयी त्या अधिकची माहिती देतील.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. उत्तर प्रदेशात लॉकडाऊनमध्ये अझानला परवानगी पण लाऊडस्पीकरला मनाई

  4. ब्रेकिंग, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3970 नवीन रुग्ण, 103 जणांचा मृत्यू

    भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,970 रुग्ण आढळले असून 103 जणांचा मृत्यू झाला आहे.

    देशात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या 85,940 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकूण 2,752 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

    केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केलीय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. महाराष्ट्रात लॉकडाऊन 4 कसा असेल?

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ठ्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुंबईतील आरोग्य सेवेच्या तयारीची एकत्रित पाहणी केली.

    यानंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी 18 तारखेनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन 4 कसा असेल, कुठल्या भागात सुट असेल कंटेंनमेंट झोनमध्ये किती बंधन असतील याविषयीची सविस्तर माहिती दिली.

    पाहा व्हीडिओ -

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  6. आतापर्यंत 1,034 श्रमिक स्पेशल ट्रेन्स धावल्या – पीयूष गोयल

    वेगवेगळ्या राज्यांत अडकलेल्या मजूरांना त्यांचा मूळ गावी पोहोचवण्यासाठी 1,034 श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आल्या आहेत. यापैकी 106 ट्रेन्स काल धावल्या आहेत.

    उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांनी याबाबतीत वेगानं पावलं उचलली आहेत. देशभरात चालवलेल्या एकूण श्रमिक स्पेशल ट्रेन्सपैकी 80 टक्के ट्रेन्स या दोन राज्यांमधूल चालवण्यात आल्या आहेत.

    रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Piyush Goyal/Twitter

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  7. औरेयामधील अपघाताचा चौकशी अहवाल दाखल करा – योगी आदित्यनाथ यांचा आदेश

    उत्तर प्रदेशच्या औरेयामधील अपघाताच्या घटनास्थळाची कानपूरचे इन्स्पेक्टर जनरल मोहित अग्रवाल यांनी पाहणी केली. औरेयामध्ये शनिवारी सकाळी झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात 24 मजूरांचा मृत्यू झाला आहे.

    या अपघाताविषयीच्या कारणांचा अहवाल लवकरात लवकर दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं?

    कोरोना व्हायरसची साथ घेऊनच 2020 उजाडलं. गेल्या पाच महिन्यांमध्ये असा एकही दिवस नव्हता की आपण कोव्हिड-19 या रोगाविषयी बोललो नाही आहोत. पण हा रोग काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. ज्या चीन आणि कोरियाने ही साथ आटोक्यात आणल्याचं जाहीर केलं होतं, त्यांनी आता पुन्हा साथीची दुसरी लाट येत असल्याचे संकेत दिले आहेत.

    त्यातच 13 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं वक्तव्य केलं – की कदाचित हा विषाणू कधीच संपणार नाही.ही बातमी ऐकून प्रत्येकालाच जरा धडकी भरली.

    कोरोनाचं संकट कधीच संपणार नाही, तर आपण जगायचं कसं? हे लॉकडाऊन असंच राहणार का? आपलं आय़ुष्य कधीच नॉर्मल होणार नाही का?

    या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा ही #सोपीगोष्ट

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  9. अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार – डोनाल्ड ट्रंप

    "अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात आम्ही भारताबरोबर आहोत. तसंच लस शोधण्याचा आमचा प्रयत्नही सुरू आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूला हरवू," असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. 'कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर कधीच स्वीकारलं असतं'

  11. अमरिकेत 1 जूनपर्यंत मृतांचा आकडा 1 लाखांवर जाऊ शकतो

    अमेरिकेच्या नॅशनल पब्लिक हेल्थ इंस्टिट्यूट सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDS) चे निर्देशक रॉबर्ट रेडफ़ील्ड यांनी म्हटलंय की, अमेरिकेत 1 जूनपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 1 लाखांचा आकडा पार करेल.

