You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये 17 मेपर्यंत फक्त दवाखाने सुरू राहणार

उड्डाणपूर्व आरोग्य चाचणीमध्ये मुंबईतील 5 वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व एअर इंडियाचे वैमानिक आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. धारावीत कोरोनाचे 26 नवीन रुग्ण

    मुंबईतल्या धारावीत आज कोरोनाचे 26 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

    धारावीतल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 859 वर पोहोचली आहे आणि आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली आहे.

  2. इराणमध्ये कोरोना व्हायरस कुणी पसरवला?

    ही बातमी आहे बीबीसी न्यूज अरेबिकच्या एक्सक्लुजिव्ह संशोधनात्मक पत्रकारितेची. मध्य-पूर्व आशियातल्या काही देशांमध्ये कोव्हिड-19 रोग पसरवण्यात इराणीयन एअरलाईन्सच्या एका विमानाचा हात आहे असं या संशोधनातून स्पष्ट होतं.

    पाहा बीबीसी प्रतिनिधी नवल - अल- मगाफी यांचा हा रिपोर्ट.

  3. ब्रेकिंग, सर्व राज्यांनी मजूरांना परत आणण्यासाठी परवानगी द्यावी - पीयूष गोयल

    "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार, गेल्या 6 दिवसांपासून दररोज 300 श्रमिक स्पेशल ट्रेन्स धावत आहेत. मी सर्व राज्यांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या राज्यात अडकलेल्या मजूरांना मूळ गावी परत आणण्यासाठी परवानगी द्यावी. जेणेकरून पुढच्या 3 ते 4 दिवसांत या सगळ्या मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवता येईल," असं ट्वीट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

  4. ब्रेकिंग, रशियात कोरोनाचे 2 लाखांपेक्षा अधिक रुग्ण

    रविवारी रशियात कोरोनाचे 11 हजार 12 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 9 हजार 688 वर पोहोचली आहे.

    रविवारी 88जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, आतापर्यंत रशियात कोरोनामुळे एकूण 1 हजार 915 जणांचा बळी गेला आहे.

    रशियात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे दररोज 10हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत.

    कोरोनाच्या टेस्टिंगचं प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

    कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत रशिया आता जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

  5. सिंगापूरहून 243 प्रवाशांचं दुसरं विमान मुंबईत दाखल

    सिंगापूरहून 243 प्रवाशांना घेऊन दुसरं विमान मुंबईत पोहोचलं आहे.

    भारत सरकारनं विदेशात अडकलेल्या नागरिकांना देशात परत आणण्यासाठी 'वंदे भारत' मोहीम सुरू केली आहे.

    त्याअंतर्गत या नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आलं.

  6. खरंच उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल का?

  7. गेल्या 24 तासांत 10 राज्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही – हर्षवर्धन

    गेल्या 24 तासांत 10 राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.

    यातील चार राज्यांमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.

    दिल्लीत कोव्हिड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

  8. #BoisLockerRoom प्रकरणातून मुलं आणि पालकांनी काय धडा घ्यावा?

  9. 'कामगार कायदे रद्द करणं म्हणजे मजुरांना गुलामांसाराख वागवणं'

  10. मेलबर्नमध्ये लॉकडाऊनविरोधात निदर्शनं

    ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात लॉकडाऊनविरोधात निदर्शन झालं. शहरातील संसद भवन परिसरात जवळपास 150 जणांनी धरणे आंदोलन सुरू केलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांना ताब्यात घेतलं आहे.

    लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे संबंधितांना 80 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

    मेलबर्नमधील निदर्शनापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलसहित अनेक देशांमध्ये लॉकडाऊनविरोधात निदर्शनं झाली आहे.

  11. नरेंद्र मोदींची उद्या सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी 3 वाजता सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मोंदींची ही मुख्यमंत्र्यांसोबतची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेली पाचवी बैठक असेल.

