You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात कोरोनाचे 1,089 नवीन रुग्ण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19,063

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. 'मी ट्रेन पाहून आवाज दिला, पण...'

  2. 'या' सोडून सर्व महाविद्यालयीन परीक्षा रद्द

    अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता फक्त थर्ड इअरची अंतिम परीक्षा होणार आहे. इतरांच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्याता आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

    अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

    पाहा व्हीडिओ -

  3. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,390 नवीन रुग्ण

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली.

    त्यांनी मांडलेले मुद्दे –

    1.गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 3,390 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 56,342 वर पोहोचली आहे.

    2.गेल्या 24 तासांत देशात 103 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 1,886 वर पोहोचलीआहे.

    3.देशात 216 जिल्ह्यांत कोरोनाचे एकही रुग्ण आढळलेला नाही.

    4.देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 29.36 इतका आहे.

    5.स्थलांतरित मजूरांसाठी सरकार शक्य तितके प्रयत्न करत आहे.

    6.स्थलांतरित मजूरांसाठी रेल्वेनं 222 ट्रेनची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 2.5 लाख मजूरांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

  4. पुणे फायर ब्रिगेडमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

    पुणे फायर ब्रिगेडमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ते कुणाच्या संपर्कात आले, याची तपासणी सध्या सुरू आहे.

    पुण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी ही माहिती दिली आहे.

  5. कोरोनासंबंधी संशोधन करणाऱ्या चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

  6. मुंबईतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहराची सात झोनमध्ये विभागणी

    मुंबईतील परिस्थिती नियंत्रणासाठी शहराची सात झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. सात अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी दररोज या परिसराचा दौरा करतील.

    सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत विभागात पाहणी करणं अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे.

    मुंबईत कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 17 मे पर्यंत 10 वरुन 20 दिवस करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

  7. रशियात सलग सहाव्या दिवशी कोरोनाचे 10 हजारहून अधिक रुग्ण

    रशियामध्ये सलग सहाव्या दिवशी 10 हजारहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

    सरकारी आकडेवारीनुसार रशियात गेल्या 24 तासात कोरोनाचा संसर्ग झालेले 10, 699 नवीन रुग्ण आढळून आले.

    रशियात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,87,859 झाला आहे. कोरोनामुळे रशियात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,723 झाली आहे.

  8. लॉकडाऊनविषयी उद्धव ठाकरे काय बोलणार?

  9. इस्रायलने शोधलेल्या 'अँटीबॉडी' काय आहेत? #सोपीगोष्ट 73

    इस्रायलने दावा केलाय की त्यांनी कोरोना व्हायरसला मारू शकणाऱ्या अँटीबॉडीज विकसित केल्या आहेत आणि तसं करणारा तो जगातला पहिला देश आहे. पण म्हणजे इस्रायलने नेमकं काय केलंय?

    हे इतर देशांना का शक्य झालेलं नाही? यामुळे खरंच कोरोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू या बीबीसी न्यूज मराठीच्या सोपी गोष्टमध्ये.

  10. अंतिम वर्षातील अंतिम सत्र वगळता सर्व महाविद्यालयीन परीक्षा रद्द

    अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्याता आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

    उदय सामंत यांच्या फेसबुक लाईव्हमधील प्रमुख मुद्दे -

    सर्व विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांतील मार्क्सचा विचार करून मार्क देण्यात येतील.

    मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा

    युनिव्हर्सिटीने त्या परीक्षांचं वेळापत्रक पुढच्या वर्षी ठरवावं.

    एखादा विद्यार्थी नापास झाल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील वर्षी होतील.

    एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्षी प्रवेश. त्यांच्या परीक्षा पुढील वर्षी कॉलेज सुरू झाल्यानंतर 120 दिवसांत घेण्याची सूचना

    अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात.

    पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती न बदलल्यास 20 ऑगस्टपर्यंत त्याचा निर्णय घेण्यात येईल.

    अंतिम वर्षात सध्या महाराष्ट्रातील 8 ते 9 लाख विद्यार्थी

    अंतिम वर्षातील परीक्षा घेताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाईल.

    प्रात्यक्षिक परीक्षा वैयक्तिकपणे न घेता जर्नल आणि ऑनलाईन तोंडी परीक्षा घेऊन मार्क देण्यात येतील.

    विद्यार्थ्यांना शंका असल्यास कुलगुरूंकडून माहिती घ्यावी.

    येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचं शंकानिरसन करण्यासाठी केंद्र तयार करावेत.

    युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी केंद्र निर्माण करण्याची सूचना

    स्वायत्त युनिव्हर्सिटींनी शासनाशी चर्चा करून परीक्षांचा निर्णय घ्यावा.

