You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

आत्मनिर्भर भारत: 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर

काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. ट्विटर देणार वादग्रस्त माहितीबाबतचा इशारा

    ट्वीट करण्यात आलेली कोरोना व्हायरसशी संबंधित माहिती वादग्रस्त किंवा दिशाभूल करणारी असल्यास ट्विटर या माहितीबाबत वापरक्रर्त्यांना सूचना देणार आहे. ही माहिती यापुढे हायलाईट केली जाईल, असं ट्वीटरने म्हटलं आहे.

    अशा प्रकारची माहिती असलेल्या ट्वीटसमोर इशारा दिला जाईल. तसंच यासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल, असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

    पण याचा अर्थ ट्वीटर थेट फॅक्ट-चेक आणि दिलेली माहिती चुकीची असल्याचं सांगणार नाही. याचा निर्णय वापरकर्त्यांने घ्यायचा आहे.

    कोरोना व्हायरसबाबत पसरत असलेल्या अफवा आणि चुकीची माहिती, औषधांचा दावा या माहितीमुळे सोशल मीडिया कंपन्या त्रस्त आहेत. यांवर आळा घालण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

  2. गुजरात उच्च न्यायालयाकडून मजुरांच्या स्थितीचा आढावा

    गुजरात उच्च न्यायालयाने स्थलांतरित कामगारांच्या अडचणी आणि लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या परिस्थितीवरच्या अहवालाचा आढावा घेतला आहे.

    राज्यात कोणताही व्यक्ती रिकाम्या पोटी राहणार नाही, याची काळजी घेणं प्रशासनाचं कर्तव्य आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

    गुजरातच्या सुरतमध्ये वारंवार मजूर रस्त्यावर येऊन आंदोलन करत असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या 40 दिवसांपासून उद्योग-धंदे बंद आहेत. आपल्याकडे पोट भरण्यासाठीही पैसै नाहीत, अशी मजुरांची तक्रार आहे.

  3. पाकिस्तानातील लॉकडाऊन शिथील होताच बाजारांमध्ये तोबा गर्दी, वाहतूक कोंडी

    पाकिस्तानातील लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर लगेच बाजारांमध्ये तोबा गर्दी दिसून आली. तसंच इथल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं.

    पाकिस्तानातील बहुतांश बाजार एका महिन्यानंतर उघडले आहेत. इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप बंद आहे.पण सगळे कारखाने आणि कार्यालय उघडण्यात आले आहेत, अशी बातमी डॉन वृत्तपत्राने दिली आहे.

    जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 32 हजारपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर इथं 706 रुग्णांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला आहे.

  4. महाराष्ट्र सरकारकडून घरपोच दारू विक्रीला परवानगी

    महाराष्ट्र सरकारने दारूची घरपोच विक्री करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत राज्याच्या गृहमंत्रालयाने आदेश काढला आहे. पण यासाठी काही अटी-शर्थीही महाराष्ट्र सरकारने घातलेल्या आहेत.

    यासाठी खालील अटी घालण्यात आल्या आहेत.

    1.आधीपासून विक्रीची परवानगी असलेलीच दारू विकता येणार.

    2.ठरलेल्या दिवशी आणि वेळेत दुकानदार दारूची विक्री करतील.

    3.दारू पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीलाच निवासी पत्त्यावर दारू पोहोचवली जाईल.

    4.दारू पोहोचवणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरावा, हातांचं निर्जंतुकीकरण करावं.

    5.लॉकडाऊन संपेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

  5. कोव्हिड -19 आजारातून बरं व्हायला किती वेळ लागतो?

  6. खरच उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?

  7. महाराष्ट्रातील 35 हजारपैकी 17 हजार कैद्यांना जेलमधून सोडण्याचा निर्णय

    कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील 35 हजारपैकी 17 हजार कैद्यांना जेलमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

    आर्थर रोड जेलमध्ये सुमारे 185 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा पद्धतीची लागण महाराष्ट्रातील इतर जेलमध्ये होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

    हा निर्णय घेत असताना बलात्कार, मोक्का आणि इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या कैद्यांना सोडलं जाणार नाही. यापूर्वी अंडर-ट्रायल असलेल्या 5 हजार कैद्यांना सोडण्यात आलं होतं. त्यानंतर 7 वर्षांपर्यंतची शिक्षा झालेल्या 3 हजार कैद्यांना आणि 7 वर्षांपुढील शिक्षा झालेल्या 9 हजार कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात सोडण्यात येणार आहे. तसंच महाराष्ट्रातील जेल आता पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येतील, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

