You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये 17 मेपर्यंत फक्त दवाखाने सुरू राहणार
उड्डाणपूर्व आरोग्य चाचणीमध्ये मुंबईतील 5 वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व एअर इंडियाचे वैमानिक आहेत.
लाईव्ह कव्हरेज
कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर महिला आणि बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची कविता
'वरळी पॅटर्न'वर किरीट सोमय्या आक्रमक
वरळीमध्ये वाढत असलेल्या कोव्हिड रुग्णांच्या संख्येवरुन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि पालिकेवर जबरदस्त टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आरोग्यमंत्री व पालिकेला पत्रही लिहिले आहे.
कॅबिनेट सचिव आज घेणार आढावा
कॅबिनेट सचिव राजीव गौबा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आरोग्य सचिवांबरोबर चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत त्यांची मते ते विचारणार आहेत
सीरिया, इराणमध्ये विस्थापितांच्या छावणीत कसं पाळायचं सोशल डिस्टन्सिंग?
आयसीएमआर आणि सीडीसीचे लस तयार करण्यासाठी संयुक्त प्रयत्न
उद्धव ठाकरे सरकारच्या पुढे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक आव्हानं
अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नक्की काय साध्य होईल? पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा दल आणण्याची कल्पना कुणाची? असे प्रश्न महाराष्ट्रातील परिस्थितीच्या संदर्भात अचानक निर्माण झाले आहेत.
नेमकी राज्यातील परिस्थिती जास्त अवघड बनू लागली, त्याच दरम्यान सरकारचा, मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांचा प्रशासनाशी आणि राज्यातील जनतेशी थेट संवाद कमी झालेला दिसतोय.
ब्रेकिंग, सहायक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक सुनील कलगूटकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
'या' 6 ठिकाणी होतायत कोरोना व्हायरसवरच्या लशीच्या चाचण्या
ब्रेकिंग, अमेरिकेत 24 तासांमध्ये 1568 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू
लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.
लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.
तुम्हीसुद्धा सध्या तेलकट, चमचमीत पदार्थ खात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा- लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?
लंडनमधून भारतीयांना घेऊन विमान परतले
ब्रेकिंग, ट्रक अपघातात 5 मजूर ठार
#CoronaPodcast : भारतात आणि महाराष्ट्रात आकडे का वाढतायत? भारतात पीक कधी येऊ शकतो? हा पीक कसा ठरवला जातो? एसटीनं घरी जाण्यासाठी काय काय करावं लागेल?
कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्ण ठप्प
दारू विक्री, सलून, बांधकाम - कोणत्या झोनमध्ये काय सुरू राहणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने राज्यात नेमक्या कोणत्या गोष्टी कुठे सुरू राहतील यासंदर्भात सरकारने नियम जाहीर केले आहेत.
नागरिकांना रोजच्या जगण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भाजीपाला, दूध, किराणा यांचा पुरवठा ग्रीन, ऑरेंज, रेड, कंटेनमेंट तसंच महापालिका क्षेत्रात सुरू राहील. सर्व झोनमध्ये औषधांची दुकानं, दवाखाने नागरिकांसाठी सुरू राहतील.
ग्रीन झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तिथे बऱ्याच आस्थापनांना कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या संदर्भात विस्तृत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा-
कोव्हिड-19 वर 'हे' औषध उपयोगी पडेल?
कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर या औषधानं तुम्ही बरे होऊ शकाल असा ठोस पुरावा असल्याचं मत अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
रेमडेसिवियर या औषधाची चाचणी घेतल्यानंतर या औषधामुळे कोरोनाची लक्षणं दिसण्याचा काळ 15 दिवसांच्या ऐवजी 11 दिवसांवर आल्याचं दिसून आलं आहे.
अजूनही याची सर्व माहिती प्रसिद्ध झाली नसली तरी या औषधं कमालीच उपयोगी असल्याचं दिसून आलं आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र हे काही जादूचं औषध किंवा रामबाण उपाय असल्याचं मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
याबदद्ल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- कोव्हिड-19 वर 'हे' औषध उपयोगी पडेल?
भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 3.3 टक्के
भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 3.3 टक्के असल्याचं तसेच बरे होण्याचं प्रमाण 29.9 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
नमस्कार,
गेले काही दिवस आपण Live Page च्या माध्यमातून महाराष्ट्रातील, देशातील, जगातील कोरोना विषयी अपडेट्स प्रसिद्ध करत आहोत.
काल,
1.राज्यात 1165 रुग्णांची नोंद झाली तर 48 जणांचा मृत्यू झाला. 330 रुग्ण बरे होऊन घरी परतले.राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 20,228 इतका झाला आहे.
2.मुंबईत कंटेनमेंट झोन्सची संख्या 2646 एवढी झाली आहे .मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी धारावीला भेट दिली.
3.अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत निर्णय घेऊन नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
4. राज्यात विविध शहरं तसंच गावांमध्ये अडकलेल्या माणसांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरू होईल.
5. नफेखोर करणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
6. बांगलादेशात अडकलेल्या भारतीयांना घेऊन विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं. या विमानात 129 प्रवासी होते.
काल रात्रीपर्यंत घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा- नफेखोरी करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा -अस्लम शेख यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र