राज्यात कोरोनाचे 1,089 नवीन रुग्ण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19,063
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
मालदीवमधून भारतीयांना आणण्याची तयारी सुरू
लॉकडाऊनमुळे मालदीव बेटांवर अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची तयारी सुरू झाली आहे. आयएनएस जलस्व या जहाजातून भारतीय प्रवाशांना परत आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यांना जहाजावर प्रवेश देण्याआधी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यवतमाळमध्ये आणखी 2 जण पॉझिटिव्ह, एकूण संख्या 84
वैद्यकीय महाविद्यालयाला आज प्राप्त झालेल्या 23 रिपोर्टस पैकी 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 21 रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 84 झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेले हे दोन्ही जण नेर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील सदस्य आहेत.
औरंगाबाद - जालना दरम्यान मालगाडीने 16 मजुरांना चिरडले
राजस्थानातील मृतांचा आकडा 100 वर
राजस्थानात कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आज 100 वर पोहोचली. राज्यात आतापर्यंत 3453 जणांना कोव्हिड-19 झाला आहे, अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आता पूर्वीसारखी लोकल कचाकच लोकांनी भरलीये आणि आपण कामावर जाऊ, असं होणं कठीण आहे.
पाहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बीबीसी न्यूज मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत...
कोर्टाच्या आदेशानंतर सुरतहून ओडिशाला येणाऱ्या रेल्वेंना प्रवेशबंदी
दुसऱ्या राज्यात अडकलेले लोक परतल्यानंतर ओडिशामध्ये कोव्हिड-19ग्रस्त लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत ओडिशामध्ये 34 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 27 जण सुरतहून परतले आहेत.
त्यामुळे गुरूवारी रात्री उशिरा ओडिशा हायकोर्टाच्या सूचनेनुसार सुरतहून ओडिशाला येणाऱ्या रेल्वेंना प्रवेशबंदी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
देशात गेल्या 24 तासांत 103 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 56342 वर
देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत गेल्या 24 तासांत 3390 ने भर पडली तर गेल्या 24 तासांत तब्बल 103 रुग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आतापर्यंत 56 हजार 342 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1886 जणांचा कोव्हिड-19मुळे मृत्य झाला आहे. सध्या देशात 37 हजार 916 रुग्णांव उपचार सुरू आहेत. तर 16 हजार 539 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाने कळवलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
संसर्गाच्या भीतीने टर्कीतले डॉक्टर 24 दिवस घरीही नाही गेले
मजुरांच्या मृत्यूने प्रचंड दुःख – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबादमधील मजुरांच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये झालेल्या अपघातात झालेल्या मजुरांच्या मृत्यूमुळे प्रचंड दुःख झालं आहे. मी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. ते या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ते सगळं सहकार्य करण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
औरंगाबादमध्ये रेल्वेनं मजुरांना चिरडलं, 14 जणांचा मृत्यू, 5 जखमी
औरंगाबादमधील करमाडजवळ रुळावर मजुरांना रेल्वेनं चिरडल्याची घटना घडली, मजुरांपैकी 14 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
रेल्वे पोलीस फोर्स (RPF) आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. असं एएनआयने सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हे मजूर रेल्वे ट्रॅकवरून पायी घरी निघाले होते, त्यांना एका रिकाम्या मालगाडीने चिरडलं, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आफ्रिकेत होऊ शकतात 1 लाख 90 हजार मृत्यू – WHO चा इशारा
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय निष्फल ठरल्यास कोव्हिड-19 महामारीच्या पहिल्या वर्षात 1 लाख 90 हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.
हा अंदाज आफ्रिकेतील 47 देशांच्या अभ्यासाच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. यामध्ये अल्जिरिया, दक्षिण आफ्रिका आणि कॅमेरूनमध्ये जास्त धोका असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरस : जगातील विविध देशांमध्ये गेल्या 24 तासांत काय घडलं?