  8. वंदे भारत मिशनचा दुसरा टप्पा 16 ते 22 मेदरम्यान

    कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशन उपक्रमाचा दुसरा टप्पा 16 मेपासून सुरू होणार आहे. हे अभियान 22 मेपर्यंत चालेल. सुमारे 31 देशात अडककेल्या भारतीयांना या कालावधीत परत आणण्यात येईल. फिडर विमानांसह एकूण 149 विमानं त्यासाठी तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.

  9. ‘कोरोना'मुक्ती लढ्यातील ‘परिचारिकां'च्या सेवेची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल – अजित पवार

    कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या ‘परिचारिका' भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका' दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

  10. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत रशिया आता दुसऱ्या क्रमांकावर

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णसंख्येच्या बाबतीत रशिया आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रशियाने स्पेनला मागे टाकलं.

    रशियामध्ये मंगळवारी 10 हजार 899 नवे कोव्हिड-19 ग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या 2 लाख 32 हजारवर पोहोचली आहे.

    मागच्या रविवारपासून रशियामध्ये दररोज 10 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत.

    सध्या अमेरिकेत 13 लाख, स्पेनमध्ये 2 लाख 27 हजार, ब्रिटनमध्ये 2 लाख २४ हजार तर इटलीमध्ये 2 लाख 19 हजार रुग्ण आहेत.

    जगभरात 42 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

  11. लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये असे होत आहेत मोठे बदल

  12. सतरा वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्चदरम्यान

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारतात होणारी सतरा वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्चदरम्यान होईल, असं ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि लोकल ऑर्गनायझिंग कमिटीने संयुक्तरित्या जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

  13. आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूने 14 हजार 465 डुकरांचा मृत्यू

    कोरोना व्हायरसच्या संकटाचा देश सामना करत असतानाच आसाममधून स्वाईन फ्लूबाबत बातमी आली आहे.

    आसामच्या 10 जिल्ह्यांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे 14 हजार 465 डुकरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशूसंवर्धन मंत्री अतुल बोरा यांनी दिली.

    या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत असून मृत्यूमुखी पडलेल्या डुकरांना जमिनीत खोलवर पुरण्याची सूचना करण्यात आली आहे, असं बोरा यांनी सांगितलं.

  14. PM CARES फंडाचा वाद काय? याचं ऑडिट होणार का? #सोपीगोष्ट 75

  15. 'महाराष्ट्रात अडकलेले परराज्यातील लोक परत घरी चाललेत पण आमचं काय?'

  16. प्रत्येक प्रवाशाची रेल्वे स्टेशनवर तपासणी

    रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी रेल्वे स्टेशनवर तपासणी करण्यात येणार आहे, रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी सांगितलं.

    रेल्वे स्टेशनवर कुलींना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी हलक्या सामानासोबतच प्रवास करावा. आम्ही प्रवाशांची संपूर्ण माहिती संबंधित राज्य सरकारकडे सोपवणार आहोत, असंही अरूण कुमार म्हणाले.

  17. विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजप समोर नमतं घेतलं का ?

  18. पंतप्रधान मोदी रात्री 8वाजता जनतेला संबोधित करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. 17 मे नंतर लॉकडाऊचं काय होणार याविषयी पंतप्रधान बोलण्याची शक्यता आहे.

    सोमवारी पंतप्रधानांनी मॅरेथॉन बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचं आवाहन केलं होतं.

  19. रशियात कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये आग; 5 जणांचा मृत्यू

    रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील कोरोना रुग्णांसाठीच्या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

    स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दीडशे लोकांना हॉस्पिटलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. रशियातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांनुसार, व्हेंटिलेटरमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.

  20. प्रायोगिक ट्रेन्सना जोरदार प्रतिसाद; 16 कोटींची तिकीटं गेली विकली

    मंगळवारपासून भारतीय रेल्वेने राजधानी दिल्लीतून देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला.

    पुढच्या सात दिवसांकरता 16.15 कोटी रुपयांची तब्बल 45,533 तिकिटांची विक्री झाल्याचं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं.

    82,317 प्रवाशांनी ही तिकीटं आरक्षित केली आहेत.