'स्थलांतरित मजुरांना भाडेतत्वावर घरे देणार'
स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यांसाठी मोफत धान्य देण्याची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली.
लाईव्ह कव्हरेज
कोल्हापुरातले परप्रांतीय मजूर घरी जाण्यासाठी आक्रमक
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
धारावीमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 1036
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या 1036 झाली आहे. धारावीत 44 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय.
धारावीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने 'मिशन धारावी' सुरू केलंय. यामध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या माटुंगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, धारावी क्रॉस रोड आणि कुंची कोर्वे नगर या परिसरात जास्त लक्ष देऊन काम केलं जात आहे.
धारावीतील सर्वात जास्त कोव्हिड-१९ चे रुग्ण कोणत्या भागात?
- माटुंगा लेबर कॅम्प- 108
- कुंभार वाडा- 68
- मुकुंद नगर- 61
- धारावी क्रॉसरोड- 57
- 90 फीट रोड- 46,
- राजीव गांधी नगर- 39
- कोंची कोर्वे नगर-38
- ट्रान्झिट कॅम्प- 37
- सोशल नगर- 31
- 60 फीट रोड- 35
- धोबी घाट- 25
- शास्त्रीनगर- 23
- मुस्लिम नगर- 22

फोटो स्रोत, Getty Images
PF, EPFच्या बदललेल्या नियमांमुळे तुमच्या हातात जास्त पगार येणार का?
लॉकडाऊनमध्ये शेकडो किलोमीटर पायी निघालेल्या मजुरांच्या व्यथा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची हाक देत २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्याचवेळी देशभरात विविध ठिकाणी पायी निघालेल्या मजुरांपुढे घरी पोहोचण्याचा प्रश्न होता.
अंबाल्याहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या जत्थ्यासोबत बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांनी संवाद साधला. पाहा व्हीडिओ.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
आता वुहानमध्ये होणार प्रत्येकाची कोरोना चाचणी
लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर पाकिस्तानातील सिंधमध्ये बाजार पुन्हा सील
लॉकडाऊनचे निर्बंध काही दिवस शिथील केल्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील काही बाजारपेठा पुन्हा सील करण्यात आल्या आहेत.
बाजारात येणाऱ्या लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे.
द डॉन या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बुधवारी 24 तासात पाकिस्तानमध्ये कोरोना संसर्ग झालेले 2,300 नवीन रुग्ण आढळून आले. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 35 हजारांहून अधिक झाला आहे.
जर याच वेगानं पाकिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर देशाची आरोग्य व्यवस्था हे संकट हाताळू शकणार नाही, असा इशारा इथले डॉक्टर्स देत आहेत. मात्र तरीही सोमवारी (11 मे) पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी बाजार उघडण्यात आले आणि त्यानंतर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

फोटो स्रोत, Reuters
राज्यात 1001 पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात 1001 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 8 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांवर हल्ल्याच्या 218 घटना घडल्या आहेत. याप्रकरणी 770 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊन शिथील केल्यानंतरही 'या' देशाचे लोक पाळतात सोशल डिस्टन्सिंग
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे एकही मृत्यू होण्यापूर्वीच 'या' देशात अनेक निर्बंध लादले गेले आणि आता ते शिथीलही केले जात आहेत. पण एकेक गोष्टी शिथील केल्या, तरीही इथले लोक सोशल डिस्टन्सिंग कसोशीनं पाळतायत.
कोणता आहे हा देश? पाहा हा व्हीडिओ.
दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 मजुरांचा मृत्यू

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये परतणाऱ्या 8 मजुरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यात झाला आहे. अपघातात 50 हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे सर्व मजूर महाराष्ट्रातून एका ट्रकमध्ये बसून उत्तर प्रदेशला जात होते. बुधवारी (13 मे) रात्री उशीरा या ट्रकची आणि बसची धडक झाली.
दुसरीकडे दिल्ली-सहारनपूर महामार्गावरही एक अपघात झाला, ज्यामध्ये पायी चाललेल्या मजुरांना एका बसनं चिरडलं. मुझफ्फरनगर जिल्ह्यात हा अपघात झाला. यामध्ये सहा मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच मजूर अतिशय गंभीररित्या जखमी झाले आहेत.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
देशात 30 जून पर्यंत रेल्वे बुकिंग रद्द, फक्त विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार
देशात 30 जून पर्यंतचे सर्व रेल्वे बुकिंग रद्द करण्यात आले असून, आता फक्त विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार आहेत.
30 जूनपर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट बुक केले असतील, तर तुमचे पैसे परत केले जाणार.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना व्हायरस कधीच न संपण्याची शक्यता, WHOने व्यक्त केली भीती
कोरोना व्हायरसमुळे जगभरात 2 लाख 97 हजार जणांचा मृत्यू
जगभरात कोरोना व्हायरसमुळे 2 लाख 97 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
हा आकडा जास्त असू शकतो, असंही जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं म्हटलं आहे. कारण अनेक ठिकाणी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद होत नाहीये.
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले जगातले दहा देश-
- अमेरिका : संसर्ग झालेल्यांची संख्या- 1,390,406 (मृतांची संख्या- 84,119)
- रशिया: संसर्ग झालेल्यांची संख्या- 242,271(मृतांची संख्या- 2,212)
- ब्रिटन : संसर्ग झालेल्यांची संख्या- 230,986 (मृतांची संख्या- 33,264)
- स्पेन : संसर्ग झालेल्यांची संख्या- 228,691 (मृतांची संख्या- 27,104)
- इटली : संसर्ग झालेल्यांची संख्या- 222,104 (मृतांची संख्या- 31,106)
- ब्राझील : संसर्ग झालेल्यांची संख्या- 190,137 (मृतांची संख्या- 13,240)
- फ्रान्स : संसर्ग झालेल्यांची संख्या- 178,184 (मृतांची संख्या- 27,077)
- जर्मनी : संसर्ग झालेल्यांची संख्या- 174,098 (मृतांची संख्या- 7,861)
- तुर्की : संसर्ग झालेल्यांची संख्या- 143,114 (मृतांची संख्या- 3,952)
- इराण : संसर्ग झालेल्यांची संख्या- 112,725 (मृतांची संख्या- 6,783)