    CDSनं अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या नुकसानीचा सविस्तर अभ्यास केला आहे.

    पुढच्या काही दिवसांत अमेरिकेत काय स्थिती असेल, याविषयी त्यांनी 12 वेगवेगळ्या मॉडेल्सचा अभ्यास केला आहे.

    त्यानंतर मृतांचा आकडा समोर आला आहे.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मार्चमध्ये म्हटलं होतं की, अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख ते 2 लाख 40 हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Alexi Rosenfeld/Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  12. उत्तर प्रदेशच्या औरेयातील अपघातात 23 मजूरांचा मृत्यू

    मजूरांना घेऊन जाणारा एक ट्रक दुसऱ्या ट्रकला धडकल्यानं झालेल्या अपघातात 23 मजूरांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये सकाळी 3.30 वाजता ही घटना घडली.

    "हे सगळे मजूर राजस्थानमधून येत होते. या मजूरांपैकी बहुतेक जण बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आहेत. या अपघातात 23 मजूरांचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जणांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत," असं औरेयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंग यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. भारतात आता कोरोनाच्या चीनपेक्षाही जास्त केसेस, जगात 11व्या स्थानावर

    जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, जगभरात कोरोनाचे 45 लाख 34 हजार 952 रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे 3 लाख 7 हजार 159 जणांचा मृत्यू झालाय.

    कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत, तर त्याखालोखाल रशियाचा क्रमांक लागतो.

    विद्यापीठाच्या आडकेवारीनुसार, भारतात आता चीनपेक्षाही जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात सध्या कोरोनाचे 85 हजार 784 रुग्ण आहेत, तर चीनमध्ये 84 हजार 31 रुग्ण आढळले आहेत.

    कोरोना रुग्णांच्या क्रमवारीत भारत आता 11 व्या स्थानावर पोहोचला आहे.

    जगभरातील आकडेवारी

    फोटो स्रोत, https://coronavirus.jhu.edu/map.html

    फोटो कॅप्शन, जगभरातील आकडेवारी
  14. जगभरात काय परिस्थिती?

    जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, जगभरात कोरोनाचे 45 लाख 34 हजार 952 रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे 3 लाख 7 हजार 159 जणांचा मृत्यू झालाय.

    • अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक 14 लाख 41 हजार 172 रुग्ण आढळले असून 87 हजार 427 जणांचा मृत्यू झालाय.
    • कोरोनाच्या रुग्णांच्या क्रमवारीत रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशियात कोरोनाचे 2 लाख 62 हजार 843 रुग्ण आढळले असून 2 हजार 418 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे.
    • ब्रिटनमध्ये कोरोनाचे दोन लाख 38 हजार रुग्ण आहेत, तर 34 हजार रुग्णांचा मृत्यू झालाय.
    • भारताच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनसार, देशात कोरोनाचे 82 हजार रुग्ण असून 2 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झालाय.
    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  15. वानखेडे स्टेडियममध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा विचार

    मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडियम मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्याचा विचार करत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. काल दिवसभरात काय घडलं?

    नमस्कार मंडळी,

    कोरोना व्हायरसविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजचेही अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.

    पण, त्यापूर्वी एकदा काल घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूया.

    .राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजार 100 वर, आतापर्यंत 1068 मृत्यू

    ·18 तारखेनंतर ऑरेंज झोनमध्ये कंटेनमेंट वगळून दुकानं खुली करता येतील - राजेश टोपे

    ·1 लाख कोटी शेतीच्या मुलभूत सुविधांच्या विकासासाठी- निर्मला सीतारमण

    ·आत्मनिर्भर शेतकरी पॅकेज निराशाजनक - शरद पवार

    ·रॅपिड अॅक्शन फोर्सची 1 कंपनी पुण्यात दाखल

    ·वर्ल्ड बँकेकडून भारतासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विशेष पॅकेज

    कोरोना व्हायरसच्या काल घडलेल्या इतर सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही या बातमीवर नक्की क्लिक करा.