'स्थलांतरित मजुरांना भाडेतत्वावर घरे देणार'
स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यांसाठी मोफत धान्य देण्याची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली.
लाईव्ह कव्हरेज
कोरोनाविरोधात लढा देत भारत खरंच आत्मनिर्भर होऊ शकेल का?
... आणि 'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरे 'आमदार' झाले
आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा
नमस्कार मंडळी,
आजचं लाईव्ह कव्हरेज थांबवत आहोत. जाता जाता एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर ...
- सर्व स्थलांतरित मजुरांना दोन महिने मोफत धान्य - निर्मला सीतारामन
- राज्यातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने पार केला एक हजाराचा टप्पा, एकूण रुग्णसंख्या 27 हजार 524 वर
- प्रवाशांना विमानात हॅन्ड सॅनिटायझर नेण्याची परवानगी
- महिनाभर ग्रीन झोनमध्ये राहिल्यानंतर गोव्यात आढळले 8 रुग्ण
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नियमांचं पालन करावं - राज्यपालांचं पत्र
- देशात 30 जून पर्यंत रेल्वे बुकिंग रद्द, फक्त विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार
कोरोना व्हायरसच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर
शुभरात्री.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाच्या संकटातच पूर्व अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, किमान 5 जण ठार
पिंपरी चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी
नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती, यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आदेशित केले आहे. राज्यातील कोवीड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. पुणे महानगर प्रदेश मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महिनाभर ग्रीन झोनमध्ये राहिल्यानंतर गोव्यात आढळले 8 रुग्ण
महिनाभरानंतर आता गोव्यात पुन्हा 8 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
सदर रुग्ण राज्याबाहेरून आलेले आहेत. त्यांच्याकडून सामूहिक संसर्ग झालेला नाही, असं सावंत यांनी सांगितलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सोने जमा करणे ही जुनीच योजना - पृथ्वीराज चव्हाण
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात 1 ते 2 टक्के व्याज देखील द्यावे अशी सूचना मी काल केली होती. ही योजना जुनीच असून काही समाज विघातक व्यक्तींनीमाझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
मी केलेली सूचना ही चालू सरकारी योजनेचाच भाग आहे. अशा प्रकारची योजना पहिल्यांदा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबर 1999 साली Gold Deposit Scheme या नावाने सुरू केली होती, असं चव्हाण यांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, facebook
प्रवाशांना विमानात हॅन्ड सॅनिटायझर नेण्याची परवानगी
प्रवाशांना विमानात हॅन्ड सॅनिटायझर नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आतापासून 350 ML पर्यंत हॅन्ड सॅनिटायझर विमान प्रवासात नेता येऊ शकले.
यापूर्वी कोणत्याही प्रकारचं लिक्विड नेण्यास परवानगी नव्हती. पण या नियमात बदल करण्यात आल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाने दिली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना पॉडकास्ट : कोरोना व्हायरससंदर्भात आज काय काय घडलं?
#CoronaPodcast : जागतिक आरोग्य संघटनेनं का वर्तवली कोरोना व्हायरस कधीच न संपण्याची शक्यता? निर्मला सीतारमण यांनी स्थलांतरित मजूर, गरीब, शेतकऱ्यांसाठी काय केल्या घोषणा? भारतात येत्या सहा महिन्यात 3 लाख बालकं दगावण्याची भीती युनिसेफनं का व्यक्त केली? सांगतायत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड.
राज्यातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने पार केला एक हजाराचा टप्पा, एकूण रुग्णसंख्या 27 हजार 524 वर
राज्यात कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने आज 1 हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत राज्यात 27 हजार 524 रुग्णांना कोव्हिड-19 ची बाधा झाली असून त्यापैकी 1019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गुरुवारी राज्यात 1602 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. तर 44 मृत्यूंची नोंद झाली. तसंच 512 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
आतापर्यंत राज्यात 6059 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या 20 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असं प्रशासनानं कळवलं आहे.
राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्तांना आकडा आता 16 हजार 738 वर पोहोचला आहे. इथं आतापर्यंत 621 मृत्य़ू झाले आहेत. पाठोपाठ पुण्यात 2977 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 166 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनापासून कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी या 5 टिप्स तुम्ही वाचल्यात का?
बँकेच्या धनादेशांची मुदत तीनवरून सहा महिने करण्याची मागणी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या धनादेशांची मुदत तीन महिन्यांवरून वाढवून सहा महिने करावी, अशा मागणी करण्यात आली आहे.
याबाबत दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला कोर्टाने मुदत वाढवण्याची सूचना करावी, असं याचिकेत म्हटलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
वुहान शहरात 1 कोटी 10 लाख नागरिकांचे कोरोना व्हायरस टेस्टिंग केले जाणार
कोरोना लॉकडाऊन: स्पेनमध्ये काय-काय सुरू झालं?
आफ्रिकन स्वाईन फ्लूसंदर्भात केंद्राकडे 144 कोटींच्या मदतीची मागणी
कोरोना व्हायरसप्रमाणेच आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचा कहर सुरू आहे.
आसाममधला आफ्रिकन स्वाईन फ्लूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालण्यासाठी केंद्राकडे 144 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केल्याची माहिती मंत्री अतुल बोरा यांनी दिली आहे.
आसाममध्ये आतापर्यंत 14 हजार 919 डुकरांचा मृत्यू झाल्याचं बोरा यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
WHO- कोरोना व्हायरस कधीही न संपण्याची शक्यता

लॉकडाऊनच्या काळात 379 गुन्हे दाखल 207 जणांना अटक
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात 379 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
टिकटॉक ,फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या 379 गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी 16 गुन्हे अदखलपात्र आहेत.

फोटो स्रोत, dgipr
वुहान शहरात 1 कोटी 10 लाख नागरिकांचे कोरोना व्हायरस टेस्टिंग केले जाणार
सीआरपीएफच्या 254 जवानांना कोरोनाची लागण
दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या तीन जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे सीआरपीएफच्या कोरोनाग्रस्त जवानांची संख्या 254 वर पोहोचली आहे. लागण झालेल्या जवानांपैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या 248 जणांवर उपचार सुरू आहेत.