You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

कोरोना व्हायरस: महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 23,401

भारतातील कोरोनाच्या केसेस 67,000 च्यावर गेल्या आहेत. देशातला रिकव्हरी रेट 31.15% गेला असल्याची माहिती आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

लाईव्ह कव्हरेज

  1. रस्ते आणि विमान वाहतूकही सुरू व्हायला हवी- पी. चिदंबरम

  2. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जगभरातले प्राण्यांचे बाजार बंद करायला हवेत का?

  3. आज दुपारी चार वाजल्यापासून बुकिंग

    विशेष रेल्वेगाड्यांसाठी आज 4 वाजल्यापासून बुकिंग सुरू होणार आहे. हे बुकिंग फक्त IRCTC च्या संकेतस्थळावरुन करता येणार आहे.

  4. लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या मार्केटिंगमध्ये असे होत आहेत मोठे बदल

  5. कोरोना व्हायरसनंतर जगभरात हुकूमशाही अस्तित्वात येईल का?

    गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणुच्या संकटात सापडलेलं जग पुढच्या सहा महिन्यांनंतर, वर्षभरानंतर, दहा वर्षांनंतर आजच्या तुलनेत कसं असेल? माझ्या प्रियजनांसाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? माझ्या कुटुंबीयांचं, मित्रमंडळींचं काय होणार? या विचारांनी मला रात्र-रात्र झोप येत नाही.

    माझ्या मनात विचार येतो, माझ्या नोकरीचं काय होणार? खरंतर मी त्या काही मोजक्या नशीबवान लोकांपैकी एक आहे ज्यांना उत्तम पगार आहे, जे ऑफिसच्या बाहेर राहूनही काम करू शकतात. मी इथे यूकेमध्ये बसून लिहितोय. इथे माझ्या अनेक सेल्फ-एम्प्लॉईड मित्रांना पुढचे अनेक महिने पैसे मिळणार नाही, याची चिंता सतावते आहे. माझ्या अनेक मित्रांची नोकरी गेली आहे.

    ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  6. ब्रेकिंग, देशातील एकूण रुग्णांची संख्या 67,152 वर

    देशातील एकूण रुग्णांची संख्या 67,152 वर गेली आहे. तसेच कोव्हिडमुळे आतापर्यंत 2206 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  7. कोरोनावरची लस शोधण्यात भारताचं योगदान किती? देशात कुठे-कुठे सुरू आहे संशोधन?

  8. R0 म्हणजे काय? कोरोना लॉकडाऊन उठवण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा का?

    कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी एक आकडा अतिशय महत्त्वाचा आहे.

    जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.

    हा आकडा आहे - बेसिक रिप्रॉडक्शन नंबर. म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा. याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट (0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- R0 म्हणजे काय?

  9. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी संशोधन करणाऱ्यांना सलाम

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले आहेत. सर्व जगाचं आरोग्य आरोग्यदायी व्हावं यासाठी तंत्रज्ञानाची मदत होईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

  10. #CoronaPodcast : राज्यात वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या नागरिकांना ST चा प्रवास मोफत आहे की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम. उत्तर प्रदेश, गुजरातसारख्या राज्यांनी रद्द केले कामगार कायदे, याचा अर्थ आणि परिणाम काय?

  11. पाक प्रशासित काश्मीरमध्ये कोरोनोबद्दलच्या अंधश्रद्धांना सामोऱ्या जाताहेत 'या' महिला

  12. 'प्लाझ्मा थेरपीचा मला उपयोग झाला'

    कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या एका रुग्णाने आपल्याला प्लाझ्मा उपचार पद्धतीचा उपयोग झाल्याचं सांगितलं आहे.

    इंदोरमधील कपिल देव भल्ला यांनी आपल्यावर तीन दिवसांमध्ये या उपचारांचा परिणाम दिसू लागला असा अनुभव सांगितला आहे. त्यांना कोव्हिडवर मात करणाऱ्या एका डॉक्टरांनी प्लाझ्मा दिला होता

  13. रोगप्रतिकारशक्ती वाढवायला व्हिटामिन्स, हस्तमैथुन, ग्रीनटी: काय करावं, काय करू नये?

    कोरोना व्हायरसमुळे होणारा कोव्हिड-19 कोणत्या औषधाने बरा होईल, याचा शोध जगभरातले संशोधक घेत आहेत.

    ज्या लोकांची प्रतिकारक्षमता चांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच कायतेआतापर्यंत लक्षात आलं आहे. याचंच भांडवल आता आपलीबाजारपेठसुद्धाकरू पाहात आहे.

    प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.

    अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात. 1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हासुद्धा अशाचप्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- अफवा आणि रोगप्रतिकारक्षमता

  14. सॅनफ्रॅन्सिस्कोमधून 225 भारतीय परतले

  15. तुर्कस्तानचे डाॅक्टर सलग 24 दिवस ड्युटीवर

  16. ब्रेकिंग, स्थलांतरित मजुरांची पोलिसांवर दगडफेक

    स्थलांतरित मजुरांनी केरळमध्ये पोलिसांवर कथित दगडफेक केल्याच्या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

  17. नमस्कार,

    गेले काही दिवस आपण Live Page च्या माध्यमातून जगभरातील अपडेटस घेत आहोत.

    1.महाराष्ट्रात कोरोनाचे 1,278 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 22 हजार 171 वर पोहोचली.

    2.पुण्यात कंटेनमेंट झोनमधील दवाखाने वगळता सर्व दुकानं 11 मे ते 17 मे पर्यंत बंद असतील.

    3.12 मे पासून पॅसेंजर ट्रेन टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला.

    यासर्व कालपर्यंत घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा