राज्यात कोरोनाचे 1216 नवीन रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 17974

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,952 वर, 1783 जणांचा मृत्यू

    देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या 52,952 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1783 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    आतापर्यंत देशात 15,266 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 35,905 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. BBC EXCLUSIVE : इराणमधली खासगी विमान कंपनी अशी ठरली कोरोना उद्रेकाला कारणीभूत

  3. वंदे भारत : सर्वांत मोठी स्थलांतर मोहीम सुरू, परदेशातील 2 लाख भारतीयांना परत आणणार

  4. दंगली, बाँबस्फोट आणि आता कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावची गोष्ट

  5. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, देशातली संख्या 50 हजारहून अधिक

  6. आतापर्यंतचे ताजे अपडेट्स

    • देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा पन्नास हजाराच्या पुढे गेला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1700हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
    • मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, बीकेसीमध्ये 1000 बेड्सचं हॉस्पिटल उभं राहतं आहे. त्याचवेळी लष्कर तसंच रेल्वे हॉस्पिटलमध्येही रुग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
    • राज्यात बुधवारी 1233 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 34 जणांचा मृत्यू झाला. 275 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे.
    • लॉकडाऊन काळात 95 हजार गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी 10000 एसटी बसेस धावणार असल्याचं मंत्री विजय वडेवट्टीवार यांनी सांगितलं.
    • कोरोना रुग्णांना बरं करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल क्षेत्रातील कार्यरत 548 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
  7. कोरोना व्हायरस संदर्भातल्या विशेष LIVE कव्हरेजमध्ये स्वागत

    सुप्रभात,

    बीबीसी मराठीच्या कोरोना व्हायरस संदर्भातल्या विशेष LIVE कव्हरेजमध्ये स्वागत आहे. याआधीच्या सर्व घडामोडी पाहाण्यासाठी इथं क्लिक करा.