    त्यांनी या फॉरमॅटमध्येच वेळापत्रक तयार करावं.

    उन्हाळी सुटीच्या बाबतीत निर्णय युनिव्हर्सिटीनं स्वतः घ्यावेत.

    अंतिम परीक्षा रद्द करणं युजीसीच्या गाईडलाईनमध्ये नाही.

    तीन तासांच्या परीक्षा दोन तासांवर घेण्यात येऊ शकतात.

    100 गुणांच्या परीक्षा 50 गुणांच्या स्वरूपात घेण्यात येऊ शकतात.

    पुढील वर्षाचं शैक्षणिक वेळापत्रक कुठल्याही परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून सुरू करायचं आहे.

    अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा नाही याचा निर्णय त्या-त्या वेळी परिस्थिती बघून घेण्यात येईल.

  11. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा फेसबुक लाईव्हद्वारे संवाद

  12. केंद्र आणि राज्य सरकारकडून मजुरांना चुकीची वागणूक – मायावती

    विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरीत मजूर प्रचंड तणावात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारं त्यांना चुकीची वागणूक देत आहेत. मजुरांचं जेवण आणि राहण्यासाठीची सोय योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही, असं बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलं आहे.

  13. कर्नाटकात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांची निदर्शनं

    कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांनी राज्य सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यांना घरी जाऊ देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

  14. कोरोना व्हायरसनंतर जगभरात हुकूमशाही अस्तित्वात येईल का?

  15. रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत

    औरंगाबादमधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 16 स्थलांतरीत मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

    तसंच या अपघातात जखमी झालेल्या मजुरांवरील सर्व उपचार सरकारी खर्चातून करण्यात येईल. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने संपर्कात असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

  16. कोरोना व्हायरसशी संबंधित झोन राज्यांकडून तयार व्हावेत – राहुल गांधी

    सध्याच्या स्थितीत एका मजबूत पंतप्रधानाऐवजी अनेक मजबूत मुख्यमंत्र्यांची गरज आहे. राज्यातील स्थितीची माहिती जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना जास्त आहे. त्यामुळे झोन तयार करताना राज्यांनी ते तयार करणं आवश्यक आहे. त्यांना यासाठी परवानगी दिली पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.

    पत्रकार परिषदेतील इतर प्रमुख मुद्दे -

    आरोग्य सेतूला हॅकर्सनी आधीच क्रॅक केलं.

    कोणतंही अॅप सुरू करताना पारदर्शकता ठेवावी.

    संकटाशी लढण्यासाठी विकेंद्रीकरणाची गरज

    राज्यांना व्याज घ्यावं लागत आहे.

    जिल्हास्तरावर माहिती घेऊन धोरण आखण्याचा काँग्रेसशासित राज्यांना सल्ला

    केंद्र सरकारने सत्य लोकांना सांगावं

    फक्त 1 ते 2 टक्के लोकांना जास्त धोका आहे.

    बाकीच्या लोकांच्या मनातील भीती सरकारने दूर करावी.

  17. 50 टक्के लोकांच्या खात्यात 7500 रुपये तातडीने जमा करावेत – राहुल गांधी

    पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -

    स्थलांतरीत मजुरांच्या खात्यात तातडीची आर्थिक मदत जमा करावी.

    राज्या-राज्यांमध्ये संवाद असणं गरजेचं. केंद्राने पुढाकार घ्यावा.

    लघु-मध्यम उद्योगांना मदतीची गरज.

    देशातील यंत्रणेचा एक भाग सुरू करण्याऐवजी संपूर्ण यंत्रणा सुरू करावी.

  18. औरंगाबाद : चिरडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

  19. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

    सध्याची वेळ टीका करण्याची नाही

    या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे.

    पुरवठा साखळीबाबत विशेष उपाययोजना करण्याची गरज

    स्थलांतरीत कामगार, छोट्या उद्योगांना तातडीची मदत करणं गरजेचं

    त्यांना आता मदत न केल्यासं गंभीर स्थिती निर्माण होईल.

  20. कोरोना संकटात केंद्र आणि राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आवश्यक – राहुल गांधी

    राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -

    आम्ही या विशिष्ट निकषांवर काम करत आहोत, असं त्यांनी कळवलं पाहिजे.

    लॉकडाऊन हा या संकटावरचा उपाय नाही.

    कोव्हिड-19 हा इतर व्याधी असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत गंभीर आजार.

    लोक प्रचंड घाबरलेले आहेत. सरकारने लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

    सरकारने पारदर्शक कारभार करण्याची गरज