जगातील पाच सर्वाधिक कोरोनाबाधित देश
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोव्हिड-19मुळे सुमारे 2 लाख 70 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात सुमारे 38 लाख 36 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
- अमेरिका जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश आहे. इथं सुमारे 12 लाख 55 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्येने 75 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
- अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये कोव्हिड-19मुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्रिटनमध्ये मृत व्यक्तींची संख्या 30 हजार 689 वर पोहोचली आहे. इथं 2 लाख 7 हजार 977 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
- इटलीमध्ये सुमारे 2 लाख 15 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 29 हजार 958 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
- स्पेनमध्ये 2 लाख 21 हजार 447 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यापैकी 26 हजारपेक्षाही जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
- फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 26 हजारवर पोहोचली आहे. इथं सुमारे 1 लाख 75 हजार जणांना कोव्हिड-19 ने ग्रासलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एकट्या युएईमधूनच 2 लाख भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत
कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर मार्च महिन्यात भारताने सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद केली होती. आता 12 देशातील 15 हजार भारतीयांना येत्या काही दिवसांत देशात परत आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पण फक्त संयुक्त अरब अमिरातीमध्येच (युएई) सुमारे 2 लाख भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
युएईमध्ये अडकलेल्या 300 हून अधिक भारतीयांना गुरुवारी केरळमध्ये आणण्यात आलं. येत्या काही काळात उर्वरित नागरिकांना आणण्यात येणार आहे. पण भारतात परतण्यासाठी तब्बल 1 लाख 97 हजार भारतीयांनी अर्ज केले आहेत. 1990 नंतर ही भारताची सर्वात मोठी मोहीम मानली जात आहे. 1990 च्या दशकात आखाती देशांतील युद्धादरम्यान 1 लाख 70 हजार भारतीयांना देशात परत आणलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
परदेशातून येणाऱ्या नागरिकांचं 88 हॉटेलांतील 3343 रुममध्ये विलगीकरण
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांना लवकरच देशात आणलं जाणार आहे. परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्या नागरिकांचं विलगीकरण करण्यासाठी 88 हॉटेलातील 3343 रुममध्ये सोय करण्यात आली आहे. हे सर्व 2 ते 5 स्टार हॉटेल आहेत. या यादीत काही अपार्टमेंट हॉटेल आणि ओयो हॉटेलचाही समावेश आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मुंबईत दाखल होणारे प्रवासी बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, ब्रिटन, मलेशिया आणि अमेरिका या देशांतून येणार आहेत. सुमारे 14800 लोक भारतात परततील असा अंदाज आहे. यासाठी 64 विशेष विमानं उडवण्यात येणार आहेत. त्यापैकी 7 विमानं 1900 प्रवाशांना घेऊन मुंबईत उतरतील.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आतापर्यंतचे ताजे अपडेट्स
सुप्रभात मंडळी,
कोरोना व्हायरस संदर्भात जगात, देशात आणि महाराष्ट्रात घडत असलेल्या ताज्या घडामोडी बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.
त्याप्रमाणे आजचं लाईव्ह पेज सुरू करत आहोत.
तत्पूर्वी, काल दिवसभरात काय-काय घडलं याची माहिती आपण थोडक्यात घेऊ.
1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 1216 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 17974 वर पोहोचली.
2.आर्थर रोड जेलमध्ये 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून 26 पोलीस कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला.
3.जपाननं कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवियर वापरण्यास परवानगी दिली आहे.
4.जगभरात आतापर्यंत 37 लाख 17 हजार 144 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर 2 लाख 63 हजार 862 व्यक्तींचा मृत्यू.
5.कोरोनामुळे अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या 3 कोटी 30 लाखांवर पोहोचली.
6.कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर गंगेच्या पाण्यानं उपचार करण्यात यावेत, असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयानं ICMRला दिला होता. ICMRनं तो फेटाळला.
7."परप्रांतीयांची एण्ट्री आणि एक्झिटवर बंधनं हवीत, प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही.परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात परत येतील तेव्हा त्यांची तपासणी करा. राज्य सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे?" - राज ठाकरे
8.परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यासाठी डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची अट शिथील करण्यात आली आहे.कालच्या सर्व अपडेट्स तुम्ही इथं सविस्तर वाचू शकता.