फोटो स्रोत, Getty Images
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3722 नवीन रुग्ण, 134 जणांचा मृत्यू
देशभरातला कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3722 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 134 जणांचा मृत्यू झालाय.
देशात आता कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 78,003 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2549 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा नितीन गडकरींचा दावा
कामगार कायद्यातील बदल मजुरांच्या हिताचे?
कोरोनाच्या व्हायरसमुळे एकीकडे स्थलांतरितांच्या पोटापाण्याच्या प्रश्न उभा राहिलाय तर दुसरीकडे उद्योगधंदे पुन्हा सुरु करून त्यांना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसारख्या काही राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
पण कामगार कायद्यात बदल केल्यानं नेमकं काय साध्य होणार आहे? केलेले हे बदल खरंच सुधारणा किंवा reforms आहेत, की मालकांसाठी मजुरांच्या छळवणुकीचा मार्ग खुला झालाय? सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.
व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लॉकडाऊन : कामगार कायदे बदलून मजुरांचं भलं होणार की उद्योगांना चालना मिळणार? ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 33 हजारांहून अधिक

फोटो स्रोत, Getty Images
युरोपमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढतानाच दिसत आहे.
- फ्रान्समध्ये बुधवारी कोरोनामुळे 83 रुग्णांचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 27,074 झाली आहे.
- फ्रान्सच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात 2, 428 रुग्ण हे ICU मध्ये आहेत.
- फ्रान्सव्यतिरिक्त स्पेन, ब्रिटन आणि इटलीमध्ये कोरोनामुळे 27 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
- बुधवारी स्पेनमध्ये 184 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 27,104 लोकांनी प्राण गमावले आहेत.
- बुधवारी इटलीमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये आतापर्यंत 31 हजार 106 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा 33 हजारांच्या पलिकडे पोहोचला आहे. बुधवारी ब्रिटनमध्ये 494 रुग्णांचा मृत्यू झाला.
'स्थलांतरित मजुरांना भाडेतत्वावर घरे देणार'
स्थलांतरित मजुरांसाठी पीएम केअर्स फंडमधून 1 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
स्थलांतरित मजुरांचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत असतानाच पीएम केअर्स फंडमधून या मजुरांसाठी 1 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
देशातील व्हेंटिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन 50 हजार व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यासाठी 2 हजार कोटी रुपये देण्यात येतील. कोरोनावर लस शोधण्यासाठी काम करत असलेल्या टीमसाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणाही करण्यात आलीये.
मजुरांसाठी जे 1 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत, त्याच्या वितरणासंबंधीच्या सूचना PIB ने प्रसिद्ध केल्या आहेत.
- राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पीएम केअर्स फंडमधून 1 हजार कोटी रुपये दिले जातील.
- यातून जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना खर्च करण्यासाठी रक्कम दिली जाईल.
- स्थलांतरित मजुरांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्यविषयक सुविधांची सोय करण्यासाठी या फंडचा वापर करण्यात येईल.
- या निधीचं वितरण राज्याची लोकसंख्या आणि कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या याच्या आधारे करण्यात येईल.
कोरोनासंबंधी महत्त्वाचे अपडेट्स
गुड मॉर्निंग.. बीबीसी मराठीचं लाइव्ह पेज आपण सुरू करतोय. इथं कोरोनासंबंधीचे दिवसभरातले सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला पहायला मिळतील.
आज जे काही घडेल त्याची माहिती तर आम्ही तुम्हाला देऊच, पण त्यापूर्वी कालच्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूया.
1.आत्मनिर्भर भारत: लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांच्या कर्ज योजनेची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
2.श्रमिक रेल्वे तिकिटाच्या शुल्कासाठी 54 कोटी 75 लाख रुपये देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
3. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठवण्याची मागणी महाराष्ट्रानं केंद्राकडे केली आहे.
4. बुधवारी राज्यात कोरोनाचे 1495 नवीन रुग्ण आढळले असून 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची एकूण संख्या 25922 वर.
5. गावांतील ग्रामसभांना तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
6. कोरोना व्हायरसची लस लोकांपर्यंत पोहोचण्यास लागू शकतात अडीच वर्षं- WHO ची माहिती

फोटो स्रोत, Getty Images