  12. मुंबईहून 7 ट्रेन्ससाठी बंगालनं परवानगी द्यावी - देवेंद्र फडणवीस

    मुंबईहून पश्चिम बंगालसाठी 7 रेल्वेगाड्यांची परवानगी रेल्वेने मागितली आहे. अद्याप ती मिळालेली नाही. ममतादीदींना माझी विनंती आहे की त्यांनी ही परवानगी त्वरित द्यावी. त्यामुळे श्रमिकांना पायी प्रवास करावा लागणार नाही, असं ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी सुद्धा ममता दिदींशी चर्चा करून परवानगी मिळवावी, ही माझी विनंती, असंही ते म्हणाले आहेत.

  13. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 40 लाखांहून अधिक

    जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 40 लाख 38 हजार 447 वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 79 हजार 468 जणांचा मृत्यू झालाय.

    अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक 12 लाख 91 हजार 100 रुग्ण आढळले असून 77 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

    जॉन हॉपकिन विद्यापीठानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

  14. मिरजेहून उत्तर प्रदेशसाठी सुटणार 'स्पेशल ट्रेन'

    सांगली जिल्ह्यातल्या मिरज जंक्शनवरून उत्तरप्रदेशसाठी एक विशेष रेल्वे गाडी सुटणार आहे.

    लॉकडाऊनमुळे या भागात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी ही रेल्वे गाडी रात्री आठ वाजता सोडली जाणार आहे.

  15. दिल्लीत दारू खरेदीसाठी गर्दी

    दिल्लीतल्या मयूर विहार परिसरातल्या दारूच्या दुकानाबाहेर लोकांची गर्दी दिसून आली. दिल्ली सरकारनं दारूवर 70 टक्के 'स्पेशल कोरोना फी' आकारली आहे. तरीही दिल्लीत दारू खरेदीसाठी गर्दी होत आहे.

  16. कोरोना व्हायरसनंतर जगभरात हुकूमशाही अस्तित्वात येईल का?

    गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणुच्या संकटात सापडलेलं जग पुढच्या सहा महिन्यांनंतर, वर्षभरानंतर, दहा वर्षांनंतर आजच्या तुलनेत कसं असेल? माझ्या प्रियजनांसाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? माझ्या कुटुंबीयांचं, मित्रमंडळींचं काय होणार? या विचारांनी मला रात्र-रात्र झोप येत नाही.

    माझ्या मनात विचार येतो, माझ्या नोकरीचं काय होणार? खरंतर मी त्या काही मोजक्या नशीबवान लोकांपैकी एक आहे ज्यांना उत्तम पगार आहे, जे ऑफिसच्या बाहेर राहूनही काम करू शकतात. मी इथे यूकेमध्ये बसून लिहितोय. इथे माझ्या अनेक सेल्फ-एम्प्लॉईड मित्रांना पुढचे अनेक महिने पैसे मिळणार नाही, याची चिंता सतावते आहे. माझ्या अनेक मित्रांची नोकरी गेली आहे.

    ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  17. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे करा....

  18. लॉकडाऊनच्या काळात मुलांना कसं बिझी ठेवलं जात आहे?

  19. आयुष्य 'नॉर्मल' करण्यासाठी वेगवेगळे देश काय करत आहेत?

    कोरोना व्हायरसमुळे सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. काही देशांमध्ये हा लॉकडाऊन उठवण्याची तयारी करत आहेत, तर अनेक देशांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीय.

    लॉकडाऊन उठवताना नेमकं नॉर्मल आय़ुष्याकडे कसं जायचं यासाठीचा एक ठराविक फॉर्म्युला कोणत्याही देशाकडे नाही.

    पण यासाठी अनेक देशांमध्ये लढवण्यात काही भन्नाट कल्पना लढवण्यात आल्या आहेत.

  20. जितेंद्र आव्हाड ‘कोरोनाशी लढाई जिंकून’ घरी निघाले