अंतिम वर्षातील अंतिम
सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा न
घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्याता आल्याची माहिती
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत यांच्या फेसबुक
लाईव्हमधील प्रमुख मुद्दे -
सर्व विद्यार्थ्यांना आधीच्या
परीक्षांतील मार्क्सचा विचार करून मार्क देण्यात येतील.
मार्क वाढवण्यासाठी
विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा
युनिव्हर्सिटीने त्या
परीक्षांचं वेळापत्रक पुढच्या वर्षी ठरवावं.
एखादा विद्यार्थी नापास
झाल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील वर्षी होतील.
एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही
पुढील वर्षी प्रवेश. त्यांच्या परीक्षा पुढील वर्षी कॉलेज सुरू झाल्यानंतर 120
दिवसांत घेण्याची सूचना
अंतिम वर्षातील अंतिम
सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात.
पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती न बदलल्यास
20 ऑगस्टपर्यंत त्याचा निर्णय घेण्यात येईल.
अंतिम वर्षात सध्या महाराष्ट्रातील 8 ते 9 लाख
विद्यार्थी
अंतिम वर्षातील परीक्षा घेताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाईल.
प्रात्यक्षिक परीक्षा वैयक्तिकपणे न घेता जर्नल आणि ऑनलाईन तोंडी परीक्षा घेऊन मार्क देण्यात येतील.
विद्यार्थ्यांना शंका असल्यास कुलगुरूंकडून माहिती
घ्यावी.
येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचं शंकानिरसन करण्यासाठी
केंद्र तयार करावेत.
युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी केंद्र
निर्माण करण्याची सूचना
स्वायत्त युनिव्हर्सिटींनी शासनाशी चर्चा करून
परीक्षांचा निर्णय घ्यावा.
त्यांनी या फॉरमॅटमध्येच
वेळापत्रक तयार करावं.
उन्हाळी सुटीच्या बाबतीत
निर्णय युनिव्हर्सिटीनं स्वतः घ्यावेत.
अंतिम परीक्षा रद्द करणं
युजीसीच्या गाईडलाईनमध्ये नाही.
तीन तासांच्या परीक्षा दोन
तासांवर घेण्यात येऊ शकतात.
100 गुणांच्या परीक्षा 50
गुणांच्या स्वरूपात घेण्यात येऊ शकतात.
पुढील वर्षाचं शैक्षणिक
वेळापत्रक कुठल्याही परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून सुरू करायचं आहे.
अंतिम वर्षातील अंतिम
सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा नाही याचा निर्णय त्या-त्या वेळी परिस्थिती
बघून घेण्यात